

नागपूर,ता. १३ मार्च: पांढरपेशा गुंड मुन्ना यादव याच्यावर बेहिशेबी संपत्ती,भूखंड घोटाळे,जीवे मारण्याच्या धमक्या देणे,इतरांच्या मालमत्तेवर जबरन कब्जे करने,अवैध धंदे,माजी मुख्यमंत्री यांच्या नावाचा दूरुपयोग करून प्रशासकीय अधिका-यांवर दडपण आणून चूकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडणे असे अनेक आरोप आहेत.हा माणूस म्हणजे गुन्हे आणि आरोपांचा ‘मानकरी’ आहे.
अश्या पांढरपेशी गुंडाच्या त्वरित मुसक्या आवळाव्या,मुन्ना यादव याला तातडीने अटक करण्याची मागणी विदर्भ अन्याय निवारण समितीच्याअध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल, नागपूरच्या उपाध्यक्षा ज्वाला जाबुंतराव धोटे यांनी पत्रकाद्वारे केली.
मुन्ना यादव या पांढरपेशी गुंडाला अटक न झाल्यास त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सूड घेण्याची प्रवृत्ती बघता त्याच्या विरूद्ध आवाज उचलणा-यांच्या जीवाला मोठा धोका असल्याचे ज्वाला धोटे यांनी पत्रकात नमूद केले. या गुंडाची मोठी टोळी आहे आणि त्याचा लहान भाऊ बाला उर्फ मनोज यादव हा देखिल कुख्यात गुंड असल्याचे त्या सांगतात. तो मुन्ना याच्या संपूर्ण काळ्या कारभारातील बरोबरीचा सोबती असल्याचा आरोप धोटे यांनी केला.
गिट्टीखदान पोलिस ठाण्यात यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत मात्र असे गुंड मोकाट फिरत आहेत हे स्मार्ट नागपूरच्या पोलिसांचे फार मोठे अपयश असल्याचा आरोप त्या करतात .
माजी मुख्यमंत्री साहेबांचा ऊजवा हात म्हणून हा गुंड कुप्रसिद्ध आहे. माजी मुख्यमंत्री यांच्याकडून नागपूरकर जनतेची हीच अपेक्षा आहे की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व जाहीर करावं की शहरातला भू-माफिया,खंडणीखोर मुन्ना यादव सारखा माझा सख्खा भाऊ जरी दोषी असेल तरी त्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे.
ॲड. सतीश उके तसेच एमआयडीसी भूखंड प्रकरणातील पिडित दलित महिला, प्रसिद्ध उद्योजक डॉ.प्रकाश जैन, समाजसेविका नूतनताई रेवतकर अश्या अनेकांनी मुन्ना यादव याच्या कुकर्म विरोधात आवाज उठवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी शहर अध्यक्षा अलकाताई कांबळे यांच्याशी पण अनेक पिडितांनी संपर्क साधून मुन्ना यादव याच्याकडून होत असलेल्या गुंडगीरीचे आणि अन्यायाचे पुरावे दिले आहेत.
मी स्वतः देखील नागपूरच्या माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांची लेक म्हणून असा हा गुंड मुन्ना यादव याच्या अटकेची मागणी सातत्याने करीत आहे मात्र आशेची किरण कुठहेच दिसत नाही ,परिणामी न्यायासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचा इशारा त्यांनी दिला. आपल्या न्याय मागण्यासाठी,अब्रुच्या सुरेक्ष्ि ततेसाठी,जिविताच्या संरक्ष् णासाठी जर या शहराच्या महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तर या पेक्षा मोठी शोकांतिका जिजाऊँच्या विदर्भाची काय असू शकते ? असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मराठीत एक जुणी म्हण आहे ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’अशीच गत मुन्ना प्रकरणाची आहे , पोलिस मागतात एक पूरावा आणि आम्ही देतो दोन तरी हा आरोपी गजाआड होत नाही,पोलीसांच्या लेखी तो अद्यापही ’फरारीच’ आहे.
याच पार्श्वभूमीवरगृहमंत्री अनिल देशमुख यांना एमआयडीसी भूखंड प्रकरणातील पिडित दलित महिलेला ‘शक्ती‘ कायद्या अंतर्गत न्याय देऊन या कायद्याचा श्रीगणेष नागपूरातूनच करावा अशी लेखी विनंती केली असल्याचे ज्वाला धोटे यांनी पत्रकात नमूद केले.
याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर शहरातील करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉक डाऊन जाहिर केले परंतु नागपूर शहरातील गुन्हेगारांचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन आधी कुख्यात गुंड मुन्ना यादव व त्याच्या टोळीवर लॉक डाऊन लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील पुढाकार घेऊन मुन्ना यादव सारख्या कुख्यात गुंड व समाज कंटकांपासून नागपूरकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कर्तव्यदक्ष् पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची कार्यपद्धती नेहमीच कौतुकास्पद व लोकहिताची राहिली आहे. मुन्ना यादव या फरारी गुंडाला ताबडतोब गजाआड करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला द्यावा व आपल्या वर्दीचा मान राखावा अशी मागणी ज्वाला धोटे यांनी आपल्या निवेदनात केली.




आमचे चॅनल subscribe करा
