फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम‘राज’ की बात कह दूं तो...!’गंगा-जमुना वस्तीतील ’विदारक’वास्तव

‘राज’ की बात कह दूं तो…!’गंगा-जमुना वस्तीतील ’विदारक’वास्तव

Advertisements

पोलिसांमुळे पुन्हा वस्तीतच आले!माय-बापासोबत करतात सेटिंग:वारांगणेची व्यथा

‘बदनाम‘वस्ती आहे तर राजू धकाते आमच्या घरांची रजिस्ट्री करवून का पैसा कमावत होता?वारांगणेचा सवाल

डीसीपी मतानी १५ दिवसांत काय चमत्कार घडवून आणनार आहेत?वारांगणांनाच्या काळजाचा चूकला ठोका

ज्वाला धोटेंच्या आंदोलनानंतर पुन्हा बॅरिकेट्स ‘जैसे थे!वस्ती हलवली तर न्यायालयात जाणार:ज्वाला धोटे यांचा इशारा

’सगळं काही ‘धान्य बाजारासाठी!’

१५ दिन जो क्या १५ साल भी बस्ती बंद रखेंगे ताे भी नही हटेंगे: तन बेचबेचकर मकान सरकार को देने के लिये नही खरीदा:वारांगणांचा निर्धार

‘सत्ताधीश‘ऑन द स्पॉट(भाग-२)

डाॅ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १५ ऑगस्ट: बुधवार दि.११ ऑगस्टच्या सायंकाळी ६ वाजतापासून अचानक गंगा-जमुना वस्तीच्या सर्व गल्ल्या सील करण्यात आला.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावर त्वरित ही कारवाई करण्यात आली होती.या मगील कारण म्हणजे शांती नगरमध्ये जी मोहल्ला बैठक घेण्यात आली होती त्यात भारतीय जनता पक्ष्ाचे माजी नगरसेवक राजू धकाते यांनी गंगा-जमुना वस्तीतील देह विक्रय करणा-या वारांगणांची तक्रार केली होती,या वारांगणा येथील रहीवाश्‍यांच्या घरासमोर येऊन ग्राहकांना आकर्षित करतात,वारांगणांकडे येणारे ग्राहक रेड पडली की आमच्या घरा समोरुन धावतात,या बदनाम वस्तीमुळेच आमच्या वस्तीतील मुलींची लग्नं होत नाही इ.अश्‍या असंख्य तक्रारी मांडल्या.त्यामुळे नागपूरात पोलीस आयुक्त पदी रुजू झाल्यावर कर्तव्यकठोर व शिस्तप्रिय समजल्या जाणा-या पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी ही वस्तीच सील करण्याचा आदेश दिला,परिणामी गेल्या बुधवारपासून ग्राहकी बंद झाल्यामुळे व पोटापाण्याचा पेच निर्माण झाल्यामुळे वस्तीमध्ये आतल्या आत ‘बरेच काही’धगधगत आहे.

सत्ताधीश’ने आजही या वस्तीत जाऊन वारांगणांशी संवाद साधला असता पहिल्या दिवशीचीच ‘धग’त्यांच्या मनात धगधगत असल्याचे दिसून पडले.विशेष म्हणजे आज देशाच्या स्वातंत्र्या दिनी १५ ऑगस्टच्या पावन पर्वावरही या वारांगणा आपापल्या मुलाबाळांच्या शिक्ष् ण आणि संगोपनाच्या विवंचनेत ‘पोलीसी पारतंत्र्यातच’होती!

महत्वाचे म्हणजे आज सकाळी राष्ट्रवादीच्या अर्बन महिला सेलच्या अध्यक्ष्ा ज्वाला धोटे यांनी या ठिकाणी जोरदार आंदोलन करुन येथील बॅरिकेट्स तोडून टाकले.तब्बल दोन तास त्या आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी उपस्थित होत्या मात्र त्यांच्या आंदोलनादरम्यान ‘मूक’भूमिका घेणा-या पोलिसांनी त्यांची पाठ वळताच ताबडतोब नवे बॅरिकेट्स आणून पुन्हा रस्ते बंद केले,एवढंच की थोडा पोलीस बंदोबस्त कमी झाला आहे.

