कलावंतांची यादी झाली ‘किराणाची यादी!’
सत्कारमूर्तींचा सत्कार मात्र सन्मानाकडे दूर्लक्ष
नागपूर,ता.७ जुलै २०२४: ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीतर्फे शहरातील ऑकेस्ट्रा जगतातील ज्येष्ठ कलावंतांना एका मंचावर आणून त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम आज पार पडला मात्र ,आयोजकांच्या अतिशय ढिसाळ आयोजनाचा फटका या ज्येष्ठ कलावंताना पडला.एकीकडे आज सकाळपासून मानसूनच्या पावसाने जरा ही उसंत घेतली नव्हती तर दुसरीकडे या सत्कार उपक्रमासाठी ज्येष्ठ कलावंतांना सकाळी ११ वाजता सीताबर्डी,अंबाझरी रोड वरील अमृत भवनात पोहोचणे भाग होते.सत्कारमूर्तींमध्ये अनेक कलावंत हे सत्तरीच्या पल्ल्याड होते तसेच ते नागपूरच्या कानाकोप-यातून कार्यक्रमस्थळी पोहोचणार होते.अश्यावेळी आयोजकांतर्फे अश्या ज्येष्ठ कलावंतांना एक ही फोन,ते कसे येणार आहेत,याविषयी गेला नाही.सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे सत्तर हजारच्या घरात या कार्यक्रमाचा खर्च गेला असताना,जेवणावळी ऐवजी ,एखाद्ये वाहन व वाहनचालकाची व्यवस्था सत्कारमूर्ती ज्येष्ठ कलावंतांसाठी करण्यात आली असती तर ज्येष्ठ कलावंतांची धो-धो बसरणा-या पावसात कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी तारंबळ उडाली नसती.अनेक ज्येष्ठ कलावंत हे कॅब करुन कार्यक्रमस्थळी एकटे पोहोचले होते!
सुरवातीला कार्यक्रमाची रुपरेषा ही सत्तर-ऐंशीच्या दशकातील ऑकेस्ट्राचे ज्येष्ठ संचालक व वादक-गायक कलावंतांच्या सत्काराची ठरली होती मात्र,एखादी संस्था चालवायची तर पदाधिका-यांच्या वैयक्तिक आकांक्षा व मत देखील विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.या कार्यक्रमात देखील हेच घडले.मोजके सात-आठ ज्येष्ठ कलावंतांच्या सत्कार यादीत मग नव्वदी व त्यानंतरचे अनेक कलावंतांची नावे जुळत गेली.याच कार्यक्रमात कलावंतांच्या दहावी-बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी पाल्यांचा देखील सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे ज्येष्ठ कलावंत व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार असा सुटसुटीत उपक्रम न ठेवता,अनेक कलावंतांचा एकसाथ सत्कार ’उरकण्यात’आला.यामुळे सकाळी ११ वा.सुरु झालेला कार्यक्रम दूपारी साढे चार वाजेपर्यंत चांगलाच रेंगाळला.हनुमंतांच्या शेपटीप्रमाणे लांबलेली सत्कारमूर्तींची यादी ही वाण्याकडील ‘किराणा’यादीप्रमाणे भासू लागली.
सत्कार सोहळ्यात ज्या कलावंतांना पन्नाहून अधिक वर्षे संगीत साधनेत झाली,त्यांच्या आधी इतरांची नावे पुकारण्यात आली.त्यामुळे अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या मनात आयोजकांच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.कोणताही कार्यक्रम म्हटला की आधी कागदावर त्याची रुपरेषा ठरविली जाते.कोणावर कोणती जबाबदारी देण्यात येईल याचा ठोस निर्णय घेतला जातो.अपवाद वगळता ऑस्करचे सर्व पदाधिकारी मंचावरच व्यस्त असल्याने, सत्कारमूर्ती कलावंत हे समोर सोफ्यावर न बसता मागच्या प्लास्टिकच्या खूर्च्यावर येऊन बसले तरी आयोजकांतर्फे त्यांच्याकडे साफ दूर्लक्ष झाले!एक सत्कारमूर्ती असणारे ज्येष्ठ गिटारिस्ट हे पावसामुळे कार्यक्रमात थोडे उशिरा पोहोचले.सत्तरी पल्ल्याड ते कलावंत कॅब करुन एकटे कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. ते मागच्या खूर्चीवर जाऊन बसले.कोणत्या सत्कारमूर्तीची जबाबदारी कोणत्या पदाधिका-यावर असणार,याची ठोस रुपरेषाच नसल्याने काही वेळ त्यांच्याकडे आयोजकांनी लक्ष ही दिले नाही!हीच परिस्थिती दोन अन्य ज्येष्ठ सत्कारमूर्तींसाबत देखील ओढवली.
