फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसगळं काही राममय.....

सगळं काही राममय…..

Advertisements

श्रीराम वनवास काव्य यात्रा १७ मार्च रोजी नागपूरात:विश्‍व हिंदू परिषदेचा उपक्रम

रामटेक येथे मुख्य कार्यक्रम :कवि सत्यनारायण मोर्य यांची उपस्थिती

सामाजिक समरसतेतून सर्व धर्म,जातीच्या भक्तांनी करावे पादूका पूजन

अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर डिसेंबर २०२४ पर्यंत

खासदार सांस्कृतिक महोत्सावत देखील श्रीराम काव्याच्या सादरीकरणाचे प्रयत्न: डॉ.हर्ष यादव

नागपूर,ता. ११ मार्च २०२२ : भगवान श्रीराम यांना वनवास झाला तेव्हा अयोध्येचा त्याग करुन ते पत्नी सीता व बंधू लक्ष्मणासोबत पायीच वनवासासाठी निघाले.वनवासा दरम्यान ते रावणाच्या तावडीतून माता सीतेला परत आणण्यासाठी श्रीलंकेत गेले.हा प्रवास देखील त्यांनी पायीच पूर्ण केला.या प्रवासादरम्यान त्यांनी सामाजिक उत्थानाचे कार्य ही केले.सामाजिक समरसता प्रस्थापित केली.भगवान श्रीरामाच्या श्रीलंका यात्रा व लंका विजयोत्सवानिमित्त विश्‍व हिंदू परिषदेतर्फे भगवान श्रीराम वनवास गमन काव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसांच्या या उप्रकमात सगळं काही ‘राममय’असणार असल्याची माहिती विहीपचे प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी आज पत्र परिषदेत दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर संयोजक सनतकुमार गुप्ता,राष्ट्रीय कवि संमेलनाचे अध्यक्ष डॉ.हर्ष यादव,बंडू मुंजे,प्रशांत तितरे,रामटेक येथील रितेश शर्मा, सपन जयस्वाल,अमोल गडवे,शेखर बघैले,सुशील चौरसिया,लखन कुरील आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले,की भगवान श्रीराम ज्या मार्गावरुन अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत मार्गक्रमित झाले मात्र श्रीलंकेतून विजयानंतर त्यांना पुष्पक विमानातून अयोध्येत बंधू भरताच्या प्रतिज्ञेमुळे परतावे लागले,ते परत येताना पायी मार्गावरुन परतले नाहीत.भगवान श्रीरामांच्या यात्रेचे प्रत्येक वर्णन या काव्य यात्रेत राहणार आहे.आपल्या वनवासाच्या काळात मार्गक्रमण करताना भगवान श्रीरामांनी सामाजिक समरसतेचे आर्दश उदाहरण समाजा पुढे घालून दिले.त्यांच्या याच आर्दशाला समर्पित होऊन रामटेक येथे १८ मार्च रोजी कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्‍व विद्यालयाच्या चंद्र सभागृहात विद्यालयाचे विद्यार्थी हे देशातील सगळ्या भाषेतील रामायण महाकाव्याचे तसेच श्रीराम कथा काव्याचे सादरीकरण करतील.या वेळी राष्ट्रीय कविंची देखील उपस्थिती असणार आहे.

ही यात्रा १ मार्च रोजी महाशिवरात्रीला श्रीलंकेपासून प्रारंभ झाली असून १० एप्रिल रोजी श्रीरामनवमीला अयोध्या येथे पोहोचणार आहे.नागपूरात १७ व १८ मार्च रोजी मुक्कामी असणार आहे.यात्रेत अंदाजे २० भक्तगण श्रीरामाच्या पादूका व श्रीरामाची प्रतिमा घेऊन श्रीलंका ते रामेश्‍वरम मदुरई,सेलम,किष्कीन्धा,पंचवटी नाशिक,नांदेड,यवतमाळ ते नागपूरात पोहोचत आहे.महाल येथील पं.बच्छराज व्यास चौकात १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता या यात्रेचे भव्य पूजन व स्वागत केले जाणार आहे.

