

नागपूर,ता.१४ एप्रिल २०२२: भारतरत्न डॉ. .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विधान भवन चौका मधून ‘ समता रॅली ‘ काढण्यात आली. रॅली चे उद् घाटन संजय भेंडे, अध्यक्ष , नागपूर नागरिक सहकारी बँक यांच्या हस्ते करण्यात आले,रॅली लहू सेना प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली निघाली ,
रॅली मध्ये सर्व लहू सैनिकांनी लाल फेटे परिधान केले होते. डॉ. बाबासाहेब यांच्या फोटोचे निळे बिल्ले लहू सैनिकांनी लावले होते, विदर्भातील सुप्रसिद्ध संत गुलाब बाबा बँन्ड पथकाने अप्रतिम भिम गिते वाजवली,या गीतांच्या निनादात रॅली पुढे पुढे निघत होती, यासोबतच ढोल- ताशांचे , तुतारी व पंजाबी ढोलचा निनाद अासमंतात दुमदुमला,या सर्व कलावंतांनी व वादकांनी यांनी लाल रंगाचेच परिधान घातले होते.

रॅली मध्ये भिम घोषणाचा गजर झाला.बाबासाहेबांच्या जय घोषणाने संविधान चौक दुमदुमला. ही रॅली उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
सर्वप्रथम संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला संजय भेंडे , संजय कठाळे , श्रीधर सनेश्वर यांच्या हस्ते पुष्प माळ अर्पण करण्यात आली.
या रॅली मध्ये मोठ्या संख्येने स्त्री ,पुरुष व युवकांनी सहभाग नोंदवला.रॅली मध्ये रमेश चोपडे ,श्रीधर सनेश्वर , बाळू घरडे , मुरलीधर रणखांम , गणेश साळवे , रविन्र्द खडसे , महेंन्र्द प्रधान , प्रविण चव्हाण ,
अशोक खडसे, प्रकाश उकूंडे , ज्ञानेश्वर ससनकर , राजेश अडागळे , देवा बावने , अश्विनी खडसे , सुरेश कावळे,संजय सोरगिले, दिलिप गायकवाड , गणेश डोंगरे , देवेन्र्द बावने , खुशाल लोखंडे , सरस्वती सोनी , संध्या कठाळे , मंदाबाई खडसे आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
