
दिवसभराचे इडीनाट्य: ॲड.सतीश उके यांच्या घरावर इडीचा छापा,चौकशी व अटक
न्यायालयावर विश्वास:उकेंची सुटका होणारच:वकील समुदायाचा विश्वास
उकेविरुद्ध इडीकडे कोणतेही ठोस आरोप नाहीत:वकीलमित्रांचा दावा
उकेंना ‘हवाला’आरोपातंर्गत अटक: रात्री ११ वाजताच्या विमानाने उकें बंधूंसह मुंबईला रवाना
नागपूर इडी कार्यालयाला माहिती न देता मुंबईच्या इडीची कारवाई:पहाटे ५ वाजता रामेश्वरीत उकेंच्या घरावर छापा
आघाडी सरकारच्या नेत्यांचे फक्त ’बोलबच्चन’: कृती मात्र शून्य:इडी झाली ‘चिल्लर’:सत्र न्यायालयातील वकीलांचा संताप
सगळे पुरावे आधीच न्यायालयात सुरक्षीत:उके यांनी अनेकदा पत्र परिषदेत केला होता दावा
नागपूरच्या गुन्हे शाखेकडून उकेंना झाली होती अटक:’आमचे’ सरकार असतानाही असे घडावे माझ्यासाठी हा धक्काच!उके यांचे खासगीतील बोल
नागपूर,ता.३१ मार्च २०२२ : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप ॲड.सतीश उके यांनी केला आहे.या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी सुरु असून गुरुवारी दि.२४ मार्च रोजी सुनावणीदरम्यान तक्रारदार उके यांची साक्ष नोंदवण्यात आली.यावेळी फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविल्याची माहिती उके यांनी न्यायालयाला दिली.या प्रकरणी साक्षी-पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.उके यांच्या तक्रारीनुसार फडणवीस यांच्यावर दाखल हे दोन्ही गुन्हे नागपूरातील आहेत.त्यातील एक गुन्हा मानहानीचा तर एक गुन्हा हा फसवणूकीचा आहे.फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवली व खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले.गुरुवारी उके यांनी आपली साक्ष लेखी सादर केली.याच प्रकरणात येत्या ९ एप्रिल रोजी उके यांची उलटतपासणी होणार होती.फडणवीस यांच्यातर्फे ॲड.सुबोध धर्माधिकारी व ॲड.उदय डबली बाजू मांडत आहेत.या प्रकरणात लवकरच सुनावणी पूर्ण होऊन फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती,ही बाब फक्त फडणवीस यांच्याच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचीच प्रतिष्ठा मलिन करणारी ठरली असती,आपल्याविरुद्ध खटल्यामधील धार बोथट व्हावी यासाठीच फडणवीस यांनी केंद्रिय तपास यंत्रणेचा अर्थात सक्त वसूली संचनालयाचा(इडी)चा वापर करीत ॲड.उके यांना चौकशीच्या फे-यात अडकवले,असा सूर आता वकीली क्षेत्रातून ऐकू येत आहे.
आज पहाटे ५ वाजता मुंबईतील इडीचे ५ ते ६ अधिकारी यात दोन महिलांचा देखील समावेश होता ॲड.उके यांच्या रामेश्वरी येथील निवासस्थानी धडकले.कायदा सांगतो सूर्योदयाच्या पूर्वी व सुर्यास्ताच्या नंतर अंधारात कोणाविरुद्धही कारवाई करता येत नाही मात्र उके यांच्या घरी मुंबईतील हे इडी अधिकारी पहाटेच्या अंधारातच पोहोचले.त्यांनी उके यांचा संगणक,लॅपटॉप,कागदपत्रे,मोबाईल यांची तपासणी केली.पहाटे ५ ते सकाळी ११ वाजतापर्यंत इडी अधिका-यांचा मुक्काम हा उके यांच्याच घरी होता.यानंतर त्यांनी उके व त्यांचे बंधू यांना आपल्या वाहनातून सेमिनरी हिल्स येथील इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आणले.सायंकाळपर्यंत उके बंधूंची चौकशी सुरु होती.साढे पाच वाजता इडीने उके बंधूंना ’हवाला’(मनी लाॅड्रींग)च्या आरोपाखाली अटक केली.यानंतर उके बंधूंना मेडीकल तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले.इडीच्या कार्यालयात उके बंधूंसाठी त्यांचे मित्र वैभव जगताप हे त्यांच्या घरुन जेवणाचा डबा घेऊन आले.यानंतर रात्री १०.४०.वाजता उके बंधूंना विमानतळावर आणण्यात आले.रात्री ११ वाजता मुंबईचे इडी अधिकारी उके बंधूंना अटक करुन मुंबईत घेऊन गेले.
