
कुख्यात आबू खानने जबरीने केला घर,दूकानावर ताबा
पोलिस आयुक्तांमुळे केली एफआयआर नोंदवण्याची हिंमत
पाचही बहीण-भावंडांनी मांडली पत्र परिषदेत व्यथा
रुबिना पटेल यांनी दिली जिवे मारण्याची धमकी:कौसर भगिनीचा दावा
नागपूर,ता.२३ फेब्रुवारी २०२२: महाराष्ट्राच्या उपराजधानीत सज्जनांचे जगणे किती खडतर झाले आहे आणि गुंड,मवाली,खंडणी माफिया,श्रीखंडाचे भूखंड लाटणारे डकैत,बलात्कारी,चोर,दरोडेखोर,बाहूबली हे किती शिरजोर झाले आहेत याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मोठा ताजबाग भागात राहणारी खान भावंडे ही होय.यांची मोठा ताजबाग परिसरातील तीन प्लाट क्र.११,१२ आणि १३,राहते घर आणि दूकान या परिसरातील कुख्यात गुंड आबू खान आणि त्याच्या टोळीने जबरीने हस्तगत केले.चाकूच्या धाक दाखूवन या भावंडांना व त्यांच्या आईला महाल येथील रजिस्ट्री कार्यालयात नेऊन त्यांची संपूर्ण संपत्ती स्वत:च्या व भावाच्या नावावर लिहून घेतली.त्याच्या दहशतीमुळे भाऊ फिरदोसखान(वय वर्षे ३८)बहीणी शमा कौसर,शबनम कौसर,जेबा कौसर व फौजिया कौसर हे २००९ पासून गप्प बसले मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोहल्ला बैठक ताजबाग येथे घेतली,कोणताही, कोणावरही अन्याय झाला असेल तर त्यांनी समोर यावे,असे आवाहन केल्याने या खान कुटुंबियांनी आबू खान व त्याच्या टोळीविरुद्ध सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.आज आमचे आई वडील हयातीत नाही,आम्ही महाल येथे अक्षरश: रस्त्यावरचे जिने जगत आहोत,काहीही करा पण आमचे हक्काचे आणि आई-वडीलांची एकमेव आठवण असणारे ’माहेर’परत मिळवून द्या,असा टाहाे या भावंडांनी आज बुधवार दि.२३ फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत फोडला.

या भावंडांच्या वडीलांचा फिरोज खान यांची हत्या २००५ साली करण्यात आली.त्यांच्या आईलाही अटक झाली होती मात्र त्या बाईज्जत बरी झाल्या.ही हत्या नेमकी कशासाठी झाली?या प्रश्नावर मात्र या भावंडांना उत्तर देता आले नाही,याचे कारण आईलाच माहिती होते,तेव्हा आम्ही लहान होतो,आज आई देखील हयातीत नाही,आमचे राहते घर,दूकान,प्लाटवर अवैध व बेकायदेशीर कब्जा करणारा आबू खान व त्याचे ट्रकभरुन आलेले गुंड हे नरखेड येथील राहणा-या एक बहीणीच्या घरी रात्री दोन वाजता पोहोचले.आई ही त्यावेळी आबूच्या भीतीने नरखेड येथे मुलीकडेच राहत होती.चाकूचा धाक दाखवून आबूने सर्व बहीणंींना व भावाला महाल येथील रजिस्ट्री कार्यालयात बोलावले.आमच्याकडून आमची संपत्ती त्याच्या भावाच्या नावे करीत असल्याच्या कागदांवर सह्या घेतल्या.त्या सह्या जबरीने घेण्यात आल्या.रजिस्ट्री ऑफिसमध्ये आमच्या मागे आबूचे गुर्गे,त्याचा भाऊ सतत उभे होते.त्या कागदांवर काय लिहले होते हे आम्हाला माहिती नाही.रजिस्ट्री करताना पैश्यांची देवाण-घेवाण त्या कागदांवर लिहली जात असली तरी आम्हाला, आजच्या तारखेत जवळपास तीन कोटींच्या संपत्तीसाठी एक पैसा ही मिळाला नाही,असे त्यांनी सांगितले.
