फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूरचे पोलिस आयुक्त हे ‘मांडवली किंग’:ज्वाला धोटे यांचा घणाघाती आरोप

नागपूरचे पोलिस आयुक्त हे ‘मांडवली किंग’:ज्वाला धोटे यांचा घणाघाती आरोप

Advertisements

अमितेश कुमार यांच्यावर मोक्का लावावा:सरकारकडे करणार मागणी

बलात्कारित पिडीतेच्या न्यायासाठी राज्य महिला आयोगाकडे मागणार दाद

नागपूर,ता. २५ नोव्हेंबर: कायद्याच्या पुस्तिकेत एक ओळ आहे ‘शंभर अपराधी सुटले तरी चालेल मात्र एकाही निरपराद्याला शिक्षा होऊ नयेनागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे नागपूर शहरात ज्या पद्धतीचे ‘कायद्याचे’ राज्य चालवित आहेत ते बघता ‘शंभर निर्दोषांना शिक्षा झाली तरी चालेल मात्र एकाही अपराध्याला,खंडणीखोराला शिक्षा व्हायला नको’असं दिसून पडतंय.नागपूरचे पोलिस आयुक्त हे केंद्राने नियुक्त केलेले पोलिस अधिकारी नसून ‘मांडवली किंग’असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी आज गुरुवार दि. २५ नोव्हेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केली.याप्रसंगी मंचावर ॲड.सतीश उके उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ज्वाला धोटे म्हणाल्या,की आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा जमुना येथील फक्त वेश्‍यांनाच प्रताडीत केले नाही तर शहरातील तृतीय पंथियांना देखील त्यांनी हप्तेखोरीसाठी सोडले नाही!रस्त्यांच्याकडेला भीक मागून पोट भरणा-या अनेक तृतीयपंथियांनी माझ्याकडे तक्रार केली आहे की पोलिस त्यांना त्रास देतात,हप्ते मागतात.नियमित खंडणीची मागणी करतात,नाही दिले तर डंडे मारतात,अमितेश कुमार हे मृतांच्या टाळूवरील लोणी ओरबडणारे अधिकारी असल्याचा जळजळीत आराेप यावेळी ज्वाला धोटे यांनी केला.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देखील अश्‍याच प्रकारचे सूडबुद्धिने आरोप केले असून आम्ही त्याचा निषेध करतो.परमबिर सिंह आणि नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात मोक्का लावण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री व गृहविभागाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परमबिर सिंह असो किवा अमितेश कुमार हे दोघेही केंद्र सरकारचे अधिकारी आहेत.हे दोन्ही अधिकारी महाराष्ट्रात केंद्राच्या इशा-यावर काम करतात.परमबिर सिहं यांच्या बंगल्यावरील दूरध्वनी व खासगी मोबाईलमधील डेटा तपासल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी‘राज्याच्या जनतेसमोर येईल.हे दोघेही पोलिस अधिकारी नसून ‘मांडवली किंग’असल्याची टिका धोटे यांनी केली.खाकी वर्दीला गालबोट लावणारे,बदनाम करणारे आहेत.परमबिर सिंह व अमितेश कुमार हे ‘चोर चोर मौसेरे भाई’प्रमाणे काम करतात.अमितेश कुमार यांनी तर नागपूरात ‘पोलिसी राजवट’लागू केली असल्याची टिका धोटे यांनी केली.आघाडी सरकार काय करतेय?राज्यात ती अस्तित्वात आहे की नाही?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

पीडीत आदिवासी बलात्कारित महिलेच्या मूळ तक्रारीतून अमितेश कुमार यांच्या निर्देशावरुन परिमंडळ झोन क्र.२ च्या पोलिस उपायुक्ताचे नाव देखील वगळण्यात आले.या पोलिस उपायुक्तानेच पिडीतेला धमकावले होते व ५० लाख रुपयांच्या खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवण्यास सीताबर्डी पोलिसांना निर्देश दिले असल्याचे ज्वाला धोटे म्हणाल्या.

