फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘टॉयलेट!‘:एक जीवघेणी व्यथा

‘टॉयलेट!‘:एक जीवघेणी व्यथा

Advertisements

करोनायोद्धा निमजे यांच्या कुटुंबियांचे घरच टॉयलेटमुळे घाणीत!

गडकरींचे पत्रही केराच्या टोपलीत!

लक्ष्मीनगर झोनच्या अधिका-याची अशीही मुजोरी!मनपा प्रशासनाचा कारभार ‘अमानवीयच!’

मनपा अति.आयुक्त राम जोशींची ‘व्हिजिट’ मात्र समस्या जैसे थे

प्रकरण पोलिसात: कुटुंबियांना न्यायाची अपेक्ष्ा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २४ ऑगस्ट: सुप्रसिद्ध नट अक्ष् यकुमार व गुणी अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा एक सुपरहिट चित्रपट ‘टॉयलेट:एक प्रेमकथा’चांगलाच गाजला होता,चित्रपटात अक्ष् यकुमारच्या घरी टॉयलेटच नसल्याने त्याच्या तरुण पत्नीची होणारी फरफट,कुचंबना,त्रागा,मनस्ताप आणि दु:खं भूमी पेडणेकरने आपल्या सशक्त अभियनातून प्रभावीपणे साकारले होेते,महाराष्ट्राच्या उपराजधानीत ही एक कुटूंब असे आहे ज्यांच्या घरी हक्काचे ‘टॉयलेट‘असून देखील फक्त ४ फूटांपर्यंत ‘उरलेली‘ पाईपलाईन अगदी त्यांच्या घराच्या गेट समोरील मनपाच्या मुख्य चेंबरला जोडण्यासाठी मात्र त्यांचा गेल्या ४ वर्षांपासून संघर्ष सुरु आहे,या काही फूट पाईपलाईनच्या अभावी त्यांचे घरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांतील एकूण ६ सदस्यांचे अवघे जीवनच ‘नरक’झाले, त्यांच्या नरकमय, यातनामय जीवनाची  व्यथा खास ‘सत्ताधीश’नेही प्रत्य क्ष अनुभवली.

नागपूरातील सुप्रसिद्ध किंग कोबरा सामाजिक संघटनेचे सर्वाधिक चपळ सामाजिक कार्यकर्ते व करोनायोद्धे ६७ वर्षीय चंदन पांडूरंग निमजे यांच्या कुटुंबियांची ही व्यथा आहे. दिल्लीतील वाणिज्य मंत्रालयात वरिष्ठ पदावरुन सेवानिवृत्त झालेले चंदन निमजे यांनी आयुष्यभर भ्रष्टाचाराचा एक पैसा ही घरात आणला नाही,शेवटपर्यंत तत्वाला घेऊन चालणा-या या अवलियाने मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्ष् णापर्यंत घरातील तुंबलेल्या टॉयलेटचे पाणी काढण्यातच आपली ‘प्रामाणिकता’ खर्ची घातली!

लक्ष्मीनगर झोनमधील प्रियदर्शनी नगर, भामटी ले-आऊटमधील त्यांच्या या घरात त्यांचे वडील पाडूंरग निमजे आणि आई शांताबाई निमजे राहत असत. या परिसरात सर्वांच्या प्लाट्सवर एकेकाळी फक्त झोपड्या होत्या.अश्‍यावेळी निमजे यांच्या घरी आपलं संपूर्ण सामान ठेऊन आजूबाजूच्या शेजा-यांनी आपापली घरे बांधली.आई-वडीलांच्या सर्वांवर उपकार करण्याचा संस्कार चंदन निमजे यांच्या देखील रक्तात उतरला होता मात्र त्या उपकारांची परतफेड सख्खे शेजारी आपल्या मुलाचे आणि नातवंडांचे आयुष्यच नरकात ढकलण्यात करतील याची त्या अगदी साध्या मनाच्या पती-पत्नीला कल्पना ही नव्हती.