नागपूरात इडीची ही दूसरी कारवाई आहे.पहीली कारवाई माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरुद्ध करण्यात आली मात्र ही कारवाई करण्यापूर्वी इडीने त्यांना किमान १० समन्स पाठविले होते.ॲड.उके यांना एकही नोटीस पाठवण्यात आली नसून सरळ त्यांच्या घरावर छापा घालण्यात आला,त्यांचे संगणक,लॅपटॉप,मोबाईल जप्त करण्यात आले व अटक करण्यात आल्याने वकील क्षेत्रात तीव्र नाराजी उमटली आहे .इडीची ही कारवाई ही कायदेशीर कारवाई नसून सूडबुद्धिने केलेली कारवाईच असल्याचे सांगून फक्त फडणवीस यांना कायदेशीर अडचणींतून सोडवण्यासाठी कायद्याचा गळा घोटण्यात आल्याचा तीव्र संताप उमटला आहे.इडीची ही कृती म्हणजे उके विरुद्ध फडणवीस अशी लढाई नसून महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध विरोधक असा सरळ लढा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या मिडीया सेलचे अध्यक्ष ॲड.रवी जाधव यांनी केला.आता नागपूरकरांमध्ये एक धडकी भरली आहे,एखाद्या निष्णात वकील जो नेहमी पुराव्याच्या आधारावर बोलत होता त्याला इडी असे उचलून नेते तर आमची काय बिसात?हा योग्य संदेश फडणवीस यांनी त्यांच्या मतदारांना दिला असल्याचा आरोप जाधव यांनी केला.हा एकप्रकारे जनतेलाच इशारा आहे.आतापर्यंत इडी हे अस्त्र मुंबईपर्यंत व राजकारण्यांपर्यंतच सीमित होते.सामान्य लोकांना याची झळ बसली नव्हती.आता एका सामान्य वकीलाला देखील इडी ही घरुन उचलून नेऊ शकते,हे फडणवीस यांनी सिद्ध केले व आपल्या विरोधकांना गप्प राहण्याचा संदेश दिला.
उके यांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्याविरुद्ध उकेंनी न्यायालयात एकूण १० तक्रारी नोंदवल्या आहेत.नुकतेच उके यांनी न्यायमूर्ती लोया प्रकरण पुर्नजिवित करण्यासाठीचे पुरावे समोर आणले.पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध फोन टॅपिंगचे प्रकरणही ते हाताळत होते.निमगडे हत्याकांड,पॅगेसस,सोनेगाव तरुणी हत्याकांड,धर्मादास रमाणीविरुद्धचा स्टॅम्प पेपर घोटाळा,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध खोटे निवडणूक प्रतिज्ञापत्र,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याविरुद्ध पत्र परिषदा घेणे,नाना पटोले यांनी ज्याचा उल्लेख केला तो ‘मोदी’समोर आणने,किरीट सोमैय्या विरुद्ध एक रुपया मानहानिचा दावा काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यातर्फे लढणे असो,भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा लढा असो,उके यांनी सतत भाजपच्या नेत्यांविरुद्ध सबळ साक्षी पुराव्यांच्या आधारावर पत्र परिषदा घेऊन जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न केला .यासाठीच ते फडणवीस यांच्या टार्गेटवर होते,आता तर येत्या ९ एप्रिल रोजी उके यांची उलटतपासणी होणार होती,त्यात सगळं पितळ उघडं पडेल या भितीनेच उके यांच्यावर सूड भावनेतून इडीचा गैरवापर करीत कारवाई करण्यात आल्याचा आरोप ॲड.रवी जाधव यांनी केला.आपल्यावरील बालंट पुढे कसे ढकलता येईल हा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे,न्यायालयीन प्रक्रियेला फक्त बाधा पोहोचवणे हाच हेतू फडणवीस यांचा नव्हता तर न्यायालयीन प्रक्रियेतून सूटका करुन घेण्याचा ‘एकमेव’मार्ग हा उके यांचे तोंड बंद करने हाच असल्याने उके यांना इडीचा गैरवापर करुन अटक करण्यात आली,असा आरोप ॲड.जाधव यांनी केला.
