फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजऑस्करतर्फे ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार रविवारी

ऑस्करतर्फे ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार रविवारी

कलाकारांच्या मांदियाळीत उजळणार चार दशकांची संगीत साधना
नागपूर,ता.६ जुलै २०२४: उपराजधानीत सत्तर-ऐंशीच्या दशकात सर्वसामान्यांच्या मनात‘ऑकेस्ट्रा’ची क्रेझ ही शब्दातीत होती.त्याकाळी ऑकेस्ट्राच्या कलावंतांची क्रेझ ही कोण्या सिनेस्टारपेक्षा कमी नव्हती.नवरात्र असो किवा गणपती उत्सव,संपूर्ण दहा दिवस संगीताचा मनसोक्त आंनद त्या काळातील पिढीने ऑकेस्ट्रातून लृटला आहे.नववर्षाचे स्वागत असो किवा लग्न समारंभ किवा वाढदिवस,ऑकेस्ट्राशिवाय त्या समारंभांना रौनक येत नसे.गायक,वादक यांच्यापासून तर निवेदक आणि सोबत हास्य कलावंत म्हणून मिमिक्री आर्टीस्ट मंच गाजवत असे.सत्तरच्या दशकात सर्वाधिक गाणी ही आर.डी.बर्मन यांची वाजवली जायची कारण तीच गाणी रसिक श्रोत्यांच्या ह्दयाचा ठाव घेणारी तर होतीच,त्यासोबतच गायक आणि वादक कलावंतांच्या परिश्रमाचा उच्चांक गाठणारी होती.अहो रात्र एका-एका गाण्याचा सराव चालत असे.कि-बोर्डचा पीस असो किवा गिटारचा,कांगोची थाप असो किवा ड्रम्सची बिट,अगदी मायनर वाजवणा-या कलावंतांचे देखील योगदान ठलकपणे ऑकेस्ट्राच्या मंचावर दिसून पडत होते.त्या काळातील कलेप्रति समर्पित अशाच काही कलावंतांचा सत्कार रविवार दिनांक ७ जुलै रोजी शहरातील सुप्रसिद्ध संस्था ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीतर्फे अंबाझरी मार्ग,सीताबर्डी येथील अमृत भवन येथे सकाळी १० वा.आयोजित करण्यात आला आहे.

मागील चार दशकांपासून अधिक काळ उपराजधानीतील कला क्षेत्राचे क्षीतीज आपल्या कलेतून उजळून टाकणा-या कलावंतांचा सत्कार राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी सुप्रसिद्ध समाजसेविका व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष पी.कुमार सांगतात. उपराजधानीने संगीत क्षेत्रात अनेक कलावंत घडवले.ज्येष्ठ कलावंतांच्या मार्गदर्शनात घडणा-या कलावंतांचा देखील सत्कार, यावेळी ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ऑस्करचे अध्यक्ष पी.कुमार यांनी दिली.

गुरुंच्या हस्ते शिष्यांचा सत्कार होण्याची परंपरा भारत देशात अतिशय प्राचिन असून शिष्यांच्या यशाने गुरुंचे ज्ञान तृप्त होत असते,असे म्हटले जाते.याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात अनेक कलावंतांचा सत्कार ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते होणार असून,या सर्वांचे योगदान नागपूरच्या संगीत क्षेत्रात अमूल्य राहीले आहे,असे पी.कुमार यांनी सांगितले.

या ज्येष्ठ कलावंतांनी उपराजधानीतील संगीत क्षेत्राला दिलेले योगदान याची परतफेड कधीही करता येणार नाही मात्र,करोना काळात याच संगीत कलेच्या माळेतून काही अमूल्य मोती अलगद निसटून गेले आणि त्या दू:खामुळे कलावंत जगत अद्यापही स्तब्ध आहे.त्यामुळेच  ज्या कलावंतांनी नागपूर शहरातील कला जगताला ऐकेकाळी आपल्या कलेच्या वैभवातून श्रृंगारित केले,रसिकांच्या मनात स्थान मिळवले,त्याची उजळणी आजच्या पिढीला व्हावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पी.कुमार सांगतात.

१९७०-८० च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे ऑकेस्ट्रा म्हणजे नवनीत ऑकेस्ट्रा,शशिझंकार, कादर ऑकेस्ट्रा,म्यूझिकल व्हिनर्स,योगेश ठक्कर ऑकेस्ट्रा,मेलोडी मेकर्स,खांडेकर ऑकेस्ट्रा,ऑकेस्ट्रा फनकार,हफिज ऑकेस्ट्रा,बिझीज इत्यादी ऑकेस्ट्रा ग्रूप्स हे सर्वाधिक लोकप्रियतेच्या सोपाणावर होते.आज ही या ग्रूप्सचे अनेक संचालक व कलावंत हे प्रसिद्धीपासून कलेच्या साधनेत व्यग्र आहेत.ऑस्करतर्फे त्यांच्या सन्मानाची लहानशी संधी साधण्याचा दूर्मिळ योग साधल्या जात असल्याचे पी.कुमार सांगतात.या महान कलावंतांना एकसाथ,एका मंचावर आणण्याचे धाडस आम्ही केले असून नागपूरकरांना हा कार्यक्रम म्हणजे सुवर्णकांचनयोगाची पर्वणीच असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात ज्येष्ठ कि-बोर्ड वाादक व गायक हर्षल थॉमस,गायिका ललिता थॉमस, सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक भोला घोष, सुप्रसिद्ध गिटार वादक प्रदीप पंच, ज्येष्ठ गायक पदमाकर तंत्रपाळे, सुप्रसिद्ध म्यूझिकल व्हीनर्स ऑकेस्ट्राचे संचालक विजय कीर्तने, सुप्रसिद्ध गिटार वादक रमेश खांडेकर,सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक  विजय नायडू,सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक पवन मानवटकर तसेच सुप्रसिद्ध रिदमिस्ट रघुनंदन परसतवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याप्रसंगी हफिज ऑकेस्ट्राचे संचालक व सुप्रसिद्ध गायक मोहम्मद हफिज, माणिक  उबाळे, साधना धामोरिकर,मोरेश्‍वर निस्ताने, महेश तिवारी, रमेश पुसम, डॉ.अर्चना देशमुख,अविनाश घोंगे,प्रकाश चव्हान, प्रमोद देशमुख,एम. ए.रज्जाक, विनोद पुरोहित, संजय बारापात्रे, साजिद कुरैशी,सागर जरेल,गुणवंत जाधव, पंकज सिंह, चारुदत्त जिचकार,रंजना कनोजिया,इकबाल भाई,मुनाफ भाई, नरेंद्र फाले, नज़ीर शेख़, राजेश तिवारी,विजय  येटे,अनिल भगत
,अनिल शुक्लावार,अशोक ढोके,शफीक अंसारी यांचा देखील सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पी.कुमार यांनी दिली.निवेदन श्‍वेता शेलगावकर यांचे राहील.
हा कार्यक्रम नि:शुल्क असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पी.कुमार व ऑस्कर अकादमीच्या सदस्यांनी केले.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या