सर्वात महत्वाचे म्हणजे काहींना खूप जास्त वेळ दिला बोलण्यासाठी,अनेकांना माईकला हात देखील लाऊ दिला गेला नाही.अनेक सत्कारमूर्तींना खूप काही बोलायचं होतं,ते सगळं मनात राहून गेल्याची खंत त्यांनी इतरांकडे बोलून दाखवली.कलावंताला शाल,श्रीफळ किवा सन्मानचिन्हापेक्षा आपल्या जिव्हाळ्याच्या कलावंतांसमोर आणि येणा-या पिढीसमोर अनुभव आणि आठवणीचे दोन बोल सांगायचे होते,वाटून घ्यायचे होते मात्र,आयोजकांच्या त्यातल्या त्यात हातातून शेवटपर्यंत माईक न सोडलेल्या ऑस्करचे पदाधिकारी असणारे तीन-तीन निवेदनकारांच्या लांबलेल्या निवेदनामुळे ख-या कलावंतांना दोन शब्द ही बोलण्याची संधीच मिळाली नाही.सभागृह सायंकाळी ४ पर्यंत रिकामे करुन द्यायचे होते,ही सबब साढे चार दशक स्टेज गाजवणा-या कलावंतांसाठी ‘गैरलागू’होती.
या निवेदनातही स्पष्टत:’भेदभाव’दिसून पडला.स्वत:ची मानलेली बहीण,आई-बाबा यांचे गोडकौतूक निवेदनकारातर्फे फारच लांबविण्यात आले.कश्याप्रकारे मानलेल्या आईने कांदे
-पोहे खाण्यास दिले अश्या ‘निरस’ कथेपेक्षा ज्येष्ठ कलांवतांनी या मुकामापर्यंत पोहोचण्यासाठी किती व कोणकोणत्या खस्ता खालल्या,हे ‘सुरस’ अनुभव जास्त उपयोगी ठरले असते.मात्र,असे घडले नाही.
सर्वात दूर्देवाची बाब म्हणजे,स्टेजची रचना ही ज्येष्ठ कलावंतांचा जणू अपमान करणारीच होती.मधोमध एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती व मंचावर दोन्ही बाजूने प्लास्टिकच्या मोजक्या खूर्च्या ठेवण्यात आल्या होत्या.परिणामी,कार्यक्रमातील प्रमुख पाहूणे व फक्त काही ज्येष कलावंत हे मंचावर होते व इतर सत्कारमूर्ती खालीच श्रोत्यांमध्ये बसले होते!स्क्रीनवरील माहिती ज्येष्ठ कलाकार व प्रमुख पाहूण्यांना मान वळवून-वळवून बघावी व वाचावी लागत होती!अखेर एक ज्येष्ठ कलावंतांने या पेक्षा आपला मोाबाईल बघणे पसंद केले.
त्या एलइडी स्क्रीनवर ‘प्रायोजकांची’ नावे दर दोन मिनिटांनी संपूर्ण कार्यक्रमभर झळकली.लकी खान,परिणिता मासूरकर,राजू गजभिये यांच्या नावासह एक नाव संपूर्ण कार्यक्रभर झळकले ते होते,खंडणी व जमीन लाटण्याचे अनेक गुन्हे दाखल असणारे मुन्ना यादव याचे.मुन्ना यादव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे खास मानले जातात.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रायोजकांकडून ३ हजार रुपये देणगी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.तीन हजार रुपये देणगी दिलेल्यांचे छायाचित्र हे संपूर्ण साढे पाच तास, दर दोन मिनिटांनी सभागृहातील श्रोत्यांना पाहणे भाग पडले!देणगी कोणाकडून घ्यावी हा अायोजकांचा खासगी हक्क असला तरी, दर दोन मिनिटाला प्रायोजक म्हणून तीच-तीच चार-पाच नावे आणि त्यांचे छायाचित्र बघणे,सभागृहातील उपस्थितांना ‘ असहनीय’झाले होते.जेवणावळी ठेऊन बडेजाव करण्या ऐवजी चहा-बिस्टकूट जरी मिळाले असते तरी कलावंतांनी ते गोड मानून घेतले असते,असे अनेक कलावंतांनी खासगीत मत व्यक्त केले.