जोपर्यंत चंदन निमजे हे दिल्लीत नोकरीत होते तोपर्यंत त्यांची दोन्ही मुले,मुलगी,सून,पत्नी सर्व सुखात होते मात्र निवृत्तीनंतर नागपूरातील आपल्या हक्काच्या घरात राहण्यासाठी आले अन्‌…….!तोपर्यंत आई-वडीलांचे रिकामे घर शेजारपाजारची मंडळी आपापली गाडी ठेवण्यासाठी,अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत होती,हे कुटुंब येथे राहण्यास आल्याबरोबर त्यांची अनेक बाबतीत ‘गैरसोय‘झाली आणि येथूनच वादाला सुरवात झाली.

घराच्या अधिकृत नकाशाप्रमाणे दीड फूट जागा दोन्ही बाजूने सोडणे गरजेचे असल्यामुळे तेवढी जागा सोडून या कुटुंबांनी सुरक्ष्ा भिंत बांधली पण शेजारच्या एका एकल राहणा-या आक्रमक स्वभावाच्या महिलेमुळे त्यांच्या वाट्याला दररोजची ही यातना आली.पती नसल्यामुळे व लक्ष्मीनगर झोनच्या काही अधिकारी,भाजपचे नगरसेवक,प्रताप नगर पोलीस ठाण्यातील काही पोलीसांमध्ये तिचा चांगला ‘वट‘असल्यामुळे त्यांचा संपूर्ण सहयोग तिला मिळत गेला,निमजे यांच्या मुलांवरच तिने विनयभंगांचे गुन्हे दाखल केले!उठसूट त्यांच्या तक्रारी घेऊन,मला व माझ्या तरुण मुलीच्या जिविताला या मुलांकडून धोका असल्याच्या खोट्या तक्रारी तिने दाखल केल्या.

याच महिलेवर अगदी सुरवातीला विश्‍वास ठेऊन चंदन निमजे यांनी आपली दीड फूटांवर बांधलेली पक्की भिंत तोंडली कारण त्या त्यांच्या शेजारी राहायला आल्यानंतर तिला देखील तिचा पाईप समोरील चेंबरपर्यंत जोडायचा होता,तिने सांगितले माझ्या भागात तर एवढी जागा नाही पण तुमच्या भागातून ही पाईप लाईन मला काढू द्या,तुमची ही पाईप लाईन चेंबरशी जुळेल आणि माझीपण जुळेल.

(छायाचित्र- दीड फूटांच्या गल्लीत टॉयलेटची तुंबलेली घाण!)

निमजे यांनी आपली भिंत तोडून पाईप स्वत:च्या जागेवरुन आपल्या नेहमीच्या परोपकारी स्वभावामुळे खूप मोठ्या मनाने, तिची पाईप लाईन टाकण्यास परवागनी दिली,त्यांची देखील पाईप लाईन टाकण्यास सुरवात झाली पण?ठेकेदार तिचेच होते….तिच्या पाईपने जास्तच जागा व्यापली…..!आणि निमजे कुटुंबाचा ड्रेनेजचा पाईप ४ फूट आधीच अडकला….!तिला वाटलं हे आपला पाईप काढायला लावतील कारण जागा यांची आहे आणि यातूनच तिचे साक्ष्ात देवांनाही न उमजणारे ‘त्रियाचरित्र‘सुरु झाले,यात तिला साथ मिळाली लक्ष्मी नगर झोनचे अधिकारी भिवगडे यांची,भाजप नगरसेवक लवकुमार यांची,या कुटुंबियांचे म्हणने कोणीही ऐकून घेण्यास तयार झालेच नाही……!असे या कुटुंबियांचे सांगणे आहे…तिच्या विषयी पराकोटीची सहानूभूती ठेवणारे हे महाभाग हे विसरुन गेले ‘टॉयलेट’ही अशी गरज आहे जी माणसांना दररोज भागवावी लागते,याशिवाय त्यांचे आयुष्य नरक होत असतं आणि तसे झाले ही …!

