फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमसंघ मुख्याल्याची पुन्हा एकदा दहशतवाद्याकडून रेकी: पोलिस आयुक्तांचा दुजोरा

संघ मुख्याल्याची पुन्हा एकदा दहशतवाद्याकडून रेकी: पोलिस आयुक्तांचा दुजोरा

Advertisements

नागपूरात हायअलर्ट

अद्याप कोणालाही अटक नाही

गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे :पोलिस आयुक्त अमितेशकुमार

नागपूर,ता. ७ जानेवरी २०२२: नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केंद्रिय तपास यंत्रणेकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह, रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

मात्र, या प्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  केंद्रिय तपास यंत्रणेकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह रेशीम बाग मधील संघाच्या डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारीच महत्वाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. आढावा घेऊन यात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्तांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली  याची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव दिली नाही.मात्र,या प्रकरणी युएपीए कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

जम्मू काश्मीरमध्ये एका तरुणाला केंद्रिय तपास यंत्रणेद्वारे अटक करण्यात आली आहे.. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नागपुरात रेकी झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील एका तरुण हा नागपुरात आला होता. जुलै २०२१ मध्ये नागपुरात दोन दिवस वास्तव्यास राहिला. याकाळात काही स्थानांची रेकी केल्याची माहिती केंद्रिय तपास यंत्रणेकडून नागपूर पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर सर्व माहिती नागपूर पोलिसांनाही देण्यात आली आहे. यात पाकिस्तानीच्या सांगण्यावरूनच तरुणाने नागपुरात रेकी केली असल्याचे समोर येत आहे. यामुळे या अनुषंगाने केंद्रीय समितीकडून चौकशी सुरू आहे.

या पूर्वी देखील १ जून महिन्यात २००६ साली ३ अतिरेक्यांनी संघ मुख्यालयावर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला होता मात्र त्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.या घटनेनंतर संघ मुख्यालय तसेच रेशीम बाग येथील डॉ.हेडगेवार स्मारकाची सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.

पुन्हा एकदा संघ मुख्यालय अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आल्याने नागपूरात पोलिस यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतील परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144(1)(3) प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करण्याची सूचना पोलिस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)

……………………………

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या