

जीवनावश्यक वस्तुंच्या महाग़ाई विरोधात मोदी शासनाविरोधात नारे निदर्शने
नागपुर,२४ ऑगस्ट २०२२ : भाजीपाल्यापासुन अनेक जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी सारखा राक्षसी कर लाऊन गरिबांचे जीवन असह्य करुन टाकल्याच्या निषेधार्थ, आम आदमी पक्ष उत्तर नागपूरच्यावतीने कपिल नगर चौक येथे प्रचंड नारे निदर्शने करण्यात आले.
यावेळी केंद्रशासनाच्या ग़रीब विरोधी धोरणाचे पितळ उघड़े पाडण्यात आले . आज दुपारी उत्तर नागपुर आप चे अध्यक्ष रोशन डोंगरे, सचिव डॉ. अमेय नारनवरे , संगठनमंत्री प्रदीप पौंनिकर, कोषाध्यक्ष नरेश महाजन यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनात,उत्तर नागपूरातील सर्वसामान्य जनता आणी कार्यक़र्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
‘हाय महँगाई हाय हाय महँगाई -ये कहाँ से आयी -मोदी ने लाई ,अशा अभिनव ना-यांनी, कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
मोदी सरकार नको त्या कार्यासाठी हज़ारो कोटी रुपये ख़र्च करते मात्र ग़रीब कामगार आणि हातावर आणुन पानावर खाणा-या लोकांकडुन कराच्या रूपाने कर वसुल करते अशी टिकाही आपच्या नेतृतवाने या प्रसंगी केली. पेट्रोल , डिझेल यांचे भाव आकाशाला भिडले आहेत, स्वयंपाकाचा सिलेंडर हजारच्या पार गेला आहे . “कच्ची सब्जी कच्चा भात , खाओ मोदीजी हमारे साथ “ असे नारे देत शासनाच्या मोफत धान्य धोरणावरही या प्रसंगी नारे निदर्शानातून टीका करण्यत आली .
मोदी सरकारच्या गरीबांना शिक्षणापासून, नोकऱ्यांपासून वंचित ठेवाण्याच्या धोरणावरही या वेळी कडाडुन टीका करण्यात आली .
आंदोलनात शंकर इंगोले,प्रदिप पौनिकर, डॉ.अमेय नारनवरे, नरेश महाजन, सुनील मैथु, विजय नंदनवार,अमित दुरानी,परीस भहोतकर,माणशिंग अहिरवार,अब्दुल सलाम,मोरेश्वर मौंदेकर,विशाल लांजेवार, विजय राठोड, पंजाब राठोड, निलम नारनवरे ,लता मॅडमे, अंजु मरतवाडे, योगिता जनबंधु,सतीश सोमकुंवर, पंकज मेश्राम, विशाल वैद्य, स्वप्नील सोमकुंवर, शुभम मोरे, सचिन कांबळे, संकेत चरडे,गीता मेश्राम, उषा नागेश्वर, करुणा बांबोलेजयश्री बडगे, रंजना पाटील, नरेश देशमुख,नानक धनवाणी , शैलेश गजभिये, संजय चांदेकर,हिमांशू तांबे,मनोज वरघड, गोलू आंबडे, नंदू नागरारे,साम्ये रामटेके, बबलू गवळी,वरून ठाकूर,अरुण गुणारकर,रविकांत चौरसिया, तुषार गेडाम अनिल संभे, क्लीमेंट डेव्हिड,रवींद्र गिधोंडे,अविनाश सोरते, पवन मोरे, रवींद्र गोखले, पप्पू दुधगवली, स्वाती तारवानी,सचिन चरोटे,नामदेव गेडाम,मॅहोन मेश्राम यांचा सहभाग लाभला.

आमचे चॅनल subscribe करा