

दोन डॉक्टर्ससह तिघांना अटक
नागपूर,ता. २७ मे: रेमडिसिव्हिरनंतर आता नागपूरात टोसिलीझुमॅब इंजेक्शन्सचीही काळाबाजारी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री रविनगर परिसरात सापळा रचून दोन डॉक्टर्ससह तिघांना अटक केली.या काळाबाजारीत देवदूत समजल्या जाणा-या डॉक्टर्सच्या सहभागामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सचिन अशोक गेवरीकर)वय २०,रा.मोहगाव,जि.बालाघाट)डॉ. विशेष उर्फ सोनू जीवनलाल बाकट(रा.परसवाडा,जि.बालाघाट)व डा. रामफल लोलर वैश्य(वय २४,रा.नरेंद्रनगर अजनी) अशी अटकेतील तिनही आरोपींचे नावे आहेत.
सचिन हा बीएच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे.त्याच्या आईला करोना झाला होता.त्याच्याकडे टोसिलीझुमॅब हे इंजेक्शन होते. डॉ.सोनू आणि डॉ.रामफल यांच्या मदतीने सचिन हा इंजेक्शन एक लाख रुपयांमध्ये विक्री करण्याच्या प्रयत्नात होता.याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांना मिळाली.
शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्ष् क कुणाल धुरट,हेडकॉन्सटेबल रामदास नरेकर,आशिष वानखेडे,संतोष शिंदे यांनी रविनगर परिसरात सापळा रचना.पोलिसांनी आधी सचिन याला अटक केली.त्यानंतर अन्य दोन डॉक्टरांना अटक केली. तिघांविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.अंबाझरी पोसिलसांनी तिघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची २८ मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
करोना महामारीने माणूसकीचे खरे रंग जगासमोर उघड केले.रुग्णांना बेड,औषधे ही वेळेवर मिळू शकले नाही.यातूनच करोनावरील अत्यावश्यक औषधांची काळाबाजारी होऊ लागली.रेमडिसिव्हिरचे एक इंजेक्शन हे देखील पाऊण लाखांपर्यंत काळाबाजारात विकण्यात आल्याची समाेर आले आहे.काहींनी तर बनावट इंजेक्शन विकूनही पैसा कमावला.
काहींनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना ते इंजेक्शन न लावता बाहेर काळाबाजारात दाम दुप्पट किंमतीत विकले.रुग्णांच्या जीवाशी खेळ करणा-या आरोग्य व्यवस्थेविरुद्ध नागरिकांच्या मनात चांगलाच रोष आहे.
रुग्णसंख्या कमी झाल्यावर तरी हा काळाबाजार थांबेल अशी अपेक्ष्ा होती.मात्र बुधवारी टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले.यात दोन डॉकर्ट्सचाच सहभाग दिसून अाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
यापूर्वी पोलिसांनी रेमडिसिव्हिरच्या काळाबाजारातही डॉक्टरला अटक केली होती.शहर पोलिसांनी रेमडिसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणात आठ गुन्हे दाखल केले.यात डॉ.लोकेश प्रल्हाद शाहू व वर्धा जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरचा समावेश आहे.पोलिसांनी एकूण ३२ आरोपींना अटक केली.यात १५ जण वॉर्डबॉय तर १६ खासगी काम व शिक्ष् ण घेत आहेत.काही परिचारिका देखील यात अडकल्या.
ााप्रतापनगर,सदर,सीताबर्डी,बेलतरोडी,सक्करदरा,वाठोडा,जारीपटका व नवीन कामठी भागात पोलिसांनी कारवाई केली.




आमचे चॅनल subscribe करा
