

कोलकाता १७ नोव्हेंबर २०२२: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आज गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी उत्तर बंगालमधील सिलीगुडी येथील एका कार्यक्रम सोहळ्यात मंचावर उपस्थित असताना अचानक भोवळ आली. शहराच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या चौपदरी रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी गडकरी त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना भोवळ आली.
कार्यक्रमाच्या मध्यभागी केंद्रीय मंत्र्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली. गडकरी यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात अचानक घट झाल्यामुळे केंद्रीय मंत्री यांना भोवळ आली होती..
डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले, असे एका भाजप नेत्याने सांगितले. सिलीगुडीच्या डागापूर मैदानावर एका कार्यक्रमात गडकरी यांना मंचावरच अस्वस्थ वाटत होतं. मंचावर असताना त्यांच्या शरिरातील साखरेचे प्रमाण कमी झाले व त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आल्याने त्यांना लगेच मंचावरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने सलाईन लावण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिस आयुक्तांना परिस्थितीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. गडकरी यांना कार्यक्रमस्थळावरून भाजप नेते राजू बिश्त यांच्या निवासस्थानी नेण्यात आले व तेथे त्यांना विश्रांतीसाठी ठेवण्यात आले.
सिलीगुड़ी येथे गुरुवारी चार लेनच्या हाईवेचे भूमिपूजन करण्यासाठी गडकरी हे सकाळी ११ वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचले. मात्र,यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये घसरण झाली. त्यांच्या ताफ्यामधील, गडकरी यांचे नियमित डॉक्टर पी.डी भूटिया यांनी त्वरित त्यांची तपासणी केली.
गडकरी कार्यक्रमाच्या प्रारंभी अगदी बरे होते.कार्यक्रमात इतर मान्यवरांच्या सोबत दिप प्रज्वलन करीत असताना त्यांना अस्वस्थता जाणवली.गडकरी यांनी याची तक्रार करताच त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांनी व अधिका-यांनी त्यांना मंचावरुन खाली उतरवले.
यांनतर त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनविण्यात आला व खासदार राजू बिश्त यांच्या घरी त्यांना आरामासाठी नेण्यात आले. राजू बिश्त यांनी सांगितल्यायप्रमाणे, गडकरी यांची तब्येत आता अगदी उत्तम असून ते माझ्या घरी अगदी सुरक्षित आहेत.गडकरी हे नियोजित कार्यक्रमात दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित राहणार असल्याचे देखील ते म्हणाले.
सिलीगुड़ी येथून येणा-या माहितीनुसार सुरवातीला गडकरी यांना त्वरित मंचावरुन खाली उतरवून पुन्हा ग्रीन रुममध्ये नेण्यात आले होते. त्या ठिकाणी सर्वात आधी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.यानंतर त्यांना खासदार राजू बिश्त यांच्या निवास स्थानी आरामासाठी नेण्यात आले.
यानंतर त्यांचे इतर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ते दिल्लीला देखील प्रस्थान करण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी जवळपास ११ वाजता गडकरी सिलीगुड़ीत पहोचले व दार्जिलिंग जंक्शनच्या जवळ त्यांनी दागापुर मैदानमध्ये एका जनसभेला संबाेधित केले. बालासन ते सेवक छावनी पर्यंत एक हजार कोटींच्या लागतने चौपदरी रस्त्याचे बांधकाम होणार असून, त्या कामाच्या भूमिपूजनासाठी गडकरी हे सिलिगुडीला पोहोचले होते.
गडकरी यांच्या ताफ्यातील नियमित डॉक्टर पी.डी. भूटिया यांनी सांगितल्याप्रमाणे गडकरी यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने दररोज जेवनापूर्वी त्यांच्या शरिरातील साखर तपासली जात असते.आज देखील ते साखरेच्या तपासणीसाठीच मंचावरुन खाली उतरले होते,असे डॉ.भूटिया यांचे म्हणने आहे.गडकरी यांची तब्येत पूर्णपणे स्वस्थ असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे ते सांगतात.”
गडकरी यांची तब्येत या पूर्वी देखील काही कार्यक्रमांच्या दरम्यान अश्याच रितीने खराब झाली होती.या पूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये अहमदनगर येथे मंचावर उपस्थित असताना त्यांना भोवळ आल्याने ते बेशुद्ध देखील झाले होते.याशिवाय एप्रिल २०१० मध्ये, दिल्ली येथील जंतर मंतर येथे एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना चक्कर आल्याने खाली पडले असल्याचे बोलले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