करोनाकाळात वापरले सार्वजनिक शौचालय!
शौचालयाची पाईप लाईन चेंबरशी जुळलीच नसल्याने दररोज विष्ठा त्यांच्याच घरात पसरते…जुन्या काळातील घर असल्यामुळे नियोजनशुन्य असून स्वयंपाक खोलीतच न्हाणीघर आणि टॉयलेट बांधण्यात आले आहे त्यामुळेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे पाईप लाईन तुडूंब भरताच स्वयंपाक खाेलीत आणि मागच्या बाजूला बांधलेल्या सुरक्ष्ा भिंतीजवळील संपूर्ण गल्लीच घाणीने भरुन जाते.यातच निमजे यांना नागपूरात ऐन करोनाकाळात जगासाठी करीत असलेल्या परोपकाराची भेट म्हणून करोनाची लागण झाली,त्यांच्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंबच करोनाबाधित झाले,अश्‍या भयंकर परिस्थितीत सुरक्ष्ति अंतर आणि स्वच्छतेची कल्पनाही हे कुटुंब करु शकत नव्हते,त्यांना प्रताप नगर पोलीस ठाण्याजवळील सार्वजनिक सुलभ शौचालयाचा वापर करावा लागला……..!

हक्कोच टॉयलेट असताना या कुटुंबाला हे दिव्य ही भाेगावे लागले,एक दिवस अखेर अख्ख्या कुटुंबालाच रुग्णालयात भरती व्हावे लागले! यातच चंदन निमजे या थोर करोनायोद्धाची करोनाविरुद्धची २० दिवसांची लढाई २६ मे २०२१ रोजी अयशस्वी ठरली मात्र मृत्यूपूर्वी देखील त्यांनी आपल्या मुलांकडून शब्द घेतला होता ‘चेंबरला पाईप जोडल्याशिवाय हे घर विकायचे नाही!’६ मे २०२१ रोजी त्यांना आपल्या समाजसेवेचे व्रत पूर्ण करताना करोनाचा संसर्ग झाला होता,फक्त एक विवाहित मुलगी व जावई यांनाच सगळ्यांसाठी धावपळ करावी लागली होती.६ महिन्यांपूर्वी स्वयंपाकखाेलीतील न्हाणीघर व टॉयलेटचे दार घट्ठ बंद करुन गच्चीवर तात्पूरते टॉयलेट बांधले मात्र….शेवटी ती घाण ही गल्लीतच साचते…..जाणार कुठे?

मनपाने फक्त त्यांच्या घरावर करोनाबाधितांचे घर म्हणून फलक लावण्याचे कर्तव्य पार पाडले होते,एक साधी व्हीटामीनची गोळी किवा तापाची गोळी देखील या कुटुंबियांना मनपाच्या आरोग्य विभागाकडून मिळाली नाही,उलट होते नव्हते ते सगळे पैसे ८ लाख रुपये उपचारांवर खर्च झाले!करोनायोद्धा निमजे यांच्या उपचारासाठी मनपाने त्यांना कोणत्याही कोविड सेंटरमध्ये देखील उपचाराची व्यवस्था मिळवून दिली नव्हती.ज्या योद्धाने मार्च,एप्रिल आणि मे महिन्याच्या भीषण करोना संसर्ग काळात, अतिशय निडरतेने शहरातील दहनघाटांवर करोनाबाधित मृतदेहांवर अत्यंसंस्कार केलेत,डिजेलच्या व्यवस्थेसाठी मध्यरात्रीत धाव घेतली त्या कर्मठ सेवाव्रतीच्या हक्काच्या घरात मृत्यूच्या पावणे चार महिने उलटल्यानंतर देखील टॉयलेटची काही फूट अंतर उरणारी पाईप लाईन बसवण्यासाठी व त्यांची अंतिम ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे कुटुंबिय आजही झटत आहेत….!

या करोनायोद्धाचे अखेरचे दर्शनही आयुष्याची ही सुख-दु:खाची जोडीदार घेऊ शकली नव्हती कारण रुग्णालयातूनच निमजे यांचे पार्थिव दहनघाटांवर नेण्यात आले होते…..!