आता त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप देखील होऊ शकतात.त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी फडणवीस हे कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात.काहीही करुन उके यांना अनिल देशमुख व नवाब मलिकसारखे आतच डांबून ठेवण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,असे ॲड.जाधव यांनी ठणकावले.आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील न्याय व्यवस्थेला अश्या घाणेरड्या राजकीय खेळीपासून पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन सुरक्षीत ठेवले आहे.या देशातील न्यायाधीश व न्याय हे विकाऊ नाहीत.परकीय इंग्रजांनी देखील अशी दमन नीती महाराष्ट्रात राबवली नाही.आता जे काँग्रेसच्या लीगल सेलमध्ये आहेत त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करणार का?कारण आम्ही विरोधात बोलतो!इडीची ही कृती म्हणजे फडणवीसमार्गे जनतेला धमकावण्याचाच प्रकार असल्याची टिका ॲड.जाधव यांनी केली.
उके यांच्या विरोधात १०-१५ वर्षांपूर्वीचे जमीन जुमल्यांशी संबंधित प्रकरणे उकरुन काढली जात आहे.या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.या विरोधात विरोधक न्यायालयात जाऊ शकत होते.अर्ज करु शकत होते.मात्र नागपूरात न्याय डावलून कायद्याचे राज्य संपुष्टात आणण्यात आले.आता ते उद्या मुंबईत इडीच्या न्यायाधीशांसमोर उके यांची कस्टडी मागतील,ती आम्ही मिळू देणार नाही.त्याला आम्ही विरोध करु.इडी आता नॅशलन सिक्यूरिटी ॲक्टचा देखील उकेंविरुद्ध उपयोग करण्याची शक्यता आहे.इडीचे तपास अधिकारी हे वाईट नाहीत तर ते स्वत: दबावाखाली काम करीत आहेत.त्यांनीच आता जनतेसमाेर यावं आणि सत्य सांगावं,असे आवाहन ॲड.जाधव यांनी केले.
इडीचं मुख्य काम नेमके काय आहे?याचाच आता त्यांना विसर पडला असल्याचे सांगून नागपूरच्या इडी अधिका-यांना देखील कारवाईबाबत कळू नये?यातच सर्व दडलं आहे.
सत्र न्यायालयातील वकीलांनी देखील आता इडी ही इतकी ‘चिल्लर’झाली?असा संताप व्यक्त करीत इडीच्या अश्या कारवायांमुळेच आठवडी बाजारातील भाजीवाल्यांना देखील आता इडी मुखोदग्त झाली असल्याचा संताप व्यक्त केला.ॲड.उके यांना अटक जरी झाली असेल तर कायद्यानुसार त्यांना येत्या ९ एप्रिल रोजी नागपूरातील न्यायालयात उलटतपासणीसाठी परवागनी मिळवता येते आणि ती त्यांनी मिळवली पाहिजे.त्या उलटतपासणीत आता त्यांनी सत्य जेवढं नग्न आहे ते तसंच्या तसं मांडावं व त्यांच्या विरोधकांना न्यायाधीशांसमोर नंगं करावं,असा तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला.उकेंनी जर असे केले तरच इडीची कारवाई करुन त्यांना रोखण्याचे जो प्रयत्न झाला आहे तो त्यांचा उद्देश्यच पूर्ण होणार नाही आणि ते तोंडघशी पडतील.
