फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसहावा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवारपासून

सहावा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवारपासून

Advertisements

१२ आणि १३ मार्च २०२२ रोजी आयोजन

• मेडिकल चौक स्थित व्हीआर सिनेपोलीस चित्रपटगृहात होणार चित्रपटांचे प्रदर्शन

• विदर्भ साहित्य संघात नोंदणी सुरू, रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन उपलब्ध

• जयंती, जयभीम या चित्रपटांसह राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांचे होणार प्रदर्शन

नागपूर,७ मार्च २०२२: ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ आणि १३ मार्च २०२२ रोजी नागपूरच्या मेडिकल चौक स्थित व्हीआर सिनेपोलीस चित्रपटगृहात  सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चित्रपटांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. या महोत्सवाला विदर्भ साहित्य संघ, पुणे फिल्म फाउंडेशन आणि सप्तक यांचे सहकार्य लाभले आहे.

महोत्सवाचे उदघाटन १२ मार्च रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार असून यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री राधाकृष्णन बी, नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ कलाकार व समीक्षक समर नखाते, कलरब्लाईन्ड चित्रपटाचे दिग्दर्शक श्री धोंडीबा बाळू करांडे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या लोकप्रिय ‘जयंती’ चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नलावडे आणि चित्रपटाची चमू देखील यावेळी उपस्थित राहील.

गानकोकिळा लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येईल. चित्रपट आणि संगीत क्षेत्रात अमूल्‍य योगदान देणाऱ्या पंडित भीमसेन जोशी, प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी आणि सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
महोत्‍सवात अनेक मराठी, हिंदी व आंतरराष्‍ट्रीय चित्रपटांच्‍या प्रदर्शन होणार असून उपस्थित कलाकार, तज्ञ मंडळी आणि दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळणार आहे.

चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य –
यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नागपुरात तयार झालेला ‘जयंती’ प्रदर्शित करण्यात येणार असून स्थानिक चित्रपट निर्मिती आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागचा हेतू आहे. याशिवाय देश आणि परदेशातील विविध उत्कृष्ट चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहे. जयंती, गोदावरी आणि कलरब्लाइंड हे तीन मराठी चित्रपट, सेमखोर,ऑस्कर नामांकित जय भीम, बाय हर, बीहेडिंग लाईफ हे भारतीय चित्रपट याशिवाय वॉर्स, अ हीरो, पॅरलल मदर्स, नीत्रम, सॉन्ग ऑफ द सोल, वेटलँड, बर्ड अॅटलस, रेड रॉकेट आणि माईक्साबेल असे 16 चित्रपट दाखविले जाणार आहे. अमेरिकी, स्पेन, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इराण आणि कॅनडा येथील चित्रपट या महोत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लोबल आणि इंटरनॅशनल बनवतात.

चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू –
कोरोना महामारी नंतर प्रथमच चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू झाले असून रसिक प्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे. परंतु चित्रपट हे अन-सेंसर्ड असल्याने केवळ 18 वर्ष आणि त्यावरील प्रेक्षकांनाचा महोत्सवातील चित्रपटांचा आनंद घेता येईल. महोत्सवात कोविड विषयक सर्व नियमंचे पालन करण्यात येणार असून कोविड लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक असणार आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा –
झाशी राणी चौक येथील विदर्भ साहित्य संघात दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्रपट महोत्‍सवासाठी नावे नोंदणीची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. अधिक माहिती साठी 9404445363 या क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो. ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फेसबुक पेज वर रजिस्ट्रेशन लिंक ttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbJZB0hJsWCFeHUe2IU-p6Ua5gELcqTgyX0s0NqJ8QME4KBw/viewform?usp=sf_link उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास मानेकर यांनी सिनेरसिकांना या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या