फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेडीकलमध्ये माऊलींनी अनुभवला माणूसकीचा झरा

मेडीकलमध्ये माऊलींनी अनुभवला माणूसकीचा झरा

Advertisements

पतीच्या मृत्यूनंतर खडसेंनी केले अंत्यसंस्कार

नागपूर,ता.९ जून २०२४: जगात आज सर्वदूर युद्धाची स्थिती आहे.लाखो माणसे ही अकाली मृत्यूमुखी पडत आहेत.लाखो लहानगे अनाथ झाले,महिला,वृद्ध उधवस्त झालेत,केवळ काही क्षेत्रफळ जमीनीच्या तुकड्यासाठी,जगावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक युद्धखोर देश यांनी माणूसकीला काळीमा फासली असताना, उपराजधानीतील मेडीकल रुग्णालयात एका महिलेने मात्र ‘माणूसकी’चा हात पुढे आलेला अनुभवला.अवघ्या चाळीस वर्षीय मंदा उपन यादव यांनी हा माणूसकीचा झरा उपराजधानीच्या मेडीकलमध्ये अनुभवला.
मंदा यांचे पती उपन यादव हे मागील तीन दिवसांपासून मेडीकलमध्ये भर्ती होते.अत्यधिक मद्य सेवनामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.अखेर ९ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला मात्र,हिवरखेड मोर्शी,जिल्हा अमरावती येथे पतीचे पार्थिव घेऊन जाण्यास मंदा या असमर्थ होत्या.एक ही पैसा पदारात शिल्लक नव्हता.जगण्याचा नव्हे तर मरणाचा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा ठाकला असताना, भाजपचे दक्षीण-पश्‍चिमचे उपाध्यक्ष पिंकू खडसे त्यांच्या मदतीला धावले.
त्यांनी मंदा यांना आधी मेडीकलसमोरील भोजनालयात पोटभर जेवू घातले.यानंतर पिंकू यांनी आपल्या शववाहिकेमधून गंगाबाई घाटमध्ये उपन यांचा अंत्यसंस्कार केला.मंदा यांची मोर्शीची तिकीट काढून दिली व हातात हजार रुपये वरखर्चासाठी दिले.आयुष्याच्या इतक्या भयाण आणि उधवस्त परिस्थितीत एवढी मदत म्हणजे जणू देवदूताप्रमाणेच मंदा यांना भासली.
आयुष्याचा जोडीदार तर अर्धा डाव मोडून अनंताच्या प्रवासासाठी निघून गेला,अनोळखी शहरात अनोळखी माणसांमधील तिचा वावर हा भेदरलेलाच होता. अश्‍यावेळी पिंकूसारखे देवदूत धावून आले आणि तिच्या डोंगरा एवढा दूखात माणूसकीचा हातभार लावला.पाणावलेल्या डोळ्यांनी तिने हजार वेळा पिंकूचे आभार मानले.दररोज हजारो मरण अनुभवणारी मेडीकलची वास्तू देखील माणूसकीच्या या अनुभवातून गहीवरली असेल,हे मात्र निश्‍चित.
…………………………….
[संपर्क क्रमांक पिंकू खडसे- ७५५८७७३७८४]
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या