मुर्दार्ड महानगरपालिका,संवेदनाशून्य मनपा प्रशासन,मगरुर लक्ष्मीनगर झोनचे अधिकारी,‘हवेत ’असणारे भाजपचे प्रभागातील नगरसेवक खाकी वर्दीतील पोलीस आणि शेवटी ‘टॉयलेट‘च्या काही फूटांच्या पाईपलाईनसाठी न्यायालयाच्या चौखटीवर रक्तबंबाळ होऊन फोडू पाहणारे डोके एवढंच त्यांच्या जीवनाचा सार उरला आहे.किंग कोब्राचे संस्थापक अरविंदकुमार रतुडी निमजे यांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घेऊन गेले,गडकरी यांनी निमजे या सेवाव्रती करोनायोद्धाची तक्रार तातडीने मनपा प्रशासनाने सोडवावी,असे पत्र ही दिले पण,संवेदना जागेल ती मनपा कसली?

एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवण्याचे धाडस मनपा प्रशासन करु शकतं यातच हे कुटुंब अर्धी लढाई हरलं होतं,वारंवार या महीलेद्वारे प्रताप नगर पोलीस ठाण्यात धमकी देणे,विनयभंगाची तक्रार नोंदवणे,यामुळे निमजे यांची दोन्ही उच्चविद्याभूषित मुले चांगलीच भेदरली व घाबरलेली आहे.अखेर प्रताप नगर पोलीस ठाण्यातील काही पोलीसांनीच त्यांना तोडगा सुचवला,तुम्ही पण तक्रार नोंदवा आणि न्यायालयाकडून तोडगा मिळवा,या कुटुंबाने त्या महीलेसोबतच स्वत:ची चार फूट उरलेली पाईप लाईन स्वत:च्याच जागेवर पूर्ण करु दय्ावी अशी मागणी करणारी याचिका अाता न्यायालयात दाखल केली मात्र अद्याप त्यांची याचिका न्यायालयाच्या पटलावर आली नाही,यातच करोनामुळे न्यायालयातही फक्त अत्यावश्‍यक याचिकांवर सुनावणी सुरु आहे.

एकीकडे गडकरी ५ वर्षात या शहराला प्रदुषणमुक्त करा अशी सूचना महानगरपालिकेला एसटीपीच्या उद् घाटनाप्रसंगी करतात दूसरीकडे तीच महानगरपालिका या शहरातील एका सज्जन माणसांच्या घरी अन्न,वस्त्र,निवारासारखीच अत्यावश्‍यक गरज असणा-या ‘टॉयलेट’ची सुविधा देऊ शकत नसेल तर गडकरी यांच्या कल्पनेतले नागपू स्वच्छता व पर्यावरणाच्या बाबतीत क्रमांक एकचे शहर कसे होणार आहे?हा प्रश्‍न या कुटुंबाला छळतोय…..!

नुकतेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत होणा-या मुल्यांकनात केंद्र सरकारच्या नगर व गृहनिर्माण मंत्रालयाच्यावतीने दिले जाणारे ‘वॉटर प्लस‘सर्टिफिकेशन मिळवण्यात नागपूर महानगरपालिका अपयशी ठरली हे कशाचे द्योतक आहे? मनपाच्या संवेदनाशून्य मानसिकतेचेच हे द्योतक नाही का?कशाच्या भरवश्‍यावर नागपूर महानगरपालिका असे गुणांक प्राप्त करण्याची अपेक्ष्ा करते जी गेल्या ४ वर्षांपासून या शहरातील एका कुटुंबातील ५ सदस्यांना ‘टॉयलेट‘चा ४ फूट पाईप त्यांच्या चेंबरला जोडू देत नाही!

