फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामझुला झाला ’राममय’

रामझुला झाला ’राममय’

Advertisements

हजारो दिव्यांच्या नेत्रदिपक आरासात उजळून निघाली भक्तांची नगरी

हजारो भक्तांनी नेत्रांसोबतच ह्दयात साठवला भक्तीभावाचा क्षण

नागपूर,ता.१० एप्रिल २०२२: जगजित सिंह यांच्या मधाळ स्वरातलं भजन ‘जग मे साचो तेरा नाम,हे राम हे राम,तू ही माता तू ही पिता है,तू ही तो है राधा का श्‍याम,हे राम हे राम’प्रत्येक वर्षी नागपूरात ऐतिहासि झांकी निघतात तेव्हा त्यातील अनेक झांकीसोबत हे मधाळ भजन भक्तांच्या ह्दयातील श्रद्धेचे तार अलगद छेडतात,यंदा देखील रामनवमीला संपूर्ण शहरच याच नावात‘राममय’झालं एवढंच नव्हे तर नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर १०० व्या वर्षात पदार्पण करत असताना मंदियराजवळीत रामझूलाच हा हजारो दिव्यांच्या नेत्रदिपक आरासमध्ये जणू ‘राममय’झाला.

कोविडच्या कारणामुळे प्रतिबंधनातून शासकीय दरबारातून उशिरा सूट मिळाल्याने यंदा देखील नागपूरातील ऐतिहासिक व अनेक दशकांची परंपरा लाभलेली शोभायात्रा रद्द करण्यात आली. पण, असे असले तरी अयोध्येच्या धर्तीवर येथील रामझुल्याच्या दक्षिण भागात ११ हजार १५१ दिवे लावण्यात आले आणि पंधरा मिनिटात अवघी नागपूर नगरीच जणू ‘राममय’होऊन उजळून निघाली. राम झुल्यावर एकाचवेळी दिवे लावायला सुरूवात करून अवघ्या १५ मिनिटात दिव्यांनी परिसर उजळून निघाला. यावेळी ओम, जय श्रीराम, स्वस्तिक तयार होतील अश्या पद्धतीने दिव्यांची आरास करण्यात आली. यामुळे श्रीरामाच्या नावाचा रामझुला उजळून निघाला.हजारो भाविकांनी हा क्षण आपल्या नेत्रासोबतच मनात साठवला.

नागपूरची धार्मिक ओळख असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराची ऐतिहासिक भव्य शोभायात्रा यावर्षी सुद्धा रद्द करण्यात आली होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शोभायात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले . मात्र राम जन्मोत्सवाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला होता त्यावेळी सरकारकडून करोनासंबधित निर्बंध उठवण्यात आले. इतक्या कमी दिवसात शोभायात्रेची तयारी करणे शक्य नसल्यामुळे यावर्षी शोभा यात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदिर कमेटीकडून देण्यात आली होती. मात्र विदर्भातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे यावर्षी देखील श्रीराम जन्मोत्सवाचा उत्सव प्रचंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला गेला. तब्बल दोन वर्षानंतर भक्तांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव साजरा झाला.

यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले.

पोद्दारेश्वर राम मंदिराला यावर्षी ९९ वर्ष पूर्ण झाल्याने भक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता. पोद्दारेश्वर राम मंदिर हे सर्वधर्म समभावाचं प्रतीक मानल्या जातं. हिंदू धर्मियांसह मुस्लिम धर्माचे नागरिक देखील या उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सहभागी होत असतात.यंदा देखील याची प्रचिती आली. पोद्दारेश्वर राम मंदिर हे केवळ नागपूरचं नव्हे तर, विदर्भाची सांस्कृतीक आणि धार्मिक ओळख मानली जाते. चैत्राचा शुभारंभ होताच गुढीपाढवा या मराठी माणसाच्या नुतन वर्षापासूनच मराठी भाविकांना ’नवमी’चे वेध लागतात.राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुणाई कामाला लागते.यंदा हा उत्साह रामझुल्यावर एकवटला होता तो भाविकांनी नजरेत साठवला.

कशी आहे पोद्दारेश्वर राम मंदिराची रचना-
मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, सीताराम आणि लक्ष्मणाची मूर्ती नजरेस पडते. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. या शिवाय मंदिरात हनुमान, विष्णू लक्ष्मी, गरुड, सुग्रीव, गंगा, महालक्ष्मीच्या मुर्त्या आहेत. जयपूरचे गोविंदराम उदयराम यांनी या मुर्त्या घडवल्या आहेत. याशिवाय अष्ठकोनी सभामंडप मंदिराची शोभा वाढवतो. पितळ आणि लाकडाचा वापर करून मंदिराचे द्वार तयार करण्यात आले आहे.

पोद्दारेश्वर राम मंदिराचा इतिहास –
ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर हे नागपुरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या अगदी शेजारी आहे. नागपुरातील धार्मिक कुटुंबातील जमनाधार पोद्दार यांनी १९१९ साली स्वखर्चाने मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी म्हणजे १९२३ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा जमनाधार पोद्दार यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळेच या मंदिराला पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळखले जाते. आज या घटनेला ९९ वर्षांचा ऐतिहासिक काळ पूर्ण झाला असून, मंदिराने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. १९५२ साली जमनाधार पोद्दार यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा रामकृष्ण पोद्दार आणि त्यांची मुलं मंदिराच्या सेवेत कार्यरत आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या