फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशजागे व्हा अन्यथा...परिणाम भोगा

जागे व्हा अन्यथा…परिणाम भोगा

(भाग-१)

नागपूर,ता.२७ मार्च २०२४: जगभरातल्या बातम्यांमध्ये आज मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित एक बातमी ही अतिशय महत्वाची होती.सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कबूल केल्याप्रमाणे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसह हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत,या मागण्यांसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांनी सुरु केलेले उपोषण आज २१ दिवसांनंतर सोडले.उपोषण सोडले असले तरी लढा सुरुच राहील,हा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणाची मागणी करत सोनम वांगचूक यांनी यापूर्वीही उपोषण केले होते.यावेळी त्यांनी लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचीही मागणी केली आहे.जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करताना लडाखला केंद्र शासित राज्याचा दर्जा देण्यात आला आहे.लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी व हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या लढ्यात लडाखमधील हजारो नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.या २१ दिवसात वांगचूक यांनी फक्त मीठ आणि पाण्याचे सेवन केले.हे उपोषण ‘मरेपर्यंत’ही लांबवता येईल,असा इशाराही त्यांनी दिला होता.

हिमालयाच्या पर्वत रांगेतील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचा गंभीर मुद्दाकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी वांगचुक यांनी कडाक्याच्या थंडीत गेल्या वर्षी जानेवरी महिन्यात उपोषण सुरु केले होते.समुद्रसपाटीपासून तब्बल १८ हजार ३८० फूट उंचावर उणे २० अंश तापमान असलेल्या खारदुंग ला येथे आपल्या संस्थेच्या आवारात २६ जानेवारी रोजी पासून ते आंदोलन करीत होते.या आंदोलनाला त्यांनी ‘क्लायमेट फास्ट’असे नाव दिले आहे.संविधानाच्या ६ व्या अनुसूचीचा विस्तार आणि अनियंत्रित औद्योगिक आणि व्यवसायिक विस्तारापासून पर्यावरण संरक्षण,नियोजनशून्य उत्खनन थांबविणे यासारख्या लडाखच्या नागरिकांच्या मागण्यांकडे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लक्ष द्यावे,अशी त्यांची मागणी आहे.

यावरुन देशातील एक नागरिक पर्यावरणाला घेऊन किती जागरुक व पर्यावरण संरक्षणाप्रति किती गंभीर आहे याची प्रचिती येते.सध्या देशातच नव्हे तर जगातच विकास तसेच औद्योगिकरणाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानि सुरु आहे.वेळोवेळी जगभरातील विविध संस्था या त्याच्या गंभीर परिणामांची वेळोवेळी चिकित्सा करीत असते.

भारताने २०१५ ते २०२० या काळात तब्बल ६ लाख ६८ हजार ४०० हेक्टर जंगल गमावले आहे.जंगलाच्या -हासाच्या संदर्भात भारत ब्राझील पाठोपाठ दूस-या क्रमांकावर आहे.या संदर्भातील अभ्यास एका आंतरराष्ट्रीय संकेलस्थावर गेल्या वर्षी २९ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाले होते.१९९० तक २००० या काळखंडोत हीच जंगलतोड ३ लाख ८४ हजार हेक्टर एवढी असून,एवढ्या दशकात भारताने एवढे जंगल कायमचे गमावले आहे.(https;//ourworldindata.org)या संकेतस्थळावर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

एका दुस-या जागतिक संशोधनात चिंताजनक निष्कर्ष समाेर आले.जागतिक सरासरी तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास किंवा सध्याच्या पातळीपेक्षा वाढले तर भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांतील २२० कोटींहून अधिक लोकांना असह्य उन्हाळ्याला तोंड द्यावे लागणार आहे.या तापमानवाढीमुळे लोकांमध्ये उष्माघात आणि ह्दयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढेल.हे संशोधन ‘प्रोसिडिंगज्य ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’(पीएनएएस)या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या निष्कर्षात वरील संभाव्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान बदलावरुन सोलरमॅन डॉ.चेतनसिंग सोलंकी यांनी देखील गंभीर इशारा देत,हवामानातील बदलामुळे लाखो वर्षांपूर्वी डायनोसोरची प्रजाती लृप्त झाल्याचे सांगितले.सद्यस्थितीत अशाप्रकारचा धोका मानवासाठीही निर्मित होत आहे.त्यामुळे तत्काळ कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करुन सौरउर्जेकडे वळण्याची गरज त्यांनी गेल्या वर्षी १४ जानेवरी २०२३ रोजी नागपूरातील एका व्याख्यानात व्यक्त केली होती.ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन व के-सोलारे एनर्जी प्रा.लि.,ईसीई एनर्जीज प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जलवायु परिवर्तन व उर्जा साक्षरता’ विषयावरील हे व्याख्यान होते.१९७० ते १९८० च्या दशकात जगभरात ३१३ पूर आले होते.तर २०१० ते २०२० या दशकात १३०० च्या वरर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.त्याच बरोबर चक्रीवादळ,जंगलाला लगलेले वणवे,समुद्रात झपाट्याने वाढवित असलेला पाण्याचा स्तर,वेगाने वितळणारे बर्फ,पृथ्वीवर झपाट्याने वाढलेल्या आपत्तीमागील मुख्य कारण हवामानातील बदल आहेत.

पृथ्वीचे तापमान प्रचंड वेगाने वाढत असून,बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे भविष्यात डायनोसोरसारखेच मानव प्रजातीही लृप्त होईल.ग्लोबल वार्मिंग,हवामानातील बदलाला कार्बनडाई ऑक्साईड जबाबदार असून,कार्बनच्या उत्सजर्नाच्या अतिरेकाला प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे.उत्सर्जन घटविण्यासाठी प्रत्येक मानवाने आतापासून सोलर उर्जेवर शिफ्ट होण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली होती.

(पूर्वार्ध)

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या