आमच्यासाठी संपत्तीपेक्षा आमचा व आमच्या मुलाबाळांचा जीव जास्त महत्वाचा होता म्हणून आम्ही गपगुमान हा अन्याय सहन केला.आमचा एकच भाऊ आहे तो हलाकीच्या परिस्थितीत रस्त्यावर जगतोय.संपत्तीत वाटा मिळाला नाही म्हणून एका बहीणीच्या नव-याने तिला तलाक दिला.आपल्या मुलाचे पोट भरण्यासाठी ती आता दुस-यांच्या घरात भांडी घासतेय.
२००५ साली आमच्या वडीलांची हत्या झाल्यानंतर तेथील वातावरण बघून आम्ही आमच्या घराला व दूकानाला कूलूप लाऊन तुलसीबाग महाल येथे भाड्याच्या घरात राहण्यास आलो.मात्र सहा महिन्याच्या आत त्या भागातील कुख्यात गुंड आबू खान व त्याच्या गुंडांनी आमच्या घराचे व दूकानाचे कूलूप तोडले.
त्या ठिकाणी जुगार,सट्टा,अम्ली पदार्थ,कोंबड्यांची शर्यत व इतर अवैध धंदे सुरु केले.त्यामुळे त्याच्या गैकृत्याचा त्रास शेजा-यांना होऊ लागल्याने त्यांनी आम्हाला याबाबत कळवले.
आम्ही आमच्या घरी पोहोचलो असता आबु खान व त्याच्या भावाने आमच्या घरावर व दूकानावर कब्जा करुन ठेवला होता.त्यावर स्वत:च्या नावाची पाटी लावली होती.फिरदौस हिने आबूला सांगितले हे घर आमचे आहे तर त्याने आम्हाला तिथून हूसकावून लावले.यानंतर त्याने सतत आमच्या आईला व आम्हा पाच ही बहीण-भावाला धमकावणे सुरु केले.अखेर त्याने त्याचे इप्सित साधले,आमची आई शेवटी याच दू:खाने हाय खाऊन अल्लाह ला प्यारी झाली.
एकाच दिवसात आम्ही करोडपतीचे रोडपती झालो.एकाच दिवसात आबू खानने आमची पाचही प्रापर्टी,रजिस्ट्री ऑफिसमध्ये आम्हाला नेऊन बळकावून घेतली.आता आम्ही फूटपाथवर आलो आहोत.
पोलिस आयुक्तांनी धीर दिल्यानेच आम्ही आबू खान विरोधात तक्रार नोंदवली असून आमची संपत्ती बळजबरीने हिसकावण्यात आली असल्याचे आम्ही न्यायालयाही सांगणार आहोत.
रुबिना पटेल यांनी दिली होती धमकी-
२९ ऑगस्ट २०२१ रोजी दूपारी २ वाजता शमा कौसर हिच्या घरी समाजसेविका रुबिना पटेल ही मनपाची कर्मचारी बनून आली,तिच्यासोबत एक ४० वर्षाची महिला व २४ वर्षाचा मुलगा होता.करोना संबंधी माहिती घेण्याकरिता आली असल्याचे तिने सांगितले.मी तिला ओळखत नव्हते मात्र तिने लगेच तूम रानू की बहन हो क्या?असे विचारले.तुझ्या भावाने आबू खानच्या विरोधात जो एफआयआर दाखल केला आहे तो मागे घ्यायला सांग,असे सांगून एफआयआरची कॉपी मला दे,असे म्हटले.मी तिला दरडावले तू मनपातून आली आहेस ना?मग तुझं ओळखपत्र दाखव?तेव्हा तिने ते मी घरी विसरल्याचे सांगितले.याच वेळी माझ्या मुलाने थोडासा व्हिडीयो काढला मात्र तो ही नंतर डिलिट झाला.मी माझ्या भावाला रुबिना पटेल हिच्याविषयी सांगितले असता,ती चांगली बाई नाही आहे,थोडं थांबून जा,ते आपल्याला जिवानेही मारु शकतात,अशी भीती व्यक्त केली त्यामुळे मी त्यावेळी तक्रार करण्यास थांबले.तिने आबू,त्याचा भाऊ शहजादा खान याचे ही नाव घेतले,माझ्या भावाचेही नाव घेतले,त्यात ती मनपातर्फे आली आहे,अशी खोटे ही बोलली मात्र यानंतर मी तिच्या नावाची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.




आमचे चॅनल subscribe करा
