Homeनागपूर न्यूजउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध गणेशोत्सव मंडळांना भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध गणेशोत्सव मंडळांना भेट

श्रीगणेशाचे घेतले दर्शन

नागपूर, दि. ०७ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचे पुजन करून दर्शन घेतले.

गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके तसेच माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्रिकोणी पार्क गणेश उत्सव मंडळ, धरमपेठ झेंडा चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश उत्सव मंडळ धरमपेठ गल्ली न.४, गणेशोत्सव मंडळ दाभा, गोविंद इन्क्लेव्ह गणेशोत्सव मंडळ सेमीनरी हिल्स, श्री जय गणेश उत्सव मंडळ आझाद चौक, सदर, गणेश उत्सव मंडळ दीक्षित नगर नारी, पवनपुत्र गणेशोत्सव मंडळ पवनपुत्र सोसायटी नारा रोड, एकता युवा गणेश उत्सव मंडळ एकता नगर येथील गणेशाची उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते पुजन करण्यात आले असून गणेश मंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री यांचे शाल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

याशिवाय शिक्षक सहकारी बँक इतवारी शाखा येथील हरीश महाजन यांच्या घरी गणेशाची पुजा, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ झाडे चौक लालगंज, अशोक स्तंभ गणेश उत्सव मंडळ सीरा रोड, जागृतेश्वर गणेश उत्सव मंडळ गोलीबार चौक पाचपावली, जलालपुरा गणेश उत्सव मंडळ, व्यंकटेश गणेश उत्सव मंडळ व्यंकटेश कॉलनी, वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ हिवरी नगर, शिवराय गणेशोत्सव मंडळ वाठोडा खरबी, अश्वमेध गणेशोत्सव मंडळ म्हाळगी नगर, नागोबा मंदिर गणेशोत्सव मंडळ ओम नगर, रामदास पेठ गणेश उत्सव मंडळ रामदास पेठ येथील मंडळांच्या गणेशजीचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी दर्शन घेतले.

Latest बातम्या