

रोहीत आहूजा याने छापले चेडीचंड मेळाव्याचे नकली कूपन:मुलांचा दोष एवढाच त्यांनी चूकून विकत घेतले नकली कूपन
३ एप्रिल जरीपटका येथील दयानंद पार्क येथील घटना
कुटुंबिय व नागरिकांसमोर मारहाणामुळे साढे सतरा वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न:बापाने मांडली पत्रकारांकडे व्यथा
नागपूर,ता. ११ एप्रिल २०२२: ’पार्टी विथ डिफरेन्स’चे बिरुद मिरवणा-या भारतीय जनता पक्षाचे जरीपटका भागातील पक्षश्रेष्ठींचे लाडके नगरसेवक विकी कुकरेजा यांचा आणखी एक ‘कारनामा’उघडकीस आला असून कुकरेजा व त्यांच्या काही सहका-यांनी जरीपटका भागातील एकूण २३ निरागस व निर्दोष बालकांना ३ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून तर सकाळी ६ वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळी पालकांसह जरीपटका येथील दयानंद पार्कमध्ये बोलावले,चेडीचंड मेळाव्याचे नकली कूपन खरेदी करण्याच्या प्रकारावर त्यांना पालक तसेच नागरिकांसमोरच दारुच्या नशेत मारहाण करण्यात आली,या मानसिक धक्क्यामुळे कैलाश केवलरमानी यांच्या साढे सतरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी आज सव्वा चार वाजता कुकरेजा यांचे हे ‘अमानवीय’कृत्य उघडकीस आणण्यासाठी प्रेस क्लब येथे पत्र परिषदेचे आयोजन केले.मात्र इतर बालके व त्यांचे पालक,हे कुकरेजा व त्याच्या सहका-यांच्या ‘दहशतीत’असल्याने प्रेस क्लब येथे पोहोचलेच नाही परिणामी केवलरमानी यांनी पत्रकारांना प्रेस नोट वाटून आपली आपबिती कथन केली.
चेट्रीचंड मेळाव्याचे जवळपास वीस लाख रुपयांचे कूपन कुकरेजासाठी रोहीत आहूजा नामक व्यक्तीने छापली मात्र त्याने बेकायदेशीररित्या काही लाख रुपयांचे नकली कूपन देखील छापले.हेच कूपन आहूजा याने परिसरातील मुलांना खोटेपणाने विकले.ही बाब कुकरेजा याला कळताच त्याने आहूजा याच्याकडून मिळवलेल्या माहितीतून नकली कूपन घेणा-या मुलांचा शोध लावला व ३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पासून तर सकाळी ६ वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळी, मुलांना पालकांसह पार्कमध्ये बोलावून शिवीगाळ व मारहाण केली.यामुळे पालक व मुले ही कुकरेजाच्या दहशतीत आहे.
२,३ व ४ एप्रिल रोजी चेट्रीचंड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात या कूपनचा उपयोग वेगवेगळ्या फूड स्टॉल्सवर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी होणार होता मात्र चुकीने परिसरातील २३ मुलांनी आहूजा याच्याकडून खोटे कूपन विकत घेतल्याने त्यांना कुकरेजा व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या सहका-यांकडून मारहाणीचा आस्वाद नशीबी आला.या प्रकरणी कुकरेजा याने बालकांच्या पालकांकडून १०-१० हजार रुपये उकळल्याचा आरोप केवलरमानी यांनी केला.
धर्मादाय आयुक्तांची तरी परवानगी २० लाख रुपयांचे कूपन छापण्यासाठी घेण्यात आली का?असा सवाल त्यांनी केला.कुकरेजा याची परिसरातील दहशत बघता कायदा किवा नियम हे त्याच्यासाठी नाहीच,कुकरेजा हा कायदापेक्षा वर आहे,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष कृपा कुकरेजावर असल्याकारणाने कुकरेजा एवढा माजलेला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.सर्वसामान्य नागरिकांच्या निरपराध बालकांना मध्यरात्री पार्कमध्ये डांबून रात्रभर मारहाण करण्यापर्यंत मजल कुकरेजाची फडणवीस व गडकरींमुळेच झाली असल्याचे आता बोलले जात आहे.
रोहीत याला जबर मारहाण करुन त्याच्याकडून कोणाकोणाला नकली कूपन विकले याची माहिती कुकरेजा याने काढून घेतली.मुलांना रोहीत हा कुकरेजाचाच कार्यकर्ता असल्याचे माहिती आहे व कूपन त्याच्या प्रिटींग प्रेसमध्ये छापण्यात आले हे देखील माहीती असल्यानेच त्यांनी हजारो रुपये भरुन रोहीत आहूजाकडून ते कूपन विकत घेतले होते मात्र ते खोटे कूपन होते हे मुलांना माहीती नव्हते,तरी देखील कुकरेजा व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या सहका-यांनी निरपराध मुलांनाच रात्रभर मारहाण केल्याने गेल्या ८ दिवसांपासून मुले दहशतीत आहेत,माझ्या मुलाने तर आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचलले असल्याची व्यथा केवलरमानी यांनी पत्रकारांनाकडे मांडली.
कुकरेजा याने या सर्व मुलांचे मोबाईल देखील जप्त केले व सर्वांना घरुन दहा-दहा हजार रुपये आणण्याचे फर्मान सोडले.काही मुलांनी दहा हजार दिले काही मुलांनी ५ हजार दिले,ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांनी एक हजार व पंधराशे रुपये देखील कुकरेजाला त्या रात्री दिले असल्याचे केवलरामानी यांनी सांगितले.
ही बाब कोणालाही सांगू नये म्हणून या मुलांना जबर धाक दाखविण्यात आला.माझे कोणी काहीच वाकडे करु शकत नाही,मी बाबू खानला जबर लाथाडले,तुडवले तरी पालकमंत्री नितीन राऊत माझे काहीच वाकडे करु शकला नाही,माझ्याकडे इतका पैसा अाहे की मी काेणालाही विकत घेऊ शकतो’असा दम त्याने मुलांना दिला.
यामुळे मुले अतिशय भेदरलेली असून आज पत्र परिषदेत आपल्यावरील अन्याय मांडायला नाही येऊ शकली असे केवलरमानी म्हणाले.मात्र जरीपटका पोलिस ठाण्यात मी मात्र तक्रार देण्यात जात असल्याचे ते म्हणाले.मला माझ्या साढे सतरा वर्षाच्या कोवळ्या मुलाचे प्राण अश्या या राजकारण्यासांठी गमवायचा नाही,असा टाहो त्यांनी फोडला.
माझ्या मुलाने चूकून नकली कूपन खरेदी केल्याने व आमचा, परिरासतील नागरिकांसमोर एवढा अपमान झाल्याने आता आम्हाला ’ऐ दो नंबर’करुन चिडवल्या जात आहे त्यामुळे आता मुलासह मलाही आत्महत्या करण्याची ईच्छा असल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली.
यांच्यावर केला मारहाणीचा आरोप-
विकी कुकरेजा,सतीश आनंदानी,राजेश बटवानी,रवि जेस्वानी,संजय वासवानी,हितेश दवानी,अमर मायानी,जगदीश वंजानी,मंशानी,जतिन मेठवानी व विराग गोधानी,विकी अालवानी,मुकेश साधवानी.
या संदर्भात विकी कुकरेजा यांना संपर्क केला असता,अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी ’सत्ताधीश’ला सांगितले.
(कैलाश केवलरामानी यांचा संपर्क क्रमांक- 7020137903




आमचे चॅनल subscribe करा
