फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशआणि ‘खेला हो गया’.....

आणि ‘खेला हो गया’…..

Advertisements

ममता बॅनर्जी आधी विजयी नंतर पराभूत!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

प.बंगाल:दि.२ मे: प.बंगालच्या बहूप्रतिक्ष्ति निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष् लागले होते.आज रविवार दि. २ मे रोजी केरळ,तमिळनाडू,पुट्टूचेरी,आसाम आणि प.बंगाल या पाच राज्याचे निकाल जाहीर झाले,मात्र संपूर्ण देशाचे लक्ष् हे प.बंगालच्या निकालांकडे असल्यामुळे माध्यमांवर देखील याच राज्यातील निकालाच्या विश्‍लेषणावर विशेष भर होता.प.बंगालच्या निवडणूकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने निर्भेळ यश मिळवित एकूण २९२ जागांपैकी २१५ जागांवर आघाडी घेतली तर ज्या भारतीय जनता पक्ष्ाने या राज्यात पंतप्रधानांसह आपली संर्पूण केंद्रिय फौज उतरवली होती त्यांनी देखील नेत्रदिपक असे यश प्राप्त केल्याचे दिसून पडते २०१४ च्या निवडणूकी फक्त ३ जागांवर विजयी झालेली भाजपा यंदा ७६ जागांवर विजयी झाली आहे.मात्र सर्वात मोठा ‘खेला’ झाला तो सायंकाळी ६ वाजता नंदीग्राममध्ये!

नंदीग्राममधून निवडणूक आयोगाने सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विजयी झाल्या असल्याची घोषणा केली,यानंतर पंतप्रधान मोदींपासून तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पासून तर महाराष्ट्रातील सर्वच पक्ष्ाच्या मंत्र्यांनी ममता बेनर्जींवर शुभेच्छांचा वर्षाव केला.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवारल यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले मात्र हा विजय

औतघटकेचा ठरला अाणि अचानक वृत्त झळकले नंदीग्राममधून भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी १७३६ मतांनी विजयी झाले!
अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली.ती मागणी स्वीकारीत निवडणूक आयोगाने मतांच्या फेरमोजणीत अधिकारी यांना ममता बॅनर्जीपेक्ष्ा अधिक मत मिळाले असल्याची घोषणा करीत १७३६ मतांनी ते विजयी झाले असल्याची व ममता बॅनर्जी पराभूत झाल्याची घोषणा केली.यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते हिंसक झाले त्यांनी हल्दीया मतमोजणी केंद्रासमोर अधिकारी यांच्या गाडीवर तूफान दगडफेक केली.

हा निकाल अपेक्ष्ति नसल्याचे सांगून ममता बॅनर्जीनेही आता निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली आहे.बातमी लिहेपर्यंत अद्याप यावर निर्णय झाला नव्हता मात्र २१५ जागांचे निर्भेळ बहूमत मिळवून देखील स्वत:मुख्यमंत्री हे अवघ्या पावणे दोन हजार मतांनी पराभूत होतात,हाच सर्वात मोठा ‘खेला ’झाला असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटली.

या निवडणूकीत काँग्रेस आणि डाव्यांचे पुरते पानिपत झाले.२०१४ च्या निवडणूकीत ७० जागा जिंगणा-या या युतीला यंदा भोपळा ही फोडता आला नाही,राष्ट्रीय पक्ष् असणा-या काँग्रेस पक्ष्ाची ही सर्वाधिक टूकार कामगिरी असल्याचे स्पष्ट झाले.आता तरी दिल्लीतील हायकमान आपला सेनापती बदलणार आहे का?पराभूत मानसिकतेच्या सेनापतीकडून युद्धे जिंकली जाऊ शकत नसल्याचे पुन्हा बंगालच्या निवडणूकीने सिद्ध केले.

ही निवडणूक सर्वस्वी ‘मोदी वर्सेस दिदी‘अशीच रंगली होती.निवडणूकव्यूहरचनातज्ज्ञ प्रशांत किशाेर याची स्ट्रेटेजी पुन्हा एकदा यशस्वी झाली.भाजप १०० च्या वर गेल्यास मी निवडणूकीचे काम सोडून देणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले होते.त्यांचे गणित अचूक निघाले असले तरी त्यांनी आता प.बंगालच्या व्यूहरचनेमधून माघार घेत असल्याचे आश्‍चर्यकारकरित्या जाहीर केले आहे.

भाजप मात्र प्रबळ विरोधी पक्ष् म्हणून समोर आला आहे.२०१४ मध्ये ३ टक्के मत मिळवणा-या भाजपने या निवडणूकीत ३८ टक्के मते संपादित केली आहे.३ वरुन ७५ जागांपर्यंत भाजपने मजल गाठली आहे मात्र पंतप्रधानांपासून तर गृहमंत्री अमित शहा व अनेक सेलिब्रिटभंची फौज मैदानात उतरल्यानंतरही पं.बंगाल त्यांना काबिज करता आला नाही,पं.बंगालमध्ये बूथलेवलवर अद्याप भाजपला बरेच काम करायचे आहे हे या निवडणूकीने अधोरेखित केले. काँग्रेस व डाव्या पक्ष्ांचे पानीपत व ७० जागांचे नुकसान पाहता भाजपला मिळालेल्या ७० जागा या उल्लेखनीय ठरतात.त्यांनी आपल्या सगळ्या जागा भाजपच्या खात्यात वर्ग केल्याचे मिम्स चांगलेच व्हायरल झाले.तृणमूलने २०१४ च्या निवडणूकीत २११ जागा मिळवल्या होत्या त्यात आणखी ४ ची भर पडली.त्यांनी आपला ४८ टक्के मतांचा टक्का कायम राखला.सर्वात दयनीय अवस्था काँग्रेस व डाव्यांची झाली.

या निवडणूकीत भाजपने आपल्या सीटिंग खासदारांचे मात्र चांगलेच पानितप केले.खासदारकी जिंकणारे बाबूल सुप्रियो यांना मात्र आमदारकी भरपूर महागात पडली.हेच लोकतंत्राचे वैशिष्ट आहे.सुप्रियो यांना तेथील मतदारांनी दिल्लीत निवडून पाठवले मात्र राज्याच्या कारभारात त्यांनी लक्ष् घालावे हे तेथील जनतेला रुचले नाही.भाजपने उगाच हा ब्लाईंड गेम खेळला.या निकालानंतर राज्यसभेत मात्र भाजपचे प्राबल्य आणखी वाढणार हे ही विसरता येणार नाही.

५ ‘एम‘फॅक्टर-
तृणमूलच्या निर्भेळ यशात ५ ‘एम‘फॅक्टरने सर्वात जास्त भूमिका बजावली असल्याचे जाणकार सांगत आहे.स्वत: ममता बॅनर्जी,४९ टक्के असणा-या महिला मतदार,स्वत: मोदी-मोदींचा ‘दिदी ओ दिदी‘म्हण्याच्या अंदाजावर चिडलेला प.बंगालचा मतदार,२८ टक्के एकजूट राहीलेले मुस्लिम वोट आणि २८ टक्के असणारे मथूआ मतदार.भाजप या मतांमध्ये प्रयत्न करुन ही सेंध लाऊ शकली नाही.हैदराबादचे अोवेसी यांना देखील या राज्यात आपली डाळ शिजवता आली नाही.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांना विजयाची खात्री होती कारण प्रचारादरम्यान मला मतदारांच्या डोळ्यात त्यांच्याविषयी कोणती भावना आहे?ती दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशांत किशोर यांनी देखील भाजप व तृणमूलच्या मतांच्या टक्केवारीमध्ये तब्बल ९ ते १० टक्क़्यांचा फरक होता व एवढा फरक निवडणूक जिंकण्यासाठी व हरण्यासाठी पुरेसा असल्याचे ते म्हणाले.
मराठीत म्हण आहे ‘गढ आला पण सिंह गेला’ममता बॅनर्जी यांनी बलाढ्य अश्‍या केंद्राच्या विरोधात एकहाती बंगालची निवडणूक लढवली याच शंका नाही.गेल्या १० वर्षांच्या कारभाराचा हिशेब देखील या निवडणूकीत प.बंगालची जनता घेणार होती,त्यांच्या कारभारावर प.बंगालची जनता समाधानी आहे,यावर शिक्कामोर्तब झाले.

नंदीग्राममध्येच त्यांनी दूर्गा मंदिरात पूजा केली.नंदीग्रामध्येच त्यांनी आपले गोत्र सांगितले.नंदीग्राममध्येच त्यांनी चंडीपाठ म्हणून दाखवला.नंदीग्राममध्येच त्यांच्या पायाला अपघात झाला आणि नंदीग्राममध्येच त्यांच्या सोबत जय-पराजयाचा ‘खेला ’झाला.आज विजयानंतर जनतेला संबोधित करताना मात्र त्या व्हीलचेअरवर न येता चक्क आपल्या पायावर चालत आल्या.पाच दिवसांपूर्वीच पायातील प्लास्टर काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.५ दिवस घरीच आराम केला व आज मी चालू शकते असे त्यांनी सांगितले.नंदीग्रामच्या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.शरद पवार यांनी मात्र नंदीग्राममध्ये रंगलेल्या या ‘खेला’वर तीव्र संताप व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे शुभेंदू अधिकारी यांना १,९९८६ तर ममता बॅनर्जी यांना फेरमतमोजणीत १,७९३७ मते मिळाल्याची घोषणा केली.उद्या पुन्हा नंदीग्राममध्ये कोणता ‘खेला’ होतो याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष् लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या