यानंतर ही यात्रा सेंट्रल एव्हन्यू रोडवरुन,पारडी,रिंग रोड ते रामटेकसाठी प्रस्थान करेल.जयस्वाल पेट्रोपंप शितलवाडी येथे या यात्रेचे भव्य स्वागत केले जाईल.स्वागत समारंभाच्या वेळी कुलगुरु मधुसूदन पेन्नाजी,आ.आशिष जायस्वाल,मल्लिकार्जून रेड्डी,प्रसाद किंमतकर,सनतकुमार गुप्ता,विहिपचे प्रदेश मंत्री गोविंद शेंडे,शेखर बघेले यात्रेचे स्वागत करतील.यानंतर या यात्रेचे भव्य अश्‍या शोभायात्रेत परिर्वतन होऊन रामटेक नगरीत नगरभ्रमण होईल.यानंतर गंगाभवन सभागृह,डॉ.आंबेडकर चौक येथे भव्य संत व कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ७ वा.गडमंदिर रामटेक येथे या यात्रेचे आगमन होईल,यावेळी मंदिराचे पुजारीगण मोहन महाराज पंडे व स्वामी अजय महाराज यात्रेचे स्वागत करतील.यानंतर १८ मार्च रोजी कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यालयाच्या चंद्र सभागृहात सर्व भाषांमध्ये राष्ट्रीय कवि हे रामायण महाकाव्य सादर करतील,अशी माहिती गोविंद शेंडे यांनी दिली.रामटेकच्या गडावर भगवान श्रीरामाने दोन वेळा वास्तव्य केले असून या यात्रेचे आयोजनच भगवान श्रीरामांच्या वनवासाच्या काळात त्यांचे चरण ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी श्रीरामांचा त्याग आणि आदर्श युवा पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अयोध्या येथील राम मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल?या प्रश्‍नावर बोलताना,गेली अनेक दशके भगवान श्रीराम यांच्या नशीबी ताडपत्रीत राहने आले होते,भगवान श्री रामाचे हे असे वास्तव्य बघून देशभरातील भक्तगणांना अतिशय वेदना सहन करावी लागली होती.आता त्या ठिकाणी भव्य असे श्रीरामाच्या मंदिराचे निर्माणकार्य होत असून डिसेंबर २०२४ पर्यंत राम मंदिराचे गर्भगृह पूर्ण होऊन रामललाची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान होईल.नंतर ही निर्माण कार्य पूर्ण होत राहील कारण राम मंदिराच्या १०८ एकर जागेवर निर्माण कार्य पूर्ण होत आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

देशातील दाक्ष्ीणात्य भागात अद्याप ही श्रीरामा ऐवजी रावणाची पूजा केली जात असल्याबाबत विचारले असता ‘रावण’ ही एक मानसिकता असल्याचे ते म्हणाले.रावण हा बुराईचा प्रतिक मानला जातो.आपल्या देशात दोन ठिकाण असे आहेत ज्या ठिकाणी रावण दहन केले जात नाही तर रावण-वध केला जातो.रामटेक आणि अयोध्या ही ती दोन ठिकाणे आहेत.श्रीलंकेतील सरकारने राम,सीता यांचे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले आहेत आपल्या देशात देखील सरकारने श्रीरामाशी संबधित सर्व स्थळे ही पर्यटन स्थळे म्हणून विकसित केल्यास देशाच्या महसूलात देखील भर पडेल असे सांगून, रामटेक येथील रामायण महाकाव्य सादरीकरणाच्या वेळी सुप्रसिद्ध कवि सत्यनारायण मोर्य हे देखील उपस्थित राहणार आहेत ज्यांनी ‘सौगंध राम की खाते है,मंदिर वही बनायेंगे’हे जगप्रसिद्ध काव्य रचले व हेच काव्य पुढे अयोध्येच्या गली बोळ्यातून देशभर हिंदूत्वाचा हूंकार भरणारे ठरले,अशी माहिती शेंडे यांनी दिली.

आमची धारणा ही ’सब के राम,सब में राम’अशी असल्याने रामटेक येथील विराजमान होणा-या श्रीरामाच्या पादूकांचे पूजन करण्यास कोणत्याही धर्माच्या,कोणत्याही जाती,पंथांच्या भक्तांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करीत विश्‍व हिंदू परिषद जातीधर्मा पलीकडे भगवान श्रीरामाच्या सामाजिक समरसतेची कास धरणारे संघटन असल्याचे ते म्हणाले.देशाला पुन्हा एकदा एकरुप करण्यासाठी समाजातील कोणत्याही धर्म,जातीच्या भाविकांनी हे विशेष पूजन करावे,असे आवाहन करीत समरसतेचे वातावरण निर्माण करने हाच आमचा उद्देश्‍य असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी, भगवान श्रीरामावर राष्ट्रीय पातळीवरील काव्य सादर होत असून या उपक्रमाला एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यास हेच सादरीकरण नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्वात का केले जात नाही?या प्रश्‍नावर बोलताना राष्ट्रीय कवि संमेलनाचे अध्यक्ष डॉ.हर्ष यादव यांनी, यासंबंधी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.या वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पहील्या चरणात सर्व कार्यक्रम आधीच ठरले असल्याचे ते म्हणाले मात्र येत्या १९ ते २४ मार्च दरम्यान पार पडणा-या या महोत्सवाच्या दुस-या चरणात फक्त एक तास कोणत्याही कार्यक्रमा पूर्वी भगवान श्रीरामावरील सर्व भाषेतील राष्ट्रीय काव्य सादर करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे डॉ. हर्ष यादव यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा-
सनदकुमार गुप्ता-९८९०८५९६७६

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या