Homeनागपूर न्यूज‘उपासनेला दृढ चालवावे..

‘उपासनेला दृढ चालवावे..

हभप मोहनबुवा कुबेरयांचे रसाळ कीर्तन

जयप्रकाश नगरातील श्रीगुरुमंदिराचा वास्‍तुपूजन सोहळा संपन्‍न

नागपूर, २५ मार्च: ‘उपासनेला दृढ चालवावे, सत्‍कर्म योगे वय घालवावे’ या समर्थ रामदास स्‍वामी यांच्‍या श्‍लोकाचा आधार घेत हभप मोहनबुवा कुबेर यांनी निरुपण केले. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. ब्रम्‍हांडातील प्रत्‍येक मूर्त-अमूर्त संकल्‍पनादेखील बदलतात. पण उपासनाच तेवढी दृढ राहते, असे हभप मोहनबुवा कुबेर म्‍हणाले.

जयप्रकाश नगर येथील श्रीगुरुमंदिरच्या नववास्तूचा वास्तुपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. सकाळी वास्‍तुशांती व गृहप्रवेश झाल्‍यानंतर महारुद्रभिषेक करण्‍यात आला. वेदमूर्ती अभिषेक गुरुजी व कै. अंबादास जोशी वेदाध्‍ययन ज्ञानपीठ येथील वेदमूर्ती निलेश केदार (घनपाठी) माहूर यांचे विद्यार्थ्‍यांनी संपूर्ण धार्मिक विधींचे पौरोहित्‍य केले. त्‍यानंतर सायंकाळी ह. भ. प. मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन झाले. त्‍यांनी पूर्वरंगातील स्‍वामी समर्थांच्‍या ‘उपासनेला दृढ चालवावे’ या श्‍लोकावरच उत्‍तररंगात निरुपण केले.

ते म्‍हणाले, उपासना ही इतकी दृढ असते की जन्‍मांतर झाले तरी तिच्‍या स्‍वरूपात परिवर्तन होत नाही उलट ती अधिक दृढ होत जाते. दृढ राहणारी गोष्‍ट ज्‍या गुणधर्माची असते त्‍याच गुणधर्मासाठी तिचा वापर केला गेला तरच तिचे दृढत्‍व कायम राहते अन्‍यथा तिच्‍यात दोष निर्माण होतात, असे रसाळ निरुपण मोहनबुवा यांनी केले.

आज उत्‍सवात…
सकाळी ८ वाजता महारुद्र पाठ व संध्याकाळी ७ वाजता आनंद मास्टे प्रस्तुत ‘स्वरलता’ हा संगीत कार्यक्रम. यात सायली मास्टे, अमर कुळकर्णी, आकांक्षा नगरकर, श्रेया खराबे – टांकसाळे यांचा सहभाग.

Latest बातम्या