फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरुलिंगवर विश्‍वास नसेल तर रुलिंग देऊ का?महापौरांचा दटकेंना सवाल

रुलिंगवर विश्‍वास नसेल तर रुलिंग देऊ का?महापौरांचा दटकेंना सवाल

Advertisements

मनपा सभेत आजी-माजी महापौरांची शाब्दिक चकमक

नागपूर,ता. २५ मार्च: गेल्या जून २०२० मध्ये मनपाची सभा ही भट सभागृहात प्रत्यक्ष् पार पडली,त्यानंतर मनपाच्या सभा या सातत्याने ऑन लाईन म्हणजे आभासी पद्धतीनेच पार पडत आहे.या ऑन लाईन सभेत मात्र सभासदांचे बोलणे,त्वेष,मुद्दे,वाद-प्रतिवाद,खंडन-विखंडन हे देखील आभासी पद्धतीनेच कानी पडत असतात,यातच गुरुवारी देखील पार पडलेल्या मनपा सभेत महापौर दयाशंकर तिवारी यांचे शब्द दटके यांच्या लक्ष् वेधीवर निर्देश देताना कानी पडलेत ‘तुम्हाला माझ्या रुलिंगवर विश्‍वास नाही का?विश्‍वास नसेल तर मी रुलिंग देऊ का?महापौरांच्या या शाब्दिक फटका-योन दटके आवाज मात्र बराच वेळ ‘म्यूट’होता!

प्रकरण होतं मनपाच्या कर संकलन विभागाचे कर्मचारी कश्‍याप्रकारे काही प्रतिष्ठित व्यसवायिकांचे कोट्यावधीचे कर कमी करुन भ्रष्टाचार करतात.यावर दटके यांनी निग्रहाने महापौरांकडे चौकशी समितीची मागणी केली,यात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांचा समावेश असावा,असा त्यांचा आग्रह होता.मात्र आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी ही संपूर्ण बाब प्रशासकीय असल्याने प्रशासकीयस्तरावर चौकशी सुरुच असल्याचे सांगितले व अश्‍या कोणत्याही समितीची गरज नसल्याचे सांगितले.

यावर निर्देश देत असताना महापौरांनी देखील आयुक्तांच्या या भूमिकेचा उल्लेख करताच दटके यांनी ‘समिती नसेल तर मी निषेध व्यक्त करतो’अश्‍या शब्दात निषेध व्यक्त करताच महपौरांनी तुमचा महापौरांच्या रुलिंगवर विश्‍वास नाही का?अश्‍या शब्दात दटके यांची कानउघाडणी केली,विश्‍वास नसेल तर मी रुलिंग देऊ का?असा दटके यांनाच प्रश्‍न विचारला,अद्याप पूर्ण रुलिंग झालेच नाही,तुम्ही तुमचा आक्ष्ेप पूर्ण ऐकून घेतल्यावरही नोंदवू शकता,रुलिंगच्या मध्येच बोलण्याने किवा रुलिंग पूर्ण ऐकून न घेताच दटके यांच्या या अश्‍या वक्तव्याने महापौरही अस्वस्थ झाले.

महापौरांच्या अश्‍या शाब्दिक फटका-याने दटके हे बराच वेळ ‘म्यूट’होते!

विशेष म्हणजे यानंतर महापौरांनी जी त्रिसदस्यीय चौकशी गठीत केली त्यात उति.आयुक्त आयुक्त जलज शर्मा,सहायक आयुक्त तसेच कर सकंलन समितीचे सभापती यांचा समावेश केला.इथे ही दटके यांच्या पदरी निराशाच पडली असल्याची चर्चा आज सभेनंतर ऐकू आली.सभेनंतर माजी महापौर हे त्वेषानेच मनपा मुख्यालयातून बाहेर पडताना आढळले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या