नागपूरच्या इतिहासात अमितेश कुमार पहीले असे पोलिस आयुक्त आहेत ज्यांना दर १५ दिवसांनंतर न्यायालयाची वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस मिळते.महाराष्ट्राच्या पोलिस विभागाला यामुळे गालबोट लागत नाही का?अमितेश कुमार हे पोलिस विभागावरील ‘काळे धब्बे’असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

पिडीत बलात्कारित महिलेच्या प्रकरणात दिरंगाई करण्यासाठी,पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी आर्थिक व्यवहार केला आहे का?अॅट्रासिटी अंतर्गत अश्‍या पोलिस आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.

शहरभरातील अनेक पिडीत महिलांचे मला रात्री-अपरात्रीही फोन येतात की पोलिस त्यांची तक्रार नोंदवून घेत नाहीत.देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेल्या संविधानाचे राज्य असताना महिलांना पोलिस ठाण्यात रात्री-अपरात्री बसवून ठेवण्यात येतं.पोलिस आयुक्तांच्या या संपूर्ण गैर कारभाराविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवणार असून न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा धोटे यांनी दिला.

अमितेश कुमार यांचे अतिशय जवळचे नातेवाईक हे मध्यप्रदेशातील रायपूर येथील भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटीचे सदस्य आहेत.भाजपच्या सर्व बैठकांमध्ये ते हजर असतात.काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी,राहूल गांधी,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवरची टिका ते सोशल मिडीयावर करतात.केंद्र सरकारच्या नावाखाली अमितेश कुमार हे भाजप पुरस्कृत अधिकारी आहेत का?असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या रेवतकर यांनी मुन्ना यादव याच्या घरासमोर धरणे प्रदर्शन केले होते.त्याच्या अटकेची मागणी केली होती मात्र अमितेश कुमार हे मुन्ना यादव सारख्या गावगुंडाला, फडणवीस यांच्या धाकामुळे पाठीशी घालतात.फडणवीस यांनी निदान त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना‘ची सुरवात त्यांच्याच शहरात त्यांच्याच पक्षातील गावगुंड, पक्षापासून दूर करण्यापासून करावी,असा टोला देखील ज्वाला धोटे यांनी फडणवीसांना हाणला.

मुन्ना यादव घरच्या महिलेवर बलात्कार करेल आणि म्हणले का माझ्यावर कौटंूबिक गुन्हा आहे?-
शहरातील बहूचर्चित गुंड मुन्ना यादव याने राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी त्याचे नाव फडणवीस याच्या यादीतील गुंड म्हणून घेताच प्रसार-प्रचार माध्यमांत ’त्याच्यावर दाखल गुन्हे हे कौटूंबिक असल्याची मखलाशी केली’उद्या तो घरातील महिलेवर बलात्कार करेल किवा एखाद्याची हत्या करेल तेव्हा देखील तो माझ्या घरातील महिलेवर बलात्कार केल्याची मखलाशी करेल का?असा जळजळीत सवाल ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला.

अमितेश कुमार यांनी अश्‍या भाजपच्या गुंडाला खुलेआम अभय दिले असून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांच्यावर मात्र तत्परतेने गुन्हे नोंदवले.शिवेसैनिकावर गुन्हा नोंदवला मात्र भाजपच्या एका ही नेत्यावर अमितेश कुमार यांनी गुन्हा नोंदवला का?शहरात कलम १४४ लागू असताना भाजपने वारंवार विशाल मोर्चे काढले तेव्हा अमितेश कुमार यांचा कायदा आणि अधिकार कुठे दडून बसतो?

नागपूरची जनता विचारते आहे हीच लोकशाही आहे का?पोलिस आयुक्तांची तानाशाही आम्ही शहरात नाही चालू देणार असा इशारा

देत नागपूरात पोलिसी राजवट आम्ही चालू देणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

अमितेश कुमार हे गृहसचिवांना चुकीची ब्रिफिंग करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या ठिकाणी आघाडी सरकारने नागपूरात योग्य पोलिस अधिकारी पाठवण्याची मागणी धोटे यांनी केली.

अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्यात स्वत:च्या गटातले लोकं नियुक्त केल्याचा आरोप करीत ,स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतिय हिंदी भाषिक पोलिस निरीक्षक नेमण्याचा सपाटा त्यांनी लावला असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी याप्रसंगी केला.हप्ता व्यवस्थित मिळाला नाही तर बदली करुन टाकली जाते,संपूर्ण पोलिस विभागात याची चर्चा असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या