फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमविवाह हा संस्कार की...बलात्काराचा अधिकृत परवाना्!

विवाह हा संस्कार की…बलात्काराचा अधिकृत परवाना्!

Advertisements

विवाह हा संस्कार की…बलात्काराचा अधिकृत परवाना्!

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

जगदलपूर येथील एका महिलेला नवऱ्याने केलेल्या अनैसर्गिक कृत्यामुळे मृत्यूला कवटाळावे लागले! मेटगुडा येथे ११ डिसेंबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. तिचा नवरा, सात जन्माचा जोडीदार, आयुष्याचा भागीदार गारेखनाथ शर्मा वय वर्षे ४०,याने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. अत्याधिक रक्तस्त्राव झाल्याने तिच्या बहीणीने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दीड तासानंतर तिचा मृत्यू झाला! या प्रकरणात रुग्णालयात कार्यकारी दंडाधिकार यांना बोलावूून पीडितेची मृत्युपूर्वी जबानी नोंदवण्यात आली होती. शवविच्छेदनातही तिचा मृत्यू अनैसर्गिक कृत्याने झाल्याचे निष्पन्न झाले. बलात्कार, अनैसर्गिक कृत्य आणि सदोष मनुष्यवध या कलमान्वयेे बोधघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व साक्षीदार फितूर झाल्यानंतरही पोलीस, न्यायनिर्णायक अधिकारी अर्चना धुरंधर, शवविच्छेदन करणारे डॉक्टर,मृत्यूपूर्वी जबानी घेणारे दंडाधिकारी आणि पीडित महिलेच्या बहीणीची जबानी साक्ष् या आधारावर न्यायमूर्ती कु.सुनीता साहू यांनी नुकतेच जागतिक महिला दिनी ८ मार्च २०१९ रोजी आरोपीला २० वर्षांची शिक्षा ठोठावली.

…. प्रश्‍न तरीही अनुत्तरीतच उरतो. तिला जगण्याचा हक्क नव्हता का? फक्त देव,अग्नि,ब्राम्हण आणि समाजासमोर विवाह संस्कार पार पडलेत म्हणून तिच्या देहावर ‘नवरा’ म्हणून त्याचा कायदेशीर हक्क स्थापित झाला? गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी गरिमामय इतिहास बाळगणाऱ्या भारत या देशातील संसदेत ‘विवाहनंतर होणाऱ्या बलात्कारावर’फक्त चर्चाच घडून येते. ठोस कायदा झाला असता तर…कदाचित या आणि अश्‍या कितीतरी दूर्देवी महिलांचा जीव वाचला असता किंबहूना दररोजचं आयुष्य नरक होण्यापासून वाचलं असतं. संस्कृती,परंपरा, इतिहास इत्यायदीच्या नावाखाली आणखी किती दशके..किती शतके…तिच्या देहावर विवाह नावाच्या संस्काराखाली बलात्कार घडत राहणार? झोपडपट्टी असो,मध्यम वर्गीयांची बेडरुम असो किवा उच्च वर्गीयांची जीवनशैली असो..थोड्याफार फरकाने वरील चित्रच ठलकपणे दिसून पडतं. ज्येष्ठ समाजसेविका सीमा साखरे यांनी देखील राज्याची राजधानी दिल्लीत एका झोपडपट्टीत मध्यरात्री आठ महिन्याच्या गरोदर बाईला मार खाताना आणि ओरडताना बघितले. का मारतोस? विचारले तर ती मजूर महिला आपल्या मजूर नवऱ्याला देहाचे सुख देण्यास नकार देत होती यामुळे आधीच दोन मुलांची आई असलेल्या… वरुन आठ महिन्याची गरोदर असताना तिने नवऱ्याची मर्जी सांभाळायलाच हवी! हा ‘अलिखित नियम’ जणू शास्त्रातच सांगितला असल्याच्या अर्भिभावात नवरा तिला तुडवत होता. अहं. आश्‍चर्यं म्हणजे शेजारच्या महिला या त्या नवऱ्याच्या बाजूनेच बोलत होत्या, तो नवरा आहे…त्याचा हक्क आहे….!

