

‘अभ्रद’ युतीने केला माध्यमांच्या विश्वासहर्तेचा बट्टयोबोळ
नागपूर,ता. ६ ऑक्टोबर २०२१:आज नागपूरातील प्रसार व प्रचार माध्यमांमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता,एका मासिकाच्या संपादकाला ५० लाखांची खंडणी मागणा-या महिला पत्रकाराला सीताबर्डी पोलिसांकडून अटक व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून तिला मिळालेला तात्पुरता जामीन ही ती बातमी होती… मात्र हायकोर्टाच्या परिसरातच ही महिला ढसाढसा रडू लागली,तिने गेल्या ६ दिवसांपासून आपल्या ६ वर्षीय चिमुरड्याचा चेहरा ही बघितला नव्हता,अत्यंत गरीब असणारी व अनुसूचित जमातीमध्ये मोडणारी ही महिला एका शातिर महीलेच्या सांगण्यावरुन एका आय-टी कंपनीत नोकरीला लागली व चांगलीच अडचणीत आली.
त्या पूर्वी फक्त काही दिवस एका क्राईम न्यूज पोर्टलमध्ये ती कामाला होती,याच पोर्टलने तिला पत्रकाराचं ओळखपत्र दिलं होतं,याशिवाय तिचा पत्रकारितेशी कोणताही सबंध आला नाही,त्या शातिर महिलेच्या ओळखीने ती त्या आय-टी कंपनीच्या नावाखाली पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून सर्रास सट्टेबाजी करणा-या नामांकित मालकाच्या मासिकामध्ये नोकरीला लागली,या मासिकेतही तिला काम जमले नाही त्यामुळे तिला गोपाल नगर येथील सट्टेबाज मालकाच्या दुस-या कंपनीमध्ये पाठवण्यात आले.
या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यालयात ती आणि ताे संपादक एकटेच होते,या संपादकाला भेटण्यास वृत्तपत्र व काही लोकल चॅनल्सचे पत्रकार ही येत होते.यामुळेही तिचे दडपण वाढले होते,अखेर संधी साधून या संपादकाने तिच्यावर २८ सप्टेंबर रोजी .बलात्कार केला!१७ ते २८ सप्टेंबर एवढेच दिवस तिने या संपादकासोबत नोकरी केली.
दुस-या दिवशी तिने काम सोडायचे असल्याचे सांगून संपूर्ण पगार देण्यास सांगितले मात्र संपादकाने ‘या कंपनीत येण्याचा मार्ग असतो जाण्याचा मुळीच नाही’असा फिल्मी डॉयलॉग मारला. गोपाल नगरमध्ये येण्यापूर्वी जी त्या मालकाच्या ज्या कार्यालयात काम करीत होती तिथे एकदा ती स्वच्छागृहात केली असता तेथील एका महिला सहकारीने तिची पर्स तपासली,त्यात तिला ती एका क्राईम पोर्टलची पत्रकार असल्याचे ओळखपत्र दिसले,यावरुन ती सट्टेबाजीचे रॅकेट उघड करण्यास आली असल्याचा समज तेथील लोकांना झाला,त्यांनी तिचे बोलणे कंपनीच्या मालकाशी करुन दिले.
या कंपनीच्या मालकाचे नागपूर शहरात तीन ठिकाणी मोठमोठी आय-टी कार्यालये आहेत,त्यात सर्वच तरुण मुली नोकरी करतात.बाहेरुन आय-टी चे मोठमोठे फलक असले तरी आतमध्ये सट्टा आणि आकडे यांचीच गोळाबेरीज फोनवर चालत असते.या तरुणीने अतिशय अल्पकाळ या कंपनीत काम केले असल्याने तिच्याकडे याचे पुरावे जमले.
एवढंच नव्हे तर तिचा दावा आहे त्या सट्टेबाज मालकाच्या सर्वच कार्यालयांमध्ये काम करणा-या जवळपास ५० टक्के तरुणी या देहव्यापारामध्ये ही लिप्त आहेज.या मुलींना बाहेर ही पाठवलं जातं.या मालकाची ट्रेव्हलस एजंसी देखील असल्याने जे-जे काही ‘अनैतिक’आहे ते सर्व या ठिकाणी सर्रास होत होतं.
तिला देखील झटपट पैसे कमावण्यासाठी संपादकाने ऑफर दिली मात्र तिने नकार दिल्याचे ती सांगते.यानंतर तिला गोपालनगरच्या कार्यालयात संपादकासोबत एकटीलाच पाठवण्यात आले.स्त्रीला परमेश्वारानी एक सहावे इंद्रिय दिले असल्याचे बोलले जाते,यामुळे कोणता पुरुष कोणत्या हेतूचा आहे हे तिला पटकन कळत असतं.तरीही ती एवढे दिवस एकांतात त्या संपादकासोबत काम का करत होतीस?असा प्रश्न तिच्या वकीलाने तिला विचारला असता,मला पुरावे गोळा करणे अत्यंत गरजेचे होते कारण मला कळले होते ही मोठी धनदांडगी आणि रसूखवाली माणसे मला एक दिवस नक्की फसवतील,असे तिचे उत्तर होते!
झाले ही तेच,तिने ८-१० माणसांना घेऊन कार्यालय गाठले व या अतिशय ‘सभ्य’ असणा-या या ‘बलात्कारी’ संपादकाला धमकावत ५० लाखांची खंडणी मागितली,असा गुन्हा तिच्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाला.यासाठी त्या अतिशय भाबड्या आणि जगाची समज नसणा-या महिलेला संपादकाने कार्यालयात बोलावून तिच्यासोबत गोडीगुलाबीचा संवाद साधून तिच्याकडून ती खंडणी मागते आहे का,एक लाख कशाचे मागतेय,मी तुला स्पर्श तरी केला का?अशी उत्तरे वदवून घेतली.
हे संभाषण त्या संपादकाने झोनच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकारीला ऐकवली,या पोलिस अधिकारीने तिच्यावर त्वरीत खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीताबर्डी पोलिसांना दिले,ज्या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तिच्यावरील बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी नकार दिला होता,त्याच पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ‘स्कॉटलेण्डच्या’ पोलिसांनाही मागे टाकून त्वरित तिच्यावर ५० लाखाच्या खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिला अटक ही केली……!
एक अबला स्त्री असूनही तिचे हे धाडस..तिने…शहरातील एका फार-फार मोठ्या राजकारण्याचा राजाश्रयप्राप्त, सट्टेबाजीचं साम्राज्य चालविणा-या मालकाला अडणचीत आणण्याचा प्रयत्न केला?तिची लायकी तरी काय होती?मुकाट्याने तिने त्या मालकाच्या सट्टेबाजीच्या आकड्यांच्या देवाण-घेवाणाची नोकरी करायची होती किवा ती तरुण असल्याकारणाने अतिशय पॉश पद्धतीने चालणा-या त्याच्या देहव्यापारातून बक्कळ पैसा तरी कमवायला हवा होता,पण?
एका मागास आदिवासी भागातून आलेल्या त्या महिलेला शहरातील या माणूसकीला नग्न करणा-या श्मशान वास्तवाची माहितीच नव्हती.‘मेट्रो’ सिटी म्हटली की तिथं राजकारणी…त्यांचे काळे-गोरे उद्योग…गुन्हेगारी जगतासोबतचे संबंध…सट्टेबाजांशी सख्य….पोलिसांसोबतचे अर्थपूण व्यवहार आणि त्यावर मुकुटमणी म्हणजे समाजातील काही भ्रष्ट,नीतीमुल्यांना विकून उत्तराखंडासारख्या राज्यात भव्यदिव्य हॉटेलची मालकी प्रस्थापित करणारा पत्रकार व त्याच्यासारख्या इतर काही, पैशालाच देव मानणा-या भ्रष्ट पत्रकारांची ‘अभद्र’युती असते हे नग्न सत्य त्या गरीब आदिवासी महिलेला माहितीच नव्हते,तिला वाटलं तिचा लढा सोपा आहे..तिच्यासोबत कायदा आहे,देशाचा संविधान आहे..न्यायालय आहे….!
आपल्या वकीलाला सांगितलेल्या बयाणात तिने आणखी एक ‘भयाण’ वास्तव सांगितले.ते म्हणजे त्या सट्टेबाजासाठी जी ‘खास’महिला काम करते ती नेहमीच आदिवासी भागात फिरत असते,१६ ते २१ वयोगटातील अतिशय गरीब आदिवासी मुलींना ती हेरत असते,त्यांना मग नागपूर मेट्रो सिटीत चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवते,त्या नागपूरला येतात,सट्टेबाजाच्या त्या कंपनीत ४-६ दिवस काम ही करतात नंतर अचानक…..त्या गायब होऊन जातात…..!
आदिवासी भागातील पोलिसांनी त्यांचा जर प्रामाणिकपणे शोध घेतला तर त्या दिल्ली,उत्तरप्रदेश,राजस्थान,मुंबई इ.शहरातील एखादा चकलाघरात चार भिंतींच्या आत आपला देह आेरबडून घेताना दिसून पडतील……!वकीलालाही प्रश्न पडला मग आदिवासी भागातील पोलिस करतात काय आहे?आदिवासी भागातील किती तरुणींच्या मिसिंगच्या तक्रारी आहेत?हे तो शोधू लागतो…..!
सत्र न्यायालयाने तिला जामीन नाकारला होता,तिने हायकोर्टात धाव घेतली,आज हायकोर्टाने तिचा तात्पुरता जामीन मंजूर केला,तिला सीताबर्डी पोलिस ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस हजेरी लावण्याचे आदेश दिले,सत्र न्यायालयाने तिच्या जामीन अर्जावर येत्या ८ ता.पर्यंत निकाल द्यावा तसेच येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत हायकोर्टाला संपूर्ण अहवाल कळवावा असे निर्देश दिले आहेत.
हायकोर्टातून तात्पुरता जामीन मिळताच,ही तरुणी एका लोकल चॅनलवर व्यक्त झाली.समाजातील धनदांडग्यांकडून तिच्यावर गुदरलेल्या अन्यायाला तिने भरभरुन वाचा फोडली.बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांनी नाही घेतली,तिच्या या लढ्यात कोणत्याही संघटना किवा संस्थेची तिला मदत मिळाली नाही,मुख्यमंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत,पंतप्रधानपासून तर महिला आयोगापर्यंत आता या पेटलेल्या महिलेने ई-मेल्स केले.
खंडणीचा गुन्हा दाखल करुन माध्यमांमध्ये तिची विश्वासहर्ताच नष्ट करण्याचा सट्टेबाजाचा डाव होता.विशेष म्हणजे उत्तराखंडात भव्यदिव्य हॉटेलचा मालक व मान बिंदू असणा-या पत्रकाराने तिच्या नावासह वृत्तपत्रात खंडणी मागितल्याची बातमी ठलकपणे छापली.आज तिने त्या लोकल चॅनलच्या प्रतिनिधीला बाईट देताना या सर्व वृत्तपत्रांची नावे घेतली…..!
तो संपादकच तिला या वृत्तपत्रांच्या पत्रकारांची नावे घेऊन गप्प बसायला सांगत होता,असे तिचे म्हणने आहे.या शहरातील मोठमोठ्या वृत्तपत्रातील काही पत्रकार,पोलिस,राजकारणी हे सर्व त्याच्या मालकाच्या खिशातील ‘गांधीजींच्या फोटोआड’ दडले असल्याच्या धगधगत्या वास्तवाची तिला वारंवार जाणीव करुन देत होता मात्र?तरीही ही वेडी बधलीच नाही.
आज तिचा हा व्हिडीयो माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आणि समाजातील प्रबुद्ध वर्ग हा राजकारणी,सट्टेबाज,पोलिस आणि पत्रकारांची ही अभद्र युती ऐकून स्तब्ध झाला…..!
राष्ट्रवादी अर्बन सेल व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी या महिलेवरील पोलिसांकडून झालेल्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून लवकरच त्या आता आपल्या आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती आहे.
ॲड.सतीश उके यांचे या महिलेने विशेष आभार मानले आहे.
आजपासून देवीचे पावन नवरात्र सुरु झालेत…नऊ दिवस ती देवी म्हणून पूजली जाईल अगदी…ते सट्टेबाज,ते राजकारणी,ते पत्रकार,ते पोलिसही देवीची भक्ती,अाराधना करतील,भक्तीभावाने तिचे दर्शन घेतील पण?तिचाच अंश असणा-या एका अबला महिलेच्या देहालाच नव्हे तर तिच्या अस्त्विालाच तार-तार करणा-यांवर ती पारलौकिक शक्ती तरी प्रसन्न होईल का?




आमचे चॅनल subscribe करा
