फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमभाजप कार्यकर्त्याकडून महिलेला बेदम मारहाण!

भाजप कार्यकर्त्याकडून महिलेला बेदम मारहाण!

Advertisements

दक्षिणामुर्ती  चौकाजवळ पाताळेश्‍वर रोड येथील घटना

तक्रार नोंदवून २४ तास उलटूनही कोणतीच कारवराई नाही

चित्रा बडगे यांची न्यायासाठी गुहार

नागपूर,ता. १० जानेवरी २०२२ : नुकतेच महराष्ट्रसारख्या ‘पुरोगामी’ राज्याच्या विधीमंडळात महिलांच्या संरक्षणासाठी ‘शक्ती’ कायदा संमत झाला.स्वत: पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महिला व मुलांवरील अत्याचारात वाढ झाली असून यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा तयार केला असल्याचे सांगितले.या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची महत्वाची भूमिका राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा अवधी कमी होणार असून तपासामध्ये अधिक अचूकता येणार असल्याचे ते म्हणाले.महिलांची सुरक्षितता ही महाविकास आघाडीची प्राथमिकता असून महिलांवर अत्याचार करणा-यावर त्वरित कारवाई करुन कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचा सूतोवाच त्यांनी केला होता मात्र राज्याच्या उपराजधानीत व त्यांच्याच गृहनगरात काल सायंकाळी महाल येथील श्री दक्षिणामुर्ती  चौकातील पाताळेश्‍वर रोड येथे राहणा-या एका महिलेला भर रस्त्यात लोळवून लाथा बुक्कयांनी जबर मारहाण करण्याची घटना घडली,या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून देखील अद्याप मारहाण करणारा सचिन नाईक याला अटक झाली नसून तो याच प्रभागातील भाजपच्या नेत्याचा ’खास’कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.

या प्रभागाचे प्रतिनिधीत्व भाजपचे आमदार प्रवीण दटके व आमदार विकास कुंभारे करतात,हे विशेष!केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभाग क्र.१८ चा सचिन नाईक हा वॉर्ड अध्यक्ष असून मनपाच्या निवडणूकीत भावी नगरसेवक म्हणून देखील त्याचे नाव देखील घोषित झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.‘पार्टी विथ डिफरेन्स’या घोषवाक्यचं ब्रिद मिरविणा-या भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याची मजल एका महिलेला रस्त्यावर लोळवून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यापर्यंत जाते याचा सरळ सरळ अर्थ त्याला त्याच्या राजकीय ’गॉड फादर‘चा वरदहस्त प्राप्त आहे,व याचाच त्याल उन्माद आहे,असाच होऊ शकतो.भाजपचा भावी नगरसेवक कसा असू शकतो याची साक्ष या दूर्देवी घटनेने नागपूरकरांना दिली.

ही घटना काल ९ जानेवरी २०२२ रोजी घडली.चित्रा यशवंत बडगे यांचा एकूलता एक असणारा व ८ व्या वर्गात शिकणा-या मूलाने काल सचिन नाईक याच्या पुतण्याची पतंग कापली.या कृतीवरुन संतप्त होऊन सचिन नाईनने मुलाला मारहाण करण्यास सुरवात केली.मुलाचे वडील यांनी सचिन याला मुलाला मारहाण का केली म्हणून जाब विचारला असता वाद वाढला.नाईक आणि त्याचा भाऊ प्रशांत नाईक यांनी वडीलांच्या अंगावर धावून जाताच,जगातील कोणतीही गृहीणी करेल तेच चित्रा यांनी केले.त्या नव-याला मारहाण होत असल्याचे बघून मध्ये पडल्या मात्र ‘पार्टी विथ डिफरेन्स’च्या या कार्यकर्त्याने त्यांना रस्त्यावर लोळवून लाथा बुक्यांनी जबर मारहाण करण्यास सुरवात केली.यात त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले,मगंळसूत्र तुटले.देहावरील जखमेपेक्षाही जास्त घायाळ त्यांचा आत्मसन्मान झाला होता.यामुळेच ‘शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये’ असे वाडवडील अनुभवाचे बोल सांगून गेले असतानाही, त्यांनी सचिन नाईक याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी मात्र तक्रारीत कलम ३५४ हा विनयभंगाचा मुख्य घडलेला गुन्हा दाखल केलाच नाही. ३५३ व ५०४ म्हणजे किरकोळ मारहाण व शिविगाळ करणारे कलम नोंदवले. विनयभंगाचा प्रकार झाला असताना व महिलेनी प्रत्यक्ष घटना नमूद केली असताना ३५४ कलम पोलिसांनी तक्रारीत नोंदवलेच नाही. मारहाणीची तक्रार दाखल करुनही २४ तासांचा कालावधी उलटून देखील आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही.राजकीय दवाबातून कारवाई दाबण्यात आल्याची चर्चा आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाच्या या लढाईला नुकताच विधी मंडळात पारित झालेला ‘शक्ती’कायदा कितपत संरक्षण देतोय हे उपराजधानीतील या घटनेने जणू सिद्धच केले.

