फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजदेवेंद्र फडणवीसांविरुद्ध प्रकरणात साक्ष सुरु

देवेंद्र फडणवीसांविरुद्ध प्रकरणात साक्ष सुरु

Advertisements

नागपूर,ता. १५ डिसेंबर: ॲड सतीश उके यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ३ नागपूर येथे, कलम १२५(अ), लोकप्रतिनिधी कायदा प्रमाणे आरोपी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप निश्चित झाले असून,ते व्यवस्थित समजल्याचे हमीपत्र फडणवीस यांनी सादर केले होते.

यावर न्यायालयात साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी ५२ – दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ यांना, त्यांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ च्या विधान सभेच्या निवडणूकीच्या वेळी नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेले ‘प्रतिज्ञापत्र’ हे दस्तावेज घेऊन ,न्यायालयात साक्षीकरिता उपस्थित राहण्यासाठी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कोर्ट क्र. ३ नागपूर न्यायालयाने, आज दि. १५ डिसेंबर रोजी समन्स जारी केला आहे .

२०१४ च्या विधान सभेच्या निवडणूकीच्या वेळी नामांकन अर्ज सादर करताना त्यासाेबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेले दोन फौजदरी खटले यांची माहिती लपवून ठेवली होती.

हे कृत्य १२५ (अ)लोकप्रतिनिधी कायदा या अन्वये गुन्हा होत असल्याने फौजदारी कारवाई होण्याबाबत ॲड.सतीश उके यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या