काटोल: देवर्षि नारद आद्य पत्रकार म्हणून जनसामन्यात, पुराणपुरुष व्यक्तीमत्व लोकप्रिय ठरले आहे.त्रिभुवणात केव्हाही, कोठेही मुक्तपणे संचार करणारेतेथिल माहिती लोक कल्याणार्थ योग्य सत्य माहिती योग्य व्यक्ती जवळ पोहचविणारे सृष्टीतील पहिले पत्रकार व सत्याचे प्रतीक होते .परंतु त्यांची धार्मिक धारावायीक(दूरचित्रवाणी) माध्यमातून विनोदी पात्र,कळलावी अशी चूकीचे व्यक्ती रेखा सकरल्याने समाजात चुकीचा संदेश गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून महर्षी व्यास, वाल्मिकी, सुखदेव यांचे नारद हे गुरू होते.प्रत्यक्षात देवदेवता,असुर ,ऋषी त्यांचा सन्मान करीत होते. असे मत जेष्ठ पत्रकार व साहित्यिक कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रकाश एदलाबादकर यांनी विश्व संवाद केंद्र विदर्भप्रदेश अंतर्गत देवर्षी नारद जयंती पत्रकार सत्कार समारंभात व्यक्त केले.
स्थानिक विश्वेश्वर वाचनालयात मंगळवार (दि21मे) सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रशेखर देवधर, सत्कार मूर्ती काटोल तालुका पत्रकार संघटना अध्यक्ष सुधीर बुटे, जेष्ठ पत्रकार गणेश लवणकर, जिल्हा संघ चालक काटोल नलीन कुकडे, जिल्हा सहसचिव पत्रकार अनिल सोनक,माजी अध्यक्ष प्रशांत पाचपोहर, हेमराज सातपुते,,नीलकंठ गजभिये, गौरव नाईक, जयंत कळंबे, कुलदीप येनूरकर , बाबाराव चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नागपूर मराठी पत्रकार संघ काटोल तालुका अध्यक्ष सुधीर बुटे, तसेच स्थानिक चर्चा साप्ताहिक संपादक गणेश लवनकर यांना 2019 देवर्षी नारद पत्रकार पुरस्काराने सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात चंद्रशेखर देवधर म्हणाले पत्रकारांनी निपक्ष ,समाजाला न्याय देणारी पत्रकारिता करावी ,लोकशाहीचा चवथा स्तंभाविषयी विश्वासार्था पत्रकारांनी टिकविणे गरजेचे आहे. असा सल्ला त्यांनी दिला.यावर्षी पासून पत्रकार सत्कार सोहळा आयोजित केला असून समाजाला पोषक पत्रकारिता कररणाऱ्या व्यक्तीचा समिती सन्मान करेल याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान देवधर यांनी केले.संचलन हिम्मत नाखले तर आभार जयंत कळंबे यांनी केले.
———-/—-