देशात महीलांविरुद्ध गुन्ह्यांबाबत या पूर्वी देखील अनेक सशक्त असे कायदे आहेत मात्र कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही किती सक्षमपणे व निष्पक्षरित्या याची अंमलबजावणी करते,हाच कळीचा मुद्दा आहे.शासकीय पातळीवर महिलांविरुद्ध किती ही ‘शक्ती’च नव्हे तर ’महाशक्ती’चे कायदे ही पारित झालेत तरी एफआयआरसारख्या न्यायाच्या प्राथमिक पायरीवरच त्याची अंमलबजावणी कशी होते यावरच त्याचे यश-अपयश निर्भर आहे.

या महिलेने कोतवाली पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर रात्री साढे दहा वाजता सचिन नाईक याचा भाऊ प्रशांत नाईक यांनी जबरीने त्यांचे दार ठोठावले.पोलिसात तक्रार का नोंदवली म्हणून बडगे कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.बडगे कुटुंब हे दाराला आतून कूलूप लाऊन झोपले.प्रशांत नाईक या विभूतीने रात्री मद्य प्राशन करुन धमकावण्याचे हे कृत्य केल्याचे त्यांचे म्हणने आहे.नाईक हा या प्रभागातील फार मोठा कुंटूबाचा खटला असून बडगे कुटूंबात मात्र फक्त मी,मुलगा व नवरा तिघेच असल्याचे त्या सांगतात.संपूर्ण वस्तीसमोर रस्त्यावर लोळवून झालेली मारहाण त्या काहीही केल्याने विसरण्यास तयार नाहीत.दूर्देवी बाब म्हणजे वस्तीतील एक ही साक्षीदार नाईक कुटुंबियांचा प्रभाव बघता व भाजप नेत्यांच्या दवाबाखाली, त्यांच्या न्यायाच्या या लढाईत त्यांना साथ देण्यास पुढे येण्याचे धाडस दाखवत नाही.

पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा निर्धार चित्रा या व्यक्त करतात.एका महिलेला भर दिवसा भाजपचा एक कार्यकर्ता रस्त्यावर लोळवून जबर मारहाण करतो,हे तक्रारीत नमूद असताना आता महिलांवरील अत्याचाराविरोधात रस्त्यावरची लढाई लढणा-या व महिलांचा कैवार घेणा-या भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेश महामंत्री अश्‍विनी जिचकार व अर्चना डेहनकर या आता कोणती भूमिका घेतात याकडे नागपूरकर महिलांचे लक्ष लागले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजनामे यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून नागपूरच्या रस्त्यावरुन त्यांची धिंड काढली असल्याचे नागपूरकरांनी बघितले आहे.एका महिलेच्या,एका लहान मुलाच्या आईच्या,एका पत्नीच्या आत्मसन्मानाला योग्य न्याय देण्यासाठी पोलिस उपायुक्त गजानन राजनामे हे निश्‍चितच राजकीय पक्षातील गुन्हेगारांवर देखील तशीच कारवाई करतील अशी अपेक्षाही नागपूर नागरिकांना त्यांच्याकडून आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या