Homeराजकारणबार्टी,सारथी,महाज्योतीच्या धर्तीवर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत’ संस्थेला करा सुरू

बार्टी,सारथी,महाज्योतीच्या धर्तीवर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ‘अमृत’ संस्थेला करा सुरू

Advertisements

आमदार अभिजित वंजारी यांना आम आदमी पार्टी युवा आघाडीचे निवेदन

नागपूर,ता. १० जून: मंत्रीमंडळाच्या २० ऑगस्ट २०२० च्या बैठकीत बार्टी,सारथी,महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक, युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम,राबवून विद्यार्थी, युवक,युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy Of Maharshtra Research Upliftment And Training (AMRUT) “महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी” (अमृत) ही संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.

२२ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या(EWS) विकासासाठी अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये करण्यास मान्यता देण्यात आली होती. व सदर संस्था स्थापन व कार्यान्वित करण्याचे अधिकार बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना देण्यात आले होते.

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा-कुणबी,इतर मागासवर्ग- विमुक्त जाती भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग या समाजातील घटकांच्या विकासासाठी अनुक्रमे बार्टी,सारथी,तारती(TRTI), व महाज्योती या संस्था आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अशाप्रकारची कुठलीही संस्था सध्या अस्तित्वात नाही.

तेव्हा २० ऑगस्ट २०१९ च्या मंत्रिमंडळातील बैठकीनुसार व २२ ऑगस्ट २०१९ च्या शासननिर्णयानुसार स्थापन झालेल्या ‘अमृत’ या संस्थेस कार्यान्वित करून EWS या घटकाला समाजधारेत आणावे ही महत्वाची मागणी घेऊन आम आदमी पार्टी युवा आघाडी राज्य समिती सदस्या कृतल वेळेकर-आकरे यांच्या नेतृत्वात आ.अभिजित वंजारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतीक बावनकर प्रमुख्याने उपस्थित होते.

Latest बातम्या