झोन-३ चे उपायुक्त लोहित मतानी यांनी आज या वारांगणांशी संवाद साधताना ‘हमको काम धंदे नही है क्या हम १५ दिन में ही यहा से हट जायेंगे,तुमको काम देंगे,ये काम तुमको छोडना पडेंगा’असे म्हणाल्याचे वारांगणांनी सांगितले.पुराने अविनाश कुमार इन्होने भी ऐसा ही कहा था,आज कहां से काम देंगे?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.आमच्या वस्तीत ३ हजारच्या वर वारांगणा आहेत त्या प्रत्येकीला वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क काम देणार आहेत का?आमची ग्राहकी बंद करुन आम्हाला उपासमार घडावी आणि आम्ही गावाकडे निघून जाऊ असे जर पोलिसांना वाटत असेल तर १५ दिवस काय १५ वर्षे ही वस्ती सील केली तरी ’हमने पिछले २०-३० सालो से अपना तन बेचबेचकर मकान खरीदा है,ऐसे कैसे छोडकर चले जायेंगे?असा सवाल त्या करतात,काहीही झाले तरी आम्ही ही वस्ती खाली करणार नसल्याचा ठाम निर्धार त्या व्यक्त करतात!‘हम नही हटेंगे जीत हमारी ही होगी…..!

डीसीपी मतानी यांनी या वारांगणांना १५ दिवस कळ सोसा असे म्हणताच या वारांगणांचा काळजाचा ठोका चुकला आहे!आमची मुले याच ठिकाणी शाळेत शिकत आहेत,ऑन लाईन वर्ग सुरु आहेत मात्र बुधवारपासून त्यांच्या ही शिक्ष् णाचा खेळखंडोबा पोलीसांनी करुन ठेवला असल्याचा संतापही त्या व्यक्त करतात,नेमके मतानी हे १५ दिवसांनंतर काय करणार आहेत?हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.
मतानी यांना वाटत असेल आमचा धंदा बंद केला तर उपाशी मरण्यापेक्ष्ा आम्ही येथून निघून जाऊ तर त्यांनीच आधी सांगावे की बुधवार पासून त्यांनी आम्हाल जेऊ घातले आहे का?पुढे ही ते जेऊ घालणार आहेत का?आमच्या गावाला आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या शिक्ष् णासाठी,आईवडीलांच्या खर्चासाठी पैसे पाठवावे लागतात,भाई-भाभी अपने बच्चो को खिलायेंगे,पढायेंगे,हमारे बच्चो को गांव में कौन खिलायेंगा?

वस्तीवाल्यांना आणि शहरातील लोकांना वाटतं आमच्याजवळ खूप पैसा आहे,१५ दिवस ही धंदा नाही केला तरी आम्ही जगू शकतो पण त्यांनी येऊन वस्तीमधील किराणा दूकानवाल्यांना विचारावे आम्ही दररोज किती रुपयांचे तेल,तांदूळ,डाळ विकत घेतो?आमची हैसियत १० रुपयांचे तांदूळ घेण्याचीच असते.आमच्या खोल्यांमध्ये धान्याच्या कोठ्या तरी दिसतात का?

इतवारी किवा इतर मार्केटमध्येही ऑटोमधून जातो तर सभ्यतेने अंगावर ओढणी घेऊन जातो,ना लिपस्टिक लावतो ना मेकअप करुन बाहेर निघतो,सामान्य घरातील बायका या तरी लिपस्टिक लाऊन,मेकअप करुन घराबाहेर पडताना दिसतात,आता ऑटो स्टॅण्ड या वस्तीत दोनच ठिकाणी आहे तर येथील रहीवाश्‍यांच्या घरासमोरुनच जावे लागेल ना?मगर इज्जत से जाते है इज्जत से आते है…..!

हेच रहीवाशी किती घाणेरडे बोलतात आम्हाला!फब्ती कसतात,फिदीफिदी हसतात,हातवारे करतात,आम्ही करतोच ना सहन?यांच्यातील किती तरी जणांची मुले आमच्या पोटी जन्माला येऊन आमच्याच अंगणात खेळत आहेत…मजा मारायला वस्तीत येतात,पोलीसांचा धाक दाखवून पैसे ही हिसकावून घेतात तरी आम्हीच बदनाम आणि हे सभ्य?

हमारे यहा के लडके भी उनसे डरकर रहते है क्योंकी हम बाहर के है,महाराष्ट्र के नही,वो यही के है,हमारी उनके जितनी ताकद नही….!
हमारी ही बस्ती के बाहर मर्डर हूआ वो ताे पोलीसवाले रोक नही पाये,८ दिन पहले २२ साल की लडकी के साथ बलात्कार हूआ,२ साल के बच्ची के साथ बलात्कार कर उसका मर्डर कर दिया,ये सब तो बस्ती के बाहर हूआ फिर भी हमारी ही बस्ती बदनाम?सबसे बडी बात तो पोलीस की रेड पडी तो हमारी बस्ती मे एक १३ साल का लडका चाय बेचने के लिये आया था,वो इतना डर कर रास्ते पे भागा की उसका ऐक्सीडेंट हो गया और वो जगह पर ही मर गया!ये उस बच्चे का मर्डर नही है क्या….?