हीच मनपा आणि याच मनपाचे अधिकारी एवढी दुर्गंधी येते तर संपूर्ण गल्लीलाच प्लास्टर का करुन घेत नाही?असा उरफाटा सल्ला ही देऊन मोकळी होते,प्लास्टर जरी केले तरी ती घाण अखेर जाणार कुठे?कमालीची बाब म्हणजे मनपाच्या सुशिक्ष्ति अधिकारी वर्गाने हा चेंबर बनवला तरी कुठे तर निमजे कुटुबियांच्या अंगणातील विहीरीच्या अगदी काही फूटांवर!संपूर्ण वस्तीची घाण या चेंबरमध्ये जमा होते,या घाणीमुळे विहीरीचे पाणीच दूषित झाले,मनपाची नळे नसती तर…..टॉयलेट सारखंच पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले असते,तरीही गडकरी अपेक्ष्ा ठेवतात प्रदुषणमुक्त,पर्यावरणपुरक वातावारण अश्‍या या मनपातर्फे नागपूरात ठेवण्याची!या झाेनचे अधिकारी याच कुटुंबियाला धमकावत होते,तुमच्या वडीलांनी आमची एवढी तक्रार केली आहे की आमची नोकरी धोक्यात आणली…..!द ग्रेट तुकाराम मुंढे यांच्याकडेही या कुटुंबियांनी दाद मागितली पण?या…अश्‍या…एका..सर्वसाधारण कुटुंबियांचा उवर्रित ४ फूटांचा पाईप ‘टॉयलेट’ची सुविधा मिळण्यासाठी चेंबरला जोडणे यात मुंढे यांचा कोणता पराक्रम साध्य होणार होता…..!यापेक्ष्ाही ‘लई भारी’कामे त्यांना करोनाकाळात होती…..!

मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी हे देखील तक्रार प्राप्त झाल्यावर या ठिकाणी अाले पण त्यांना त्या महीलेने अर्वाच्य शिव्या देऊन पळवून लावले……!दगडं ही फेकून मारले….!असे हे कुंटूबियचं सांगतात.

या कुटुंबाने शहरातील सर्व अधिकारी,पदाधिकारी,मंत्री,आमदार,पोलीस आधिकारी,जिल्हाधिकारी ते न्यायालय सर्वांची दारे आपल्या हक्काच्या ‘टॉयलेटसाठी’ठोठावली आहेत,अद्याप त्यांना यश मिळाले नाही,सुस्वभावी माजी महापौर संदीप जोशी हे लक्ष्मी नगर झोनचेच प्रतिनिधीत्व करतात,त्यांच्याकडूनही या कुटुंबाला बरीच अपेक्ष्ा आहे,त्यांना आपल्या वडीलांच्या बलिदानाचा कोणताही मोबदला नको,फक्त आपल्या वडीलांची अखेरची ईच्छा त्यांना पूर्ण करायची आहे,त्याशिवाय या नरकातून त्यांची सुटका होणार नाही,त्यांनाच या घरात राहायचे नाही,आम्ही दिल्लीतच बरे होतो,नागपूरचे लोकं थर्ड क्लास आहेत…असा संताप एमबीए झालेला निमजे यांचा धाकटा मुलगा व्यक्त करतो.. मात्र बाबांची अखेरची ईच्छा पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला हे घर ही नाही सोडता येणार….!या दोन्ही भावांच्या करोना काळात खासगी नोक-या गेल्या आहेत,वडीलांची पेंशन अजून ही सुरु झाली नाही,अत्यंत विकट अश्‍या आर्थिक विवंचनेत हे कुटुंबिय एकमेकांना धीर देत जगत आहेत….!

या कुटुंबाला आतापर्यंत सर्वप्रकारच्या आर्थिक,नैतिक,सामाजिक,राजकीय आणि न्यायालयीन लढाईमध्ये सदैव साथ देणारे अरविंदकुमार रतुडी यांनी या कुटुंबियांच्या न्याय हक्काच्या लढाईत आता नागपूरकरांचीच साथ मागितली आहे.यांना काहीही नको,फक्त त्यांचा पाईप चेंबरला जोडून द्या आणि यांची या जीवघेण्या नरकातून सुटका करा,एवढंच त्यांचही मागणं आहे…..!

(भ्रमण संवादक क्रमांक-अरविंदकुमार रतुडी- ९०४९५५०८५४)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या