

विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी
खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा प्रारंभ
नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली.
याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांनी झिरो माईल मेट्रो ते खापरी मेट्रो स्थानका दरम्यान मेट्रोने प्रवास केला. यानंतर त्यांनी खापरी मेट्रो स्थानकाला नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग क्रमांक-२ व मार्ग क्रमांक-४ अंतर्गत ‘कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक’ आणि ‘कस्तुरचंद पार्क ते प्रजापती नगर मेट्रो स्थानक’ या मार्गांवरील मेट्रो वाहतूक सेवेचे लोकार्पण केले. या टप्प्यातील ४० कि.मी. मार्गावर ३६ मेट्रो स्थानकांचा समावेश असून या प्रकल्पासाठी ९३०० कोटींचा खर्च झाला आहे.
मेट्रो विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ३२ स्थानकांचा समावेश आहे. हा टप्पा ४३.८ कि.मी. अंतराचा आहे. यासाठी ६७०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. यात उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगणापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. भविष्यात नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.
खापरी मेट्रो स्थानक आणि मेट्रो ट्रेन सजविण्यात आली होती. याप्रसंगी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षीत, तसेच नागपूर मेट्रोचे अधिकारी सुनिल माथूर, अनिल कोकाटे, अतुल गाडगीळ, हरिंदर पांडे, उदय बोलवनकर आदी उपस्थित होते.
ऑटोमोटिव्ह चौक आणि प्रजापती नगर मार्गावर प्रवासी सेवा सुरु-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ऑटोमोटिव्ह चौक ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन) आणि प्रजापती नगर ते सीताबर्डी इंटरचेंज (एक्वा लाईन) – या मार्गांवरील पहिल्यांदा मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत प्रवासी सेवा तिथे सुरु केली. या सोबतच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या फेजचे लोकार्पण देखील पंतप्रधानांनी या निमित्ताने केले. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचा शिलान्यास देखील पंतप्रधानांनी या प्रसंगी केला. मेट्रो सेवा सुरू झाल्याने शहराच्या चारही दिशांना प्रवाशांची सोय होणार आहे.
. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या फेज अंतर्गत ३२ स्थानके आहेत आणि उत्तरेला कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर (कापसी ) आणि पश्चिमेला हिंगणा असं एकूण पासून ४३.८ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. यात २ स्थानकांसह १.२ किमी अंतर आहे आणि ३० स्थानकांसह उंचीवर ४२.६ किमीचा मार्ग आहे.
महामेट्रो नागपूरच्या चारही दिशांना असलेल्या मार्गिका येथे दर्शवण्यात आलाय होत्या. यात प्रामुख्याने डबल डेकर व्हाया-डक्ट, झिरो माईल मेट्रो स्टेशन, नुकतेच महा मेट्रोला मिळालेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मानांकन दर्शवण्यात आले आहेत. आणि तेथे प्रदर्शित केलेले विविध फलक पाहिले. त्यांनी महा मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-१ च्या मॉडेलचीही पाहणी केली. मॉडेल आणि डिस्प्ले पाहिल्यानंतर, पंतप्रधानांनी यांनी स्वतः तिकीट घेतले आणि पुढील प्रवासासाठी ट्रेनमध्ये प्रववश करण्याकरिता प्लॅटफॉर्मवर गेले.
पंतप्रधानांनी आज मेट्रो प्रवासादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद ही साधला आणि त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल विचारले. त्यांनी विविध स्टार्ट-अपमधील तरुण उद्योजक आणि दिव्यांग व्यक्तींशी ही संवाद साधला. पंतप्रधानांनी दिव्यांग संस्थांकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
आपल्याला प्रवासाची संधी मिळाली हे आपल्याकरिता अतिशय आनंदाची बाबा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधानांना अभिनंदन पत्र सुपूर्द केले, जे त्यांनी आनंदाने स्वीकारले.या दोन्ही मार्गांवर सुरू झालेल्या सेवांचे सर्वांनीच स्वागत केले असून येत्या काही दिवसांत मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.




आमचे चॅनल subscribe करा
