फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमस्पर्धा परिक्षेत ‘कॉपी’साठी त्यांनी लढवली ‘स्मार्ट’शक्कल

स्पर्धा परिक्षेत ‘कॉपी’साठी त्यांनी लढवली ‘स्मार्ट’शक्कल

Advertisements

ईयर फोन व स्पाय कॅमराचा केला उपयोग!

नागपूर,ता.४ मार्च: परिक्षा म्हटली की येनकेन प्रकरणे काही विद्यार्थी हे अभ्यास न करता उत्तीर्ण हाेण्यासाठी विविध शक्कल लढवतात मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पार पडलेल्या एका स्पर्धा परिक्षेत आरोपींच्या एका टोळीने तर आधूनिक जगातील सर्व रेकॉर्ड तोडले तोडून तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने ‘कॉपी’करुन सर्वाधिक गूण प्राप्त करण्याचा विक्रम नोंदवला.परिमंडळ क्र.१चे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी आज बजाज नगर पोलीस ठाणे येथे आयोजित पत्र परिषदेत या संपूर्ण मोडस ऑपरेंडीचा पर्दाफाश केला.

महाराष्ट्र शासनातर्फे सहकार पनन व वस्त्र उद्योग विभागातर्फे विभागीय सह निबंधक सहकारी संस्था लेखा परिक्ष् कद्वारा कनिष्ठ लिपिक पदाकरीता एकूण ४२५ व उपलेखा परीक्ष् क पदाकरीता २०६ उमेदवारांसाठी परीक्षेचे आयोजन २३ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ.आंबेडकर महाविद्यालय,दिक्षाभूमी,बजाज नगर येथे आयोजित करण्यात आली होती.

या परीक्षेसाठी इंद्रजीत केशव बोरकर हा देखील बसला होता,विशेष म्हणजे त्याने या परीक्षेत सर्वाधिक २०० पैकी १७८ गूण प्राप्त केले.मात्र ११ मार्च २०२० रोजी विभगातर्फे मूळ कागदपत्रांच्या पडताळणीकरीता कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास त्याला संागण्यात आले.यावेळी या विद्यार्थ्याने लेखी परीक्षेच्या हजेरीपटावर केलेली मूळ स्वाक्ष् री व कागद पडताळणीच्यावेळी केलेली स्वाक्ष् री यात तफावत आढळली.

संशय आल्याने संबंधित विभागाने लेखी परीक्षेच्या व्हिडीयो शुटींगची पडताळणी केली.यात इंद्रजीत बोरकर याच्या ऐवजी दुस-याच व्यक्तीने परीक्षा दिल्याचे लक्षात आले.यावरुन संबंधीत विभागाने इंद्रजित बोरकर याच्याकडे चौकशी केली असता तो स्वत: परीक्षेत बसला नसल्याचे कबूल केले.या आशयाची तक्रार फिर्यादीने बजाज नगर पोलीस ठाण्यात केली.आरोपीविरुद्ध कलम ४१९,४२०,४६८,४७१ भादवि अनव्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

१२ मार्च २०२० रोजी आरोपी इंद्रजित बोरकर(वय २९,रा.आंबेडकर नगर) याला अटक करण्यात आले.यावेळी त्याने सांगितले की त्याचे वडील केशव बोरकर (वय ६०,आंबेडकर नगर)यांनी हंसराज मोहन राठोड(वय ६२ रा.दिग्रस यवतमाळ)यांच्या माध्यमातून परीक्षा देणा-या इसमास बसवले होते.हंसराज राठोड याला १३ मार्च २०२० रोजी अटक करण्यात आली.तपासात हंसरात राठोड याने प्रेमसिंग राजपूत(वय २९,रा.सिडको औरंगाबाद)याच्या माध्यमातून परीक्षा देणा-या इसमास बसविले असल्याचे सांगितले.प्रेमसिंग राजपूत हा सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार अंतर्गत,एन-४ सिडको औरंगाबाद येथे लिपीक पदावर कार्यरत आहे.

आरोपी प्रेमसिंग राजपूत व आरोपी केशव बोरकर व यांनी तपास यंत्रणेचा विरोध असताना देखील सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला.यामुळे मूळ परिक्षेत नेमका कोणता इसम बसला होता?ही माहिती मिळण्याकरीता तपास देखील खोळंबला.पूर्व तपास अधिकारी यांची बदली झाल्यामुळे तपासाची सूत्रे महिला पोलीस निरीक्ष् क(गुन्हे)वर्षा देशमुख,पोलीस ठाणे बजाज नगर यांच्याकडे आली.त्यांनी पालीस उप आयुक्त परीममंडळ क्र.१ चे नुरुल हसन व वरीष्ठ पोलीस निरीक्ष् क महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई वैभव यादव यांच्या मदतीने आधूकिन तंत्रज्ञानपद्धीचा वापर करुन मोबाईल सर्विस प्रोव्हाईडर व ईतर तांत्रिक साधन सामुग्रीच्या सहाय्याने तपास करुन परीक्षेत प्रतापसिंग धोंडीराम दुल्हट(वय २५,रा.बदनापुर,जालना) हा परीक्षा देत असल्याचे निष्पन्न केले.

प्रतापसिंग दुल्हट याचा जालना व औरंगाबाद येथे शोध घेतला असता तो त्याच्या पत्यावर आढळून आला नाही.एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीत सातत्याने त्याच्या हालचालीवर लक्ष् ठेवीत अखेर २८ फेब्रुवरी २०२१ रोजी त्याल अटक करण्यात आली.विशेष म्हणजे यावेळी तो महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे घेण्यात येणा-या परीक्ष्े साठी बसणा-या उमेदवाराच्या ऐवजी स्वत:परीक्षा देण्यास पुणे येथे परीक्षा केंद्रावर जात होता.

नागपूर शराहत प्रथमच अश्‍या पद्धतीने गुन्हा करणा-या टोळीचा छडा लावण्यात आला असून बजाज नगर पोलीसांनी ही ‘स्मार्ट’कामगिरी बजावली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पालीस आयुक्त दक्ष्ि ण प्रादेशिक विभाग दिलीप झलके,पोलीस उप आयुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्ष् क महेश चव्हाण,पोलीस निरीक्ष् क (गुन्हे)वर्षा देशमुख,सुरेश पाठक, संजयसिंