फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगोरेवाडातून नागपूरकरांच्या घरात सिवेजचं पाणी!

गोरेवाडातून नागपूरकरांच्या घरात सिवेजचं पाणी!

Advertisements

ज्वाला धोटे यांचा खळबळजनक आरोप:मनपा आयुक्तांना दिले निवेदन
प्रतिबंधित गोरेवाडा तलावाचा सर्रास पाेहण्यासाठी उपयोग!
शहरातील तरुणाईसाठी झाला अय्याशीचा अड्डा:कंडोम्स,बिअरच्या बाटल्या,सिगारेट्सा खच,जुगाराचे अड्डे
गोरेवाडातील झुडपे आणि भग्न बंगले झाले असामाजिक तत्वांसाठी ‘सेफ झोन !’
गोरेवाडा तलावाची मालकी मनपाची,सुरक्षेची जबाबदारी मात्र खासगी कंपनी ओसीडबल्यूकडे!
सुरक्षा रक्षक,वन रक्षकांचे आर्थिक हितसंबंध की जीवाला धोका?
जाफर नगरमधील काही उच्चभ्रूंद्वारे सायलंसर लागलेल्या बंदूकीतून मोरांची शिकार!गोरेवाडातील स्थानिकांचा धक्कादायक आरोप
पोलिस आयुक्तालयात दिले निवेदन:त्वरित पोलीस चौकी करावी सुरु
नागपूरातील भाजपाच्या दोन्ही नेत्यांच्या बैठकांमध्ये जनतेशी संबंधित विषयांची चर्चा का नाही?धोटे यांचा जळजळीत सवाल
नागपूर,ता.२१ जून २०२४: ज्या गोरेवाडा तलावातून नागपूरकर नागरिकांची तहान भागविली जाते,शहरातील २५ ते ३० लाख नागरिकांच्या स्वयंपाक घरात गोरेवाडा तलावातील पाणी जलशुद्धीकरण प्लान्ट मधून पाणी शुद्ध करुन पोहोचत असल्याचा नागरिकांचा भाबडा समज आहे,ही नागपूर महानगरपालिकेद्वारा नागपूरकर जनतेची शुद्ध फसवणूक आहे.दाभा परिसरातील संपूर्ण सिवेज पाईप लाईन्स गोरेवाडा तलावात सोडण्यात आल्या असून, त्या ठिकाणचा जलशुद्धीकरण प्लान्ट म्हणजे जनतेच्या डोळ्यात मनपाद्वारे धूळफेक असून, सिवेजचे पाणी शुद्ध न होताच नागरिकांच्या स्वयंपाक घरात पोहोचत असल्याचा धक्कादायक आरोप ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ज्वाला धोटे यांनी मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना आज सोपविण्यात आलेल्या निवेदनात केला.गोरेवाडा तलावावरील जलशुद्धीकरण प्लान्ट हे फक्त नावापुरतेच असून, प्रदुषित पाणी सरळ-सरळ तलावात जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान लक्षात आले,असा दावा त्यांनी केला.तातडीने या तलावातील सीवरेज पाईप लाईन्स काढण्यात यावी तसेच ३० लाख नागपूरकरांच्या स्वयंपाक खोलीपर्यंत पोहोचणारे प्रदूषित पाणी थांबविण्यात यावे,अशी मागणी त्यांनी केली.

या निवेदनात त्यांनी अनेक खळबळजनक वस्तूस्थितींचा उहापोह केला. प्रतिबंधित गोरवाडा परिसरात खुलेआम अवैध गतिविधी घडत असून, या परिसराची सुरक्षा ज्या ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीकडे आहे त्या कंपनीचे सुरक्षारक्षक या अवैध गतिविधींना रोखण्यास सक्षम नसल्याचे वास्तव समोर आले असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.गोरेवाडा तलाव प्रतिबंधित असतानाही सकाळ,दूपार,सांयकाळीच नव्हे तर रात्री देखील सर्रास पोहण्याचा आंनंद लृटला जातो! ही धक्कदायक बाब असून महानगरपालिकेने तशी परवानगी दिली आहे का?पोहोणा-यांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षेचे उपाय योजिले आहेत का?कोणतीही दूर्घटना घडल्यास सराईत गोताखोर नेमले आहेत का?सर्रास गोरेवाडा तलावात उतरुन पोहोणा-यांना जीवनरक्षक जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत का? अपघात घडल्यास तलावात उतरण्यासाठी नाव (Boats)उपलब्ध आहेत का?जर गोरेवाडा तलाव हा सार्वजनिक तलाव नसून राखीव तलाव आहे तर यात कोणाच्या परवानगीने पर्यटक पोहोण्याचा आनंद लृटतात?त्यांच्या मूत्र विसर्जनाचे पाणी नागपूरकरांना पिण्यास का बाध्य केले जात आहे?असा सवाल त्यांनी निवेदनात केला.

गोरेवाडा तलाव मनपाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे का?अशी विचारणा करीत,केवळ पोहोणेच नव्हे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या,सिगारेट्सचे तुकडे,कंडोम्सची पाकीटे सापडली असून,गेटवरील दोन्ही सुरक्षा रक्षकांना गुंगारा देत प्रेमी युगल हे  झुडपात अश्‍लील कृत्य करीत असल्याचे आढळून आले!याविषयी ओसीडब्ल्यू कंपनीच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना विचारले असता,आम्ही त्यांना अडवू शकत नाही आमच्या जीवाला धोका असल्याचे अजब उत्तर त्यांनी दिले.वनरक्षक तसेच या सुरक्षा गार्ड यांचे या मागे आर्थिक हितसंबंध जोपासले तर जात नाही ना,याचा मागोवा घेण्यात यावा,अशी मागणी ज्वाला धोटे यांनी आपल्या निवेदनात केली.मूळात गोरेवाडा तलावाची सुरक्षा मनपाच्या अखत्यारितीत असताना ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीला कशी काय सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली?याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी धोटे करतात.

गोरेवाडा प्लान्टच्या गेटच्या आत राहणा-या नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या परिसरात रात्रीला जुगाराचे अड्डे देखील चालतात.पूर्वी त्यांच्या क्वाटरपर्यंत मोर यायचे,दाणे खायचे आता मात्र,मोर दिसत नाही,जाफर नगर मधील काही उच्च वर्गीय नागरिक हे सायलंसर लागलेल्या बंदूकी घेऊन त्या ठिकाणी शिकारीसाठी येत असल्याचे धक्कदायक वास्तव तेथील नागरिक सांगतात. तातडीने त्या ठिकाणी ओसीडब्ल्यूची खासगी तसेच नागपूर पोलिसांची सुरक्षा चौकी  तैनात करण्यात यावी.त्या ठिकाणी काही  ब्रिटीशकालीन इमारती असून ज्या आता भग्नावस्थेत आहेत. त्या इमारतीच्या आत जुगार,दारुच्या पार्ट्या,अश्‍लील गतिविधी घडत आहेत.पुराव्या दाखल दोन व्हिडीयोज,गिट्टीखदान पोलीस ठाण्याला दिले असून दोन तरुण मुलांना अटक करुन पोलिसांनी समज देखील दिली आहे.

गेल्या दीड वर्षापासून या सर्व अवैध गतिविधीबाबत ‘अन्याय निवारण समितीची’ अध्यक्ष म्हणून मी ज्वाला धोटे सतत आपल्याला सुचना देत आहे मात्र,कोणतीही कारवाई झाली नाही.नुकतेच या तलावात एक १५ वर्षाचा मुलगा बूडून मृत्यू पावला.दीड-दोन वर्षा पूर्वी एका प्रियकराने प्रेयसीला गोरेवाडातील याच झुडपांचा आधार घेत जाळून टाकलं. हा परिसर तरुणांसाठी धोकादायक झाला असून, या तलावात जर कोण्या विघ्नसंतोषी लोकांकडून विषारी द्रव्य टाकण्यात आल्यास नागपूर शहरात त्राही-त्राही माजेल,यासाठी कोण जबाबदर असेल?असा सवाल त्यांनी केला.

या सर्व बाबी लक्षात घेऊन तातडीने मनपा आयुक्तांनी तसेच पोलिस आयुक्तांनी नागपूरकर जनतेच्या जिवितेच्या सुरक्षतेसाठी पावले उचलावी.पोलिस आयुक्तांनी त्वरित गोरेवाडा येथे पोलिस चौकी सुरु करावी,अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.

नागपूर शहरासाठी धोरण राबविणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार तसेच उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच सरकारी अधिका-यांसोबत बैठका घेतल्या मात्र,नागपूरकर जनतेच्या जिव्हाळ्याचे स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी,आरोग्य,वीज,रस्ते,शिक्षण,पर्यावरण इत्यादी अश्‍या किती विषयांवर शासकीय अधिका-यांसोबत चर्चा केली?असा सवाल त्यांनी केला. गडकरी यांनी नाग नदी स्वच्छतेचा दोन हजार चारशे चौतीस कोटींच्या प्रकल्पासाठी शासकीय अधिका-यांना घेऊन बैठक पार पाडली तर फडणवीस यांना कोराडीचे जगदंबा संस्थान,सीताबर्डीचे रिसर्च सेंटर,पूर्व नागपूरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलवर चर्चा करने महत्वाचे वाटले.हे सर्व विषय नेत्यांसाठी महत्वाचे असले तरी नागपूरकर जनतेसाठी अति महत्वाच्या असणा-या विषयांवर देखील तातडीने बैठक घेऊन, गोरेवाडासह शहरातील रस्ते,खड्डे,अपघात ,तलाव व पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे ही नागपूर शहराच्या या दोन्ही भाग्यविधात्यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केली.

याप्रसंगी नागपूरचे महाराजा श्रीमंत राजे मुधोजी भोसले हे देखील उपस्थित होते.याशिवाय शिष्टमंडळात चार्टड अकऊंटंट सुनील चोखारे,माजी स्थायी समिती अध्यक्ष देवराव तिजारे,ॲड.विलास राऊत,अनिल अवस्थी,जावेद पठाण,शंकर बर्मन आदी यांचा समावेश होता.
……………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या