
सख्या आईला केली दगडाने जबर मारहाण
बहीण व तिच्या पतीचे फोडले डोके
अजनी पोलिसांची संशयास्पद भूमिका
गुन्हेगारांना पोलिसांचाच अभय:सारिका रावत हिचा उघड आरोप
पाच महिन्यांपासून न्यायासाठी सज्जनांचीच भटकंती
नागपूर,ता. २७ डिसेंबर २०२१: जोगीनगर गल्ली क्र.७,धाडीवाल ले आऊट,रामेश्वरी रोडवरील एक घर असे आहे ज्या घराच्या अंगणात म्हणायला तर भाजीचे दूकान आहे मात्र ते फक्त बघण्यासाठी.घराच्या आत जुआ,सट्टा,मटका,अवैध दारु,वेश्या व्यवसाय सगळं काही राजरोसपणे चालतं.वाममार्गाने पैसाही अमाप मिळत असतो,त्या पैश्यात अनेकांची ‘हिस्सेदारी’ही असते.अगदी खालपासून तर वरपर्यंत पण ज्यांना इमानेइतबारे जीवन जगण्याची सवय असते त्यांच्यासाठी संघर्षाची वाट ही खूपच खडतर असते,अशीच वाट ३९ वर्षीय सारिका सुजरसिंग रावत हिच्या वाटेला आली.
सारिका ही या अवैध गोरखधंदे करणा-या महिलेची सख्खी रक्तमांसाची बहीण.या दोन्ही बहीणींची ६७ वर्षीय आई सारिका हिच्या घरीच आपल्या दोन्ही नातवांसोबत राहते.सारिकाला १९ वर्षाचा व ११ वर्षांची अशी दोन मुले आहेत.
जोगीनगर येथील या घरात आपल्या कुटुंबासह मागील ३९ वर्षांपासूनच सारिका रहात आहे.तिचे पती सुरक्षा रक्षकाचे काम करतात,त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.७ जुलै २०२१ रोजी मात्र अघटित घडले.सारिका हिच्या मोठ्या मुलाला शेजारी राहणा-या बहीणीच्या घरात नेहमी येणारे अजय व अतुल हे गुन्हेगारी पार्श्वभूमीची मुले उगाच शिवीगाळ करीत होती.
हे बघून सारिका आपल्या मुलाचा हात धरुन घरात घेऊन जाऊ लागली असता. त्या दोन्ही मुलांनी सारिका हिलाच धक्काबुक्की केली.तिच्या अंगावरचे कपडे फाडून तिचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.सारिकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बहीणीचा नवरा जसबीरसिंग चन्ना हा देखील घरातून लाठी घेऊन बाहेर पडला.
लाठीने सारिकाला तुडवत असताना अजय याने दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली.अतुलनेही जसबीरसिंग याच्या हातातील लाठी घेऊन निशस्त्र,असहाय सारिकावर आपला पुरुषार्थ दाखवला. मग सख्ख्या बहीणीने काचंन चन्ना व तिच्या मुलाने मृणाल चन्नाने यांने देखील सारिकाचे केस धरुन मारहाण करण्यास सुरवात केली.
आपल्या पत्नीला जबर मारहाण होताना पाहून पती व ६७ वर्षीय आई धावत बाहेर आले मात्र सारिकाच्या पतीच्या डोक्यावर व पाठीवर जसबीरसिंग चन्नाने लाठीने प्रहार करुन जखमी केले.मृणाल चन्ना या नातवाने आपल्या म्हाता-या आजीला म्हणजे कांचन चन्ना हिने आपल्या जन्मदात्रीलाच लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरवात केली.कांचन हिने आपल्या आईला जमीनीवर खाली पाडले व तिच्या घुडघ्यांवर दगडाने प्रहार केला.जसबीरसिंग चन्नाने सारिका व तिच्या कुटुंबियांना, तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारुन टाकण्याची उघड-उघड धमकी दिली.
या सर्वांविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात कलम ३१९/२०२१ ३ अन्वये कलम १४३,१४७,१४८,१४९,३२६,३५४,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांची मेडीकल झाली,गुन्हेगारांविरुद्ध एफआयआर झाला, मात्र पुढे आता ६ महिने उलटले असतानाही काहीच घडले नाही.या भांडणाचं कारण शेजारी बहीणीच्या घरी चालणारे अवैध धंदे याचा विरोध करने सारिका हिला महागात पडले,असे ती सांगते.या अवैध धंधांना पोलिसांचे देखील अभय आहे हे तिला नव्हतं माहित…..!
आपल्या बहीणीच्या घरी चालणारे अवैध धंधांचे व्हिडीयो, पुरावे म्हणून देखील सारिका हिने अजनी पोलिसांना दिले आहेत मात्र ’सज्जनांचे रक्षण आणि दृष्टांचे निर्दालन’हे ब्रीद घेऊन मिरवाणा-या खाकी वर्दीमधील आतल्या माणसांना,साक्षात मृत्यूच्या सावलीत वावरणा-या सारिका व तिच्या कुटुंबियांविषयी आपले संवैधानिक कर्तव्य पार पाडावसे वाटत नाही,अजनी पोलिस ठाण्यातील अधिकारी हे गुन्हेगारांसोबत मिळालेले असल्याचा उघड उघड आरोप सारिका करते.
ज्यांनी रक्षण करायचे तेच भ्रष्ट झाले असल्याचा आरोप सारिका व तिच्या पतीने केला.जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम देखील एफआयआरमध्ये लावण्यात आले नसल्याचे ती सांगते.जीव मुठीत घेऊन आम्ही त्या घरात जगतोय.माझे पती कामावर जायला बघत नाहीत कारण त्यांच्या माघारी काय घडेल,कोणाचा मृतदेह त्यांना बघायला मिळेल?या भीतीने गेल्या ५ महिन्यांपासून ते होरपळत अाहेत.
जन्मदात्री आई हीला मधुमेह आहे.डॉक्टरने तिला दररोज चालायला सांगितले आहे मात्र आई या घटनेमुळे इतकी भेदरलेली आहे की अंगणातसुद्धा निघत नाही.
आमच्यासारख्या सज्जन लोकांनी घरात भीतीत जगावं आणि अवैध कामे करणा-यांनी ’हप्ताखोरी’पोहोचवली की त्यांनी निर्धास्त जगावं,हा कोणता न्याय?असा आक्रोश सारिका व्यक्त करते.
आमची केस कमकुवत किवा मजबुत करने पोलिसांच्याच हाती आहे.न्यायालयाची पहीली लढाई तर एफआयआरमध्ये काय आहे यावरच ठरत असते.ज्यांच्यावर जवाबदारी आहे तेच आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील,पैश्यांच्या हव्यासापोटी गुन्हेगारांना साथ देत असतील तर या जगात आमचा वाली कोण?असा मार्मिक प्रश्न सारिका, या भ्रष्ट आणि सर्वांगाने किडलेल्या व्यवस्थेला विचारत आहे!
मोठ्या आशेने प्रेस क्लब येथे आपल्या व आपल्या कुटुंबियांचे रक्ताने माखलेले फोटो व एफआयआरची कॉपी घेऊन सारिका व तिचे पती सुजरसिंग रावत, अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांना भेटायला आले होते.याच वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची देखील पत्र परिषद प्रेस क्लब येथे होती.त्यांना देखील या दाम्प्त्याने मदतीची याचना केली.
ज्वाला धोटे व दुनेश्वर पेठे यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून न्यायाच्या या लढाईत नक्कीच त्यांना मदत करु,असे आश्वासन दिले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