पिछली बार भी हमारे यहां की भल्लो सुदर्शन स्कूल के पास मर गई, पोलीसवालो ने रेड डाली तो इतना भगाया की उसका हार्टअटैक हो गया और वो जगह पर ही मर गई,पोलीसवालोंने तुरंत एंबूलेंस मे उसे गांव भेज दिया,ये बात बाहर आती तो कितने पोलीसवाले खूद जेल में जाते?
बस्ती में अगर अवैध धंदे होते है तो पोलीसवालो का काम है वो बंद करे,मगर जो इमानदारीसे धंदा करते है उन्हे तकलीफ क्यो?
हो…आम्ही आमच्या वस्तीबाहेरील रसत्यावर बसतो कारण आमचे आता थोडे वय झाले आहे…असेही काहींनी सांगितले…..!वस्तीच्या आतमध्ये अगदी लहान वयाच्या मुली भोगायला मिळतात त्यामुळे वस्तीत आत आल्यावर ग्राहक आमच्याकडे येण्या ऐवजी त्यांच्याकडे जातात….!आम्हाला महिन्याकाठी खोलीचे ५-६ हजार रुपये भाडे द्यावे लागते,वस्तीतील तरुण मुलींचीच कमाई झाली तर आमच्यासारख्या अर्धे वय झालेल्यांनी आता या वयात दूसरे काम काय करावे?

पोलीसवाल्यांनी ज्यांची स्वत:ची घरे आहेत त्यांना द्यावे ५० कोटी,भाड्याच्या घरात राहणा-यांना द्यावे १० कोटी,देतील का ते इतके पैसे?
शांती नगर महल्ला मिटींग मे जिस नगरसेवक राजू धकाते इन्होने हमारी शिकायत की है वो ही तो सबसे ज्यादा हमारे एरिया में घूमता है!किसीके मकान की रजिस्ट्री कर के दे,किसी का मकान बेचना,नकाशा सेंशन करा देना,काम के लालच में वो ही सबसे ज्यादा बस्ती में आता है,अब वो ही कह रहा है हमारी बस्ती की वजह से उनके बस्ती के लडकिया की शादी नही होती?

उसी के घर के पास स्कूल है चिंतेश्‍वर स्कूल,उस स्कूल के पास ही पानठेला है,सरकार बोलती है ना स्कूल के पास पानठेला नही होना चाहीये फिर इतना समाज का ठेकेदार बनता है तो उसने क्यो पानठेला बंद नही करावाया?वो स्कूल में हमारे बच्चे पढते थे अब वो स्कूल ही बंद हो गया,हमे अब हॉस्टल में रखकर बच्चो को पढाना पढता है….!

अब ठाकरे सरकार एक वॉर्ड का प्रभाग करनेवाली है शायद इसीलिये उसे लीडर बनना है,इलेक्शन लढना है,उनकी बस्ती से १६००-१७०० वोट लेने है इसलिये हमारे पेट पे लाथ मारेगा क्या?

बीजेपी की नगरसेविका वंदना यंगटवार और पहले की कांता पराते अच्छी थी,हमारी बस्ती के रस्ते अच्छे करवाये,स्ट्रीट लाईट लगवाई,गडर की समस्या दूर की,अब हमारे ‘लावारिस’वॉर्ड में भी २ बार झाडू लगता है,बस्ती मे साफसफाई रहती है,हम धकाते को क्यो वोट देंगे?
कितनी बार पोलीसने रेड मारी,कितनी बार उनको मायनर लडकीया मिली?हम दो बच्चो की मां को भी उन्होने मायनर बता दिया और सुधारगृह में भी भेज दिया….!

पोलीसवालाेसे डर कर नही अपने बच्चो के लिये भागते है-
जब भी रेड पडती है ना मॅडमजी तो पोलीसवालो के डर से नही भागते,वो हमे पकडकर १०-१५ दिनो के लिये जेल भेजते है ना तो, घर पर दूधमुंही बच्ची को भी देखनेवाला पीछे कोई नही रहता.बच्चो को स्कूल भेजनेवाला नही रहता,उन्हे पकाकर खिलानेवाला कोई नही रहता इसलिये हम जान दांव पर लगाकर भागते है….!