एकीकडे उके यांच्यावर गैरमार्गाने जमीन बळकावण्याचा आरोप होत असताना सत्तारुढ पक्षातील शिवेसेनेच्या एका नेत्याच्या अनाधिकृत बांधकामावरील साढे तीन कोटींचा दंड स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफ केला!अशी ही आघाडी सरकार,मंत्री,नेते व प्रशासनावर उके यांना सार्थ विश्वास होता मात्र दोनच महिन्यांपूर्वी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या पत्नी ज्योती बावणकुळे यांचा भाचा सुरज तातोडे यांना उके यांनी माध्यमांसमोर आणले.या पत्र परिषदेत बावणकुळे यांचा भ्रष्ट कारभारच तातोडे याने चव्हाट्यावर आणला.याच पत्र परिषदेनंतर प्रेस क्लबच्या बाहेर येताच गुन्हे शाखेच्या पोलिस अधिका-यांनी उके बंधूंना अटक केली व चौकशीसाठी नेले.मात्र त्यांना सोडून देण्यात आले.उके हे पोलिस विभागाला बधत नाही हे लक्षात आल्यावर उके यांच्या विरोधात ’डायरेक्ट’केंद्र सरकारच्या अखत्यारितीत असणारी इडीच मागे लावली व तातडीने हवालासारख्या गंभीर आरोपाखाली अटक देखील झाली.राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये जे सत्तांतर घडले त्यामुळे उके यांना हे आघाडीचे सरकार ’आपले’वाटत होते मात्र नागपूरात त्यांच्यावर गुन्हे शाखेच्या झालेल्या कारवाईनंतर त्यांच्या विश्वासाला चांगलाच तडा गेला होता,जो त्यांनी खासगीत बोलून ही दाखवला होता.राज्यात आपलेच सरकार असताना हे आमच्यासोबत घडेल,असे वाटले नव्हते,अशी हताशाही त्यांनी व्यक्त केली होती.
ॲड.उके यांच्या कुटुंबियांनी देखील आज माध्यमांजवळ, फडणवीस यांच्या इशा-यावरुनच उके यांच्यावर इडीची कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप केला तर उके यांनी वारंवार आपल्या पत्र परिषदेत त्यांनी भाजप नेत्यांविरोधातील सर्व महत्वाचे कागदोपत्री पुरावे हे न्यायालयाच्या संरक्षणात ठेवले असल्याचा उच्चार केला त्यामुळे इडीला नेमक्या कोणत्या कागदपत्रांचा शोध हवा होता हे आता काळच ठरवू शकणार आहे.
आज उके यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी हा गंभीर विषय नसून आता गमतीचा विषय झाला असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली.नुकतेच नागपूरात आले असता उके हे राऊत यांना भेटले होते.न्या.लोया यांच्या मृत्यू प्रकरणी महत्वाचे दस्तावेज त्यांना दिले होते.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पुर्नजिवित करण्यासाठी याचिका दाखल करण्याबाबत महाराष्ट्र सरकार विचार ही करीत होती मात्र तत्पूर्वीच हे इडी नाट्य घडले.उके यांना आज बाथरुममध्ये जात असतानाही ५-७ इडी अधिका-यांच्या घे-यात जावे लागत होते असे उके यांचे सहकारी ॲड.मोहनीश जबलापूरे यांनी सांगितले. नाना पटोले यांनी देखील लोकशाहीत कोणत्याही तपास यंत्रणेपेक्षा जनताच मोठी असल्याचे सांगितले.न्यायालयच आता या प्रकरणाची दखल घेईल.जनताच आता योग्य तो धडा शिकवेल.भाजपच्या विरोधात बोलणा-यांविरुद्ध सरळ आता इडीची कारवाई होते,हे जनता बघतच आहे.देशात भाजपची हूकूमशाहीच सुरु असल्याची जहाल टिका पटोले यांनी केली.काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील इडीच्या या कारवाईची कठोर शब्दात निंदा केली.
