

पत्नीसह पाच जणांची नृशंस हत्या:आरोपीची आत्महत्या
नागपूर : २१ जून: कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन एका व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीनं पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह सासू आणि मेहुणीची हत्या केली आहे. सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर आरोपीनं घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आलोक माथुरकर असं आरोपीचं नाव असून याने त्याची पत्नी विजया, मुलगी परी आणि मुलगा साहिल यांची त्याच्या स्वतःच्या घरात, तर शंभर फुटावर रोडच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या घरात सासु लक्ष्मी देविदास बोबडे आणि मेहुणी अमिषा यांची निर्घुण हत्या केली. आरोपीने सासू आणि मेहुणीला गळा चिरून ठार मारले तर पत्नी मुलगी आणि मुलाची डोक्यावर हातोड्याने फटके मारून हत्त्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास लावून घेतला.

मृतकांमध्ये आलोक माथूरकर(४५),त्याची पत्नी विजया(४०),मुलगी परी(१४),मुलगा साहिल(वय १०)सासू लक्ष्मीबाई(५५) व मेहूणी अमिषा बोबडे(१९) यांचा समावेश आहे.घटनेनंतर सासरे देवीदास यांना मानसिक धक्का बसला आहे.रात्री पाळीत कामावर गेल्याने ते यातून वाचले.मारेक-याने पत्नी,सासू व मेहूणीचा गळा धारदार चाकूने चिरला तर मुलाचा गळा दाबून हत्या केली.हत्येनंतर त्याने मेहूणीसोबत मोबाईलवर पोर्न क्लिप बघून बलात्कार केल्याचा अंदाजा व्यक्त केला जात आहे,एवढंच नव्हे तर त्याने मृत पत्नीसोबत देखील हेच कृत्य केले.
आलोक हा विकृत मनोवृत्तीचा असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले.त्याला तरुण मेहूणीसोबत अनैतिक संबध प्रस्थापित करायचे होते,यासाठी त्याने तिच्या मागे तकादाच लावला होता.या विरोधात तिने पोलिस ठाण्यात तक्रार ही नोंदवली मात्र नंतर मागे घेतली.या घटनेमुळे आरोपीच्या घरात बराच वाद होत होता.
सोमवारी सकाळी १० वाजता देविदास हे घरी आले मात्र अंगावर चादर असलेल्या पत्नी व मुलगी अजून झोपले असल्याचे समजून पुन्हा बाहेर पडले.विजेचे बिल भरले व घरमालकाला घरभाडे ही दिले.१२ वाजताच्या सुमारास ते मोठ्या मुलीकडे गेले.त्यांना नातवंडाचा खूप जिव्हाळा होता.मात्र अघटित घडून गेले होते.
माहिती मिळताच तहसील पोलिस स्टेशनचे हेडकॉन्सटेबल ताराचंद घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी दार तोडले असता घरात रक्ताचा सडा दिसला.बेडरुममध्ये विजया,परी यांचे मृतदेह होते तर आलोक गळफास घेतलेला दिसला.हे दृष्य पाहून पोलिसही स्तब्ध झाले!त्यांनी वरिष्ट अधिका-यांना माहिती दिली.पोलिस आयुक्त अमितेश कुमार,गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी,अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त लोहित मतानी,तहसील पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष् क जयेश भांडारकर यांच्यासह पोलिस ताफा तेथे पाेहोचला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तहसील पोलिस पुढील चौकशी करीत आहे.
४८ वर्षीय आलोक हा टेलरिंगचे काम करीत होता. गोळीबार चौकात तो भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आलोकचे मेहुणीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होत होते. यावरून पती- पत्नीमध्ये वाद होत होते. या वादाची परिणिती काल रात्री कडाक्याच्या भांडणात झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आलोक रविवारी रात्री जवळच राहणाऱ्या सासू लक्ष्मी यांच्याघरी गेला. तिथे त्याने सासू लक्ष्मी आणि मेहूणी अमिषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवे मारले. त्यानंतर तो रात्री घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने पत्नी, मुलगा व मुलगी या तिघांना ठार मारले. त्यानंतर सकाळच्या सुमारास आलोकने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना पहाटेच्यावेळी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुपारी १२च्या दरम्यान या घटनेचे वृत्त आगी सारखे शहरात पसरले त्यानंतर उपराजधानीत या भयानक हत्याकांडानं खळबळ उडाली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