(छायाचित्र-पोलिसांच्या रेडमुळे गडरमध्ये पडून पाय मोडून घेणारी वारांगणा)

पोलीस पकडती है तो एक तो ‘एटीएम’ ले जाती है या घर में फोन करके बताने की धमकी ग्राहको को मिलती है इसलिये वो जहां से रस्ता मिले भागते है,रस्ता तो सरकारी है वो उधरवालो के घर के सामने से जाता है तो हमारी क्या गलती?

उनकी तो बात अमितेश कुमारने सुन ली,हमारी भी तो फियार्द सुननी थी,हम हमारे मकान से बाहर ही नही निकलेंगे,हमारे मकानो मे अमितेश कुमार चाहे तो टिन ठोक दे,जहा भी मायनर लडकी मिले उन्हे पकडकर ले जाये,जेल मे डाले लेकीन ‘बाहर के लोगो को मत बूलाओ ’ऐसे पोलीसवाले कहते है,ये तो हमारा १०० साल पुराना काम है,वो कैसे छोड देंगे?

२०१५ मे अविनाश कुमारने भी यहीच किया था,मगर कलेक्टर साहब सचिन कुर्वेने हमारे लिये पुनवर्सन किया है क्या पुछा था?फिर उन्हे ऐसे कैसे रस्ते पे निकालू?ऐसा बाेले थे….!

यहा के अनाज बाजारवाले कळमना नही जाना चाहते इसलिये हमारी बस्ती तोडकर या अनाज बाजार बनाना चाहते है,ऐसा भी हमने सुना है,हम लोगो ने मकान खाली नही किये तो बुलडोजर चला देंगे,मगर ये तो स्लम एरिया है,स्लम एरिये को नकाशे की जरुरत पडती है क्या?बाद मे ये फेज-१ मे आया,एनएमसी क्या कहती है?ओपन प्लाट का मॅप सॅन्शन कराना पडता है,हमारी बस्ती तो ओपन प्लाट नही थी ना?फिर कैसे हमारे घरो को अनाधिकृत बताते है?

सबसे बडी बात तो १० लोगो की बस्ती १०० लोगो की कैसे बन गई,क्योकी यहा से बच्चीया भाग जाती भी है तो पुलीस उसे लाकर फिर से उसके मांबाप को सौंप देती है…..!वो फिर से उसे धंदे पे बिठाते है……!मायनर छपडी तो उसकी मालकीन को पकडते है पर उसे जेल नही होती वो छूट कर फिर से बस्ती मे घूमती है….!

उनपर ऐसी कारवाई करे पोलीस की दूसरो को मायनर लडकी रखने की हिंमत नही होनी चाहीये,उसके मकान मालकीन को कडी सजा दे पोलीस और उस बच्ची की जिंदगी संवार दे…,हमारे रुबी के साथ क्या हूआ नही मालूम क्या?

अमितेश कुमारने हमारे लिये सिर्फ २ रास्ते रखकर चाहे तो पुरी बस्ती मे दिवार खडी कर दे,इससे दूसरे बस्तीवालो का तकलीफ नही होंगी,हमारी बस्ती की वजह से मार्केट एरिया की किंमत नही बड रही,ये भी सब झूट है…!

अमितेश कुमारांनी मोठ्यांच्या बंगल्यात कॅमरे लावावे:ज्वाला धोटे
यांची वस्ती कोणतेही कारण न सांगता सील करण्यात आली,आरोप ठेवले यांच्या वस्तीत चरस,गांजा,अफिम,दारुविक्रीसारखी अवैध कामे होतात.तर त्यावर अंकूश लावण्याचे कामच पोलीसांचे आहे,त्यासाठी वस्तीच चारही बाजूने सील करण्याची काहीही गरज नव्हती.या वारांगणाही संवैधानिक देशाच्याच नागरिक आहेत.आपण १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला जेलमधल्या काही गुन्हेगारांनाही आजाद सोडतो,या तर गुन्हेगारही नाहीत मग देशाच्या स्वातंत्र्य दिनीही या पोलीसी पारतंत्र्यात का?याचे उत्तर पोलीस आयुक्तांनी दय्ावे.
मोहल्ला मिटींगमध्येही पोलीस आयुक्तांनी फक्त एकच बाजू ऐकली,यांच्याही काही अडचणी आहेत त्या का नाही ऐकल्या?वस्तीवाले एवढे शरीफ आहेत का?यांना ‘रांड’म्हणतात,त्यांच्यावर थूंकतात,यांनी कधी वस्तीवाल्यांची तक्रार केली का?