इडीची ही कारवाई लोकशाहीचा गळा घोटण्याची कारवाई असल्याचा संताप ॲड.रवी जाधव यांनी व्यक्त केला.मुंबईच्या इडी अधिका-यांनी नागपूरच्या अधिका-यांना या कारवाईची कल्पनाही न देणे याचा अर्थ जनता ही समजू शकते.हे सगळं पूर्वनियोजित होतं.एवढी काय आपातकालीन गरज होती?नोटीस,साक्षी,पुरावे,अशी काही प्रक्रिया असते की नाही?नाना पटोलेंच्या वकीलाला केले तसेच आता इडी नबाव मलिकांच्या वकीलाही अटक करणार का?विरोधक हा तर आता लोकशाही मार्गच विसरला आहे.तोंड दाबण्याचा हा प्रकार वकील जगत मुळीच खपवून घेणार नाही.आम्ही तातडीने उच्च व सर्वोच्च न्यायालयात या हूकूमशाही विरोधात दाद मागू.इडी कश्याप्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करते हे न्यायालयाच्याही निर्दशनास आणून देऊ.उकेंची लढाई संपली असे जर राज्यातील विरोधकांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत,आम्ही लीगल सेलचे वकील त्यांची ही लढाई सुरुच ठेवणार आहोत.वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी केंद्रिय तपास यंत्रणांचा गैरवापर लोकशाही देशात होऊ देणार नाही.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कमल सतूजा यांनी देखील इडीच्या या कृतीचा निषेध केला आहे.

संजय राऊतांनी उकेंनी दिलेल्या पुराव्याचे लाेणचे घालावे:ज्वाला धोटे
नागपूरात आलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडे ॲड.उके यांनी न्या.लोया प्रकरणात तसेच इतर काही प्रकरणातील अतिशय महत्वाचे पुरावे सोपवले होते.राऊत यांनी उकेंना लवकरच यावर कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले होते.आत मात्र राऊत यांची माध्यमांवरची प्रतिक्रिया ऐकून निराशाच झाली.त्यांना आता इडीच्या कारवायांची चिंता वाटत नाही तर गंमत वाटते तर त्यांनी आता उन्हाळ्याच्या दिवसात जसे गृहीणी या वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे घालत असतात त्या प्रकारे उकेंनी दिलेल्या पुराव्यांचे लोणचे घालावे.उकेंवर झालेल्या इडीच्या कारवाईवर बोलताना त्यांनी निदान न्यायाशी भाषा तरी बोलायला हवी होती.राऊत यांना देण्यात आलेले पुरावे यामुळेच उके अडचणीत आलेत का?या शंकेला देखील वाव मिळतो.विरोधकांच्या डोक्यावर उके हे टांगती तलवारच होते,तिच आता दूर सारण्यात आली.इडीने उकेंना अटक केली,इडीला यात काही हवाला किवा गौडबंगाल दिसला असेल तर निश्चितच दोषीवर कारवाई झाली पाहिजे मात्र आघाडीतील नेत्यांनी किमान सत्य समोर येईपर्यंत तरी उकेंना साथ द्यायला हवी होती.हसून प्रतिक्रिया देण्यापेक्षा विषयाचे गांभीर्य समजून घेतले असते तर जास्त बरे झाले असते.ज्या नानांसाठी उके यांनी आपली वकीली पणाला लावली त्यांची देखील प्रतिक्रिया ही वरवरची व ‘राजकीयच’होती.पुरोगामी महाराष्ट्रात विद्यमान सत्ताधारी तरी कोणता पायंडा पाडत आहेत?आता कोण जगासमोर ‘सत्य’उघडकीस आणण्याचे धाडस करेल?ज्यांच्या भरवश्यावर उके ही सर्व कायदेशीर लढाई लढत होते त्यांनीच उकेंवर संकट येताच कश्याप्रकारे शाब्दिक मलमपट्टी करुन आपला पल्लू झटकला हे नागपूरकर जनतेने देखील बघितले आहे.आता भविष्यातील सत्ताधारी हाच पायंडा गिरवतील व संवैधानिक लोकशाहीचा मुडदा पाडतील.




आमचे चॅनल subscribe करा