(छायाचित्र :आयोजकांची कल्पक बुद्धी! ज्येष्ठ कलावंत आणि प्रमुख पाहूण्यांची अशी केली बसण्याची व्यवस्था!मधोमध एलईडी स्क्रीन आणि प्रायोजकांच्या जाहीरातीचा भडीमार,तो ही दर दोन मिनिटांनी…तब्बल साढे चार तास!)
शासन दरबारी नोंदणीकृत संस्थेला प्रायोजकत्वाच्या या पातळीवर उतरणे हे योग्य वाटत असले तरी सत्कारमूर्ती ज्येष्ठ कलावंतांसाठी ते ‘अवमानकारक’ होते.सत्कारमूर्तींपेक्षाही तीन-तीन हजार रुपये देणगी देणा-यांची प्रतिमा ही या कार्यक्रमात फार-फार मोठी ठरली!याच स्क्रीनवर ज्यांचा सत्कार होत होता त्यांच्या विषयीची माहिती वाचून दाखवली जात होती.अक्षम्य अश्या चूका त्या माहितीत होत्या व निवेदनकार हे चूकीच्या हिंदी भाषेत तीच चुकीची शब्दे वाचून दाखवित होते!आयोजकांना सत्कारमूर्तींविषयी धड योग्य माहिती देखील नव्हती.वेळेवर मागवून दाखवली व वाचली जात होती!
कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या प्रमुख पाहूण्यांना चार-साढे चार तास कार्यक्रम संपेपर्यंत बसवून ठेवण्यात आले.फक्त मध्ये-मध्ये काही कलावंतांचा सत्कार करण्याची संधी त्यांना लाभली.अनेक सत्कारमूर्ती हे कार्यक्रम लांबल्याने व कार्यक्रम तितकाच रटाळ झाल्याने घरी निघून गेले.परिणामी,सत्कारमूर्ती कलावंतांसोबत प्रमुख पाहूण्यांचा कोणताही ग्रूप फोटो काढण्याची संधी आयोजकांना मिळाली नाही व माध्यमांसाठी काढण्यात आलेल्या फोटोमध्ये प्रमुख पाहूण्यां ऐवजी कलावंत व आयोजकच दिसून पडत आहेत.
याशिवाय आयोजनकांनी ‘जिवंत’कलावंतांचा सत्कार करण्यासाठी पुढकार घेऊन एक स्तुत्य उपक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी,७०-८० च्या दशकातील योगेश ठक्कर ऑकेस्ट्राचे संचालक योगेश ठक्कर यांना मृत्यूपरांत श्रद्धांजली देण्याचे कोणतेही औचित्य दाखवले नाही.हीच कृती सुविख्यात दिवंगत ड्रमर अशोक ठवरे यांच्याही वाट्याला आली.त्यांचा करोना काळात मृत्यू झाला होता.या दिवंगत कलावंतांच्या कुटूंबियांना कार्यक्रमात बोलावून संगीत क्षेत्रात त्यांच्या योगदानाचे सन्मानचिन्ह देण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवलेच नाही.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आयोजकांना याची पूर्वकल्पना देऊन देखील त्यांनी दिवंगत कलावंतांचा सन्मान जाणीवपूर्वक टाळला.परिणामी,आयोजकांतर्फे हा कार्यक्रम ज्या पद्धतीने ‘उरकण्यात’आला ते बघता जिवंत कलावंतांचा अश्या रितीचा सत्कार हा ‘बेसूर आणि बेताल’झाला,असाच सूर कार्यक्रमस्थळी उमटला होता.
……………………….