परदेशात विवाह हा ‘करार’ मानला जातो, तेथील मुक्त जीवनशैलीला कितीही नावेबोटे ठेवली तरी ‘व्यक्ती’ म्हणून पत्नीला समान हक्क, समान दर्जा,समान कायदेशीर हक्क आहेत. आपण परदेशातलं बरंच काही घेतलं मात्र पत्नीच्या ‘नकार स्वातंत्र्याला’ स्वीकारण्याची मानसिकता कोणत्याही पाठ्यक्रमाद्वारे,संस्काराद्वारे भारतीय मानसिकतेत रुळलीच नाही. भारतीय समाज व्यवस्था घडवते ती…पुरुषच श्रेष्ठ असण्याची मानसिकता. याच मानसिकतेतून पंजाबमध्ये नेहा शाैरी या अतिशय प्रमाणिक महिला अधिकारीची हत्या एका केमिस्ट दूकानदाराने केली,का? तर या त्याच्या दूकानात ड्रग्स आढळयाने नेहाने त्याच्या दूकानाचा परवानाच रद्द केला आणि…त्याची किंमतही याच देशात चुकवली. भर दिवसा तिच्या कार्यालयात येऊन त्याने तिच्या निधड्या छातीवर गोळ्यांचे बार खाली केले...’उडता पंजाब’ हा…कधीचाच ’उडता भारत’ झाल्याचे ही घटना निर्दशनास आणते.

बीड तालुक्यातील वंजरवाडी गावात ऊसतोडणी करणाऱ्या जवळपास ५६ महिलांचे गर्भाशय काढून टाकण्यात आले! दिवसाकाठी तीन ते चार टन ऊसतोड केल्यावर या नवरा-बायकोच्या हाती पडतात हजार रुपये! एक टन ऊस तोडीचे अडीचशे रुपये..चार-पाच महिन्यात तीनशे ते साडेतीनशे टन ऊसतोडणीकरुन ही जोडपी गावाकडे परतात. याच उत्पन्नात वर्षभर गुजराण करावी लागते. ऊसाचा हंगाम संपल्यावर काम मिळत नाही..जेव्हा काम सुरु असते तेव्हा मजूर महिलांना पाळीचा अडथळा येऊ नये म्हणून…त्यांची गर्भाशयच काढून टाकण्यात आली..याचाच अर्थ तिच्या लग्नानंतर तिचा तिच्या गर्भाशयावरही हक्क कायम नसतो..बीड हा तोच जिल्हा आहे जिथे गर्भंलिंग निदान करुन गर्भपाताच्या सर्वाधिक घटना घडल्या आणि संबंधित डॉक्टरांना शिक्षा ही झाली मात्र…मानसिकता..प्रवृत्ती….ही कायम आहे.

भाेपाळमध्ये विवाहीत महिला प्रियकरासोबत पळून गेली. तिचं मन नव्हतं नवऱ्या सोबत संसार करण्याचं…पण विवाह संस्कार पार पडला होता ना..मग..आणली तिला धरुन..गावकऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली आणि शिक्षा दिली…पतीला तिने खांद्यावर घेऊन चालण्यास भाग पाडले..आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.एक जण तिला काठीने मारतोय..गावकरी तिच्यासमोर नाचत आहेत तिची टिंगल उडवतात आहेत..तिचं वय आहे अवघे…२७ वर्षे! मन नसताना फक्त विवाह नावाच्या संस्काराखाली तिला यापुढे नवरा देहावर सहन करावा लागणार…आजन्म..मरेपर्यंत कारण… भारतात विवाह हा संस्कार आहे आणि भारताची संसद विवाहानंतर ‘स्त्री’म्हणून तिचे सर्व हक्क अबाधित राखणारा कायद्या करण्यास २१ सा व्या शतकाच्या १९ सा व्या दशकातही…घाबरते!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या