फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपुणे स्टेशन परिसरात ६ वर्षाच्या मुलींवरअत्याचार: आरोपींवर कडक कारवाई करण्याचे नीलम गो-हे...

पुणे स्टेशन परिसरात ६ वर्षाच्या मुलींवरअत्याचार: आरोपींवर कडक कारवाई करण्याचे नीलम गो-हे यांचे निर्देश

Advertisements

पुणे दि.०९ : काही दिवसात गौरीचे आगमन सर्वांच्या घरात येत आहेत परंतु काही दिवसांपासून पुण्यात मुलींवर अत्याचारचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. आज बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत एका रिक्षा चालकाने ६ वर्षाच्या मुलीला उचलून घेऊन तिच्यावर अत्याचार केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गंभीर दखल घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस प्रशासनास केली आहे.

तसेच डॉ.गोऱ्हे यांनी स्त्री आधार केंद्राच्या प्रतिनिधी अश्विनी शिंदे यांना पाठवून पीडित कुटुंबाची विचारपूस केली. यात धक्कादायक बाब समोर आली आहे की, या मुलींवर पूर्वी देखील अशीच घटना घडली असल्याची माहिती पीडित मुलीच्या आईने सांगितले आहे. या गोष्टीची शहानिशा करून माहिती सादर करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी बंडगार्डन पोलीस यांना दिली आहे. तसेच सदरील घटनेत या रिक्षा चालक यांचा कोणी साथीदार आहे का? हे देखील पाहणायची सूचना केली आहे.

त्याचप्रमाणे पुणे स्टेशन परिसरात मोठ्याप्रमाणात रिक्षा चालक आणि पुणे मुंबई खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि चालकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे अयोग्य पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकवर कारवाई करण्याचे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या