अमितेश कुमारांनी मोठ्यांच्या बंगल्यात जरा कॅमरे लाऊन बघावे…खूप भयंकर बघायला मिळेल त्यांना….!

हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे जो त्यांनी आपल्या मर्जीने स्वीकारला आहे.‘मतानी‘’यांना सांगून गेलेत १५ दिवस थांबून जा,तुमचा बंदोबस्त होणार तर मतानी हे काही सर्वोच्च न्यायालय नाही,खासदार,मंत्रीही नाहीत,महाराष्ट्र शासनही नाहीत,मतानी यांच्यासारखे डझनभर डीसीपी शहरभर अाहेत,हे या ठिकाणचे करदाते आहेत आणि २०१५ मध्ये ही यांना येथून हूसकावून लावण्यात आल्याचा प्रयत्न झाला तेव्हा माननीय न्यायालाने पोलीसांच्या आदेशावर बंदी आणली होती.आजच माझे नागपूर बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष् प्रकाश जायसवाल यांच्याशी बाेलणे झाले त्यांनी ही सांगितले,हे तिथले करदाते आहेत त्यांना कायदेशीररित्या हटवूच शकत नाही.मग कायदेशीररित्या हटवू शकत नसल्यामुळेच त्यांच्या पोटापाण्यावरच गदा आणण्यात आली का?

माझ्या आंदोलनानंतरही पोलिसांनी पुन्हा संपूर्ण वस्ती बॅरिकेट्स लाऊन बंद केली असेल तर आता हा लढा आम्ही हायकोर्ट,सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ.यांना जर पोलीस धंदा करु देत नसतील तर प्रत्येकाच्या घरी १० हजार रुपये महिना पोहचवावा.पालकमंत्री स्वत: म्हणाले हे योग्य झाले नाही.

राज्यात माझी सरकार असून मी उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यांच्याकडे तक्रार का करत नाही?असे मला विचारल्या जातं पण पक्ष् म्हणून हे माझ्या तत्वात बसत नाही,उद्या मी प्रेशर आणून वस्ती उठवण्यापासून थांबवली असे नागपूरचे स्थानिक लोकंच मला नावबोटं ठेवतील,त्यामुळेच मी हा लढा कायदेशीररित्या लढणार आहे,सरकार दरबारी गुहार लाऊन नाही.
माझ्या वडीलांनी विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंनी या वारांगणा भगिनींना संरक्ष् णाचे वचन दिले आहे त्यांचे वचन मलाच पूर्ण करावे लागणार आहे.

(ृृृृृृछायाचित्र-ज्वाला धोटे यांची पाठ फिरताच वस्तीत पुन्हा लागलेले बॅरिकेट्स)

सध्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे जनरल डायरच्या भूमिकेत असून संपूर्ण वस्तीला त्यांना जालियंनवाला बाग करायचे आहे!आज देशाच्या स्वातंत्र्य दिनी अमितेश कुमार यांच्या मुलांनी मिठाई खालली असेल पण वारांगणांच्या या वस्तीत अनेक लेकरांना दूध ही मिळाले नाही.त्यामुळेच आम्ही आज बॅरिकेट्स तोडले,कोणतीही नारेबाजी केली नाही,शिवागीळ केली नाही.

१९९७ मध्ये ही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता वारांगणांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार: ॲड.शिल्पा गिरडकर(वरिष्ठ वकील,हायकोर्ट)

१९९७ मध्ये गौरव जैन वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.रामास्वामी यांनीसुद्धा जे वेश्‍या व्यवसायात आहेत त्यांनासुद्धा संविधानाने दिलेला समानतेेेेेचा अधिकार लागू होत असल्याचा र्निवाळा दिला.सामान्य लोकांच्या मुलांसोबत वेश्‍या व्यवसाय करणा-या वारांगणांची मुले शाळा-कॉलेजमध्ये शिकता कामा नये,हॉस्टेलवर राहता कामा नये,अशी याचिका दायर करण्यात आली होती त्यावर न्यायमूर्तींनी हा र्निवाळा दिला होता.

वारांगणांनाही संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारात सामाजिक,आर्थिक समानता लागू होते.त्यांना ही त्यांच्या आवडीचे काम करण्याची मुभा आहे.त्यांनी काम करु नये म्हणून पोलीसांनाही त्यांच्यावर कारवाईचे अधिकार नाही.त्यांनाही इतरांसारखेच प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार असल्याचे जजमेंट न्यायमूर्तींनीच दिले असल्याने नागपूरातील गंगा-जमुना मधील वारांगणांनाही संपत्ती घेण्याचा,उन्नती साधण्याचा,पोट भरण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या