Homeनागपूर न्यूजवसुली अभियानातून अनिल देशमुखांना पैसे पाठवू:चंद्रशेखर बावणकुळे

वसुली अभियानातून अनिल देशमुखांना पैसे पाठवू:चंद्रशेखर बावणकुळे

भाजपचे  आंदोलन

नागपूर,ता. २१ मार्च: राज्याचे माजी पोलीस महासंचालक परमबिरसिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या खळबळजनक खुलास्यामुळे राज्याचे राजकीय वातावतरण चांगलेच तापले आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपूरात भारतीय जनता पक्ष्ातर्फे संविधान चौकात आंदोलन करण्यात आले,यात वसुली सरकारच्या गृहमंत्र्यांना आम्ही भाजपचे लोकं वसूली करुन पैसे पाठवू असा घणाघात बावणकुळेंनी केला.

भाजप अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.१०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावरही आतापर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.

संवेदनशील व्यक्ति असते तर राजीनामा दिला असता असे ते म्हणाले त्यामुळेच भाजप आज संपूर्ण महाराष्ट्रात गृहमंत्री जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे बावणकुळे म्हणाले.प्रवीण दटके,संदीप जोशी व सर्व आमदारांनी देशमुखांसाठी वसूली अभियान चालविले असून ते पैसे आम्ही अनिल देशमुखांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविणार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.

अनेक फ्लोरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री म्हणाले की परमबिरसिंग यांच्यासारखा चांगला अधिकारी नाही,म्हणूनच पोलिस महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.ते एक उत्कृष्ट अधिकारी असल्याचे त्यांनी उघडपणे बोलले मात्र आज तुमची मागणी पूर्ण झाली नाही,तुम्ही मागितलेले १०० कोटीं परमबिरसिंह यांनी दिले नाही तर राज्यातला एवढा महत्वाच्या पदावरील अधिका-याची तुम्ही बदली करता.एवढा मोठा अधिकारी जेव्हा असा आरोप करतो तेव्हा गृहमंत्र्यांनी एका सेंकदात राजीनामा देऊन मोकळे व्हायला पाहिजे होते.हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.

ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार आता बाहेर येऊ लागला आहे,ही सरकार भ्रष्टाचारी आहे,या सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक सेकंद ही पदावर राहण्याचा अधिकार नाही,त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्यामुळेच जोपर्यंत अनिल देशमुख हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत भाजप हे आंदोलन सुरु ठेवील,असा इशारा बावणकुळे यांनी दिला.

Latest बातम्या