
अडबोले यांना १६ हजार ७०० मत:गाणारांना ८ हजार २११ मत
एकूण ३२ हजार ९८५ मत वैध
शिक्षक पुन्हा ‘नापास’:१ हजार ४१५ मते ठरली अवैध
विजयी कोटा १६ हजार ४७३: अडबोलेंना विजयी कोटापेक्षा २३७ मत अधिक
नागपूर,ता.२ फेब्रुवारी २०२३: विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव करीत आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी नेत्रदिपक विजय मिळवला.अडबाले यांना १६ हजार ७०० मते मिळाली असून गाणार यांच्या पारड्यात शिक्षक मतदारांनी ८ हजार २११ मते टाकली.एकूण ३४ हजार ३६० मते वैध ठरली तर पुन्हा एकदा शिक्षकच निवडणूकीच्या परिक्षेत नापास झाले असून तब्बल १ हजार ४१५ मते ही अवैध ठरली.विशेष म्हणजे पहील्या फेरीतच अडबाले यांनी गाणारांपेक्षा दुप्पट लीड घेतली होती.पहील्या फेरीत अडबाले यांना १४ हजार६९ मते प्राप्त झाली तर गाणार यांना पहील्या फेरीत ६ हजार ३६६ मते मिळाली.
सकाळी अजनी येथील सामुदायिक भवनात ८ वाजता पासून मतमोजणीस प्रारंभ झाला. एकूण ३४ हजार ३६० मतपत्रिकांपैकी प्रारंभी २८ टेबलवरील पहिल्या २८ हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली. यानंतर त्यातील अवैध (डाऊटफूल ) मतपत्रिकांची तपासणी सुरू झाली यांनतर कोटा ठरणार होता.
दुपारी ३.२५वा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी पहिल्या पसंतीच्या २८ हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली.

सकाळी ८ वा. पासून एकूण २८ टेबलवर प्रत्येकी १ हजार मतपत्रिका या प्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण ३४ हजार ३६० मत पत्रिकांपैकी २८ टेबलवरील २८००० मत मोजणीत पहिल्या पसंतीची मते मोजण्यात आली.
पहील्या फेरीतील मत मोजणीत पहिल्या पसंतीची मते पुढील प्रमाणे-
वैध मत :२६,९०१
अवैध मत : १,०९९
उमेदवारांना प्राप्त मत खालील प्रमाणे
१)सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : ४३९
२)प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) :३०३
३) देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) :६१८
४) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : २७४२
५)अजय भोयर (अपक्ष) :१०९०
६) सुधाकर अडबाले (अपक्ष) : १४,०६९
७) सतिश इटकेलवार (अपक्ष) :६०
८) बाबाराव उरकुडे (अपक्ष) : ७९
९)नागो गाणार (अपक्ष) : ६,३६६
१०) रामराव चव्हाण (अपक्ष ): ११
११) रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : ३६५
१२) नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : ०८
१३) निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : ५१
१४) नरेंद्र पिपरे (अपक्ष) :३२५
१५) प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : ४३
१६) इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): ५६
१७) राजेंद्र बागडे (अपक्ष) : ४२
१८) डॉ.विनोद राऊत (अपक्ष):४६
१९) उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): ६१
२०) श्रीधर साळवे (अपक्ष): ४
२१) प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): ६४
२२) संजय रंगारी (अपक्ष):५९
यानंतर दुपारी ३.२५ वा. पासून दुसऱ्या फेरीतील ६,३६० मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्याचेही डॉ. बिदरी यांनी सांगितले.दुसऱ्या फेरीतील ६ हजार ३६० मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. दुस-या फेरीत अडबोले यांनी पुन्हा आघाडी घेत ६ हजार ३६० पैकी २ हजार ६३१ मते घेतली तर दुस-या फेरीत नागो गाणारांना एक हजार ८४५ मते मिळाली.राजेंद्र झाडे यांना ६१६ मते मिळाली,दुस-या फेरीत ३१६ मते अवैध ठरली.
दोन्ही फे-यातील मतमोजणीनंतर उमेदवारांना मिळाली मते पुढीलप्रमाणे-
१)सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) : ५१४
२)प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष) :३७३
३) देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) :८६३
४) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : ३,३५८
५)अजय भोयर (अपक्ष) :१,२०८
६) सुधाकर अडबाले (अपक्ष) : १६,७००
७) सतिश इटकेलवार (अपक्ष) :८९
८) बाबाराव उरकुडे (अपक्ष) : ८७
९)नागो गाणार (अपक्ष) : ८,२११
१०) रामराव चव्हाण (अपक्ष ): १२
११) रवींद्रदादा डोंगरदेव (अपक्ष) : ४३३
१२) नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष) : १४
१३) निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष) : ६६
१४) नरेंद्र पिपरे (अपक्ष) :५२१
१५) प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष) : ५५
१६) इंजिनिअर प्रो. सुषमा भड (अपक्ष): ८०
१७) राजेंद्र बागडे (अपक्ष) : ५४
१८) डॉ.विनोद राऊत (अपक्ष):५९
१९) उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष): ७३
२०) श्रीधर साळवे (अपक्ष): ९
२१) प्रा सचिन काळबांडे (अपक्ष): ९२
२२) संजय रंगारी (अपक्ष):७४
निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोवडा, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि उपायुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.
तत्पूर्वी, आज सकाळी अजनी येथील मेडीकल रोडवर स्थित समुदाय भवनात ७.३० वा. मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरुम बंदोबस्तात इनकॅमेरा उघडण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.विजयलक्ष्मी बिदरी यांनी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक,अधिकारी-कर्मचारी,उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदिंना गोपणीयतेची शपथ दिली. ८ वा. पासून मतमोजणीस सुरूवात झाली. मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात आल्या व त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात झाली. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी या प्रमाणे उपस्थिती होती.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आयोगाच्या परवानगीने विजयी उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
(मतमोजणी सुरु होण्यापूर्वी सुधाकर अडबाले यांनी सहकुटूंब व समर्थकांसह टेकडी गणपतीचे असे दर्शन घेतले)

आमचे चॅनल subscribe करा