फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमहिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्‍सवी शुभारंभ

महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्‍सवी शुभारंभ

Advertisements

२७ मार्च रोजी नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते उद् घाटन

नागपूर, २४ मार्च: महिलांच्‍या व्‍यक्तिमत्‍वाचा सर्वांगीण विकास आणि परिपोषणासाठी स्‍त्रीशिक्षण महत्‍वाचे आहे, हे ओळखून स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या स्‍त्री शिक्षण प्रसारक मंडळाने १९७१ साली नंदनवन स्थित महिला महाविद्यालय सुरू केले होते. ‘विद्या परं दैवतम’ हे ब्रीद वाक्‍य असलेल्‍या या महाविद्यालयाने मह‍िलांना उच्‍च शिक्षणाची दारे या खुली करून दिली.

कला,वाणिज्य व विज्ञान अशा तिन्‍ही शाखांमधून वर्ग ११ ते पदव्‍यूत्‍तर पर्यंतचे तसेच, पीएच.डी. ते सौदर्यशास्त्रात बीटेक पदवीपर्यंतच्‍या शिक्षणाची व्‍यवस्‍था महाविद्यालयामध्‍ये करण्‍यात आली. महिला महाविद्यालयाला ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी प्राप्‍त असून क्रीडा, शिक्षण, पोलिस, एलआयसी, रेल्‍वे, वनविभाग, महाराष्‍ट्र सुरक्षा बल, कॉस्मेटिक कंपन्या, उद्योग क्षेत्रात महाविद्यालयाच्‍या अनेक विद्यार्थीनी विविध महत्‍वाच्‍या पदांवर कार्यरत आहेत.

पन्‍नास वर्षाचा आपला देदीप्‍यमान शैक्षण‍िक इतिहास लिहिणा-या या महिला महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्ष शुभारंभाचे उद् घाटन रविवार, २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. नंदनवन येथील मह‍िला महाविद्यालयात हा कार्यक्रम होईल. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्‍त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष रवींद्र फडणवीस व महिला महाविद्यालयाच्‍या प्राचार्य डॉ. वंदना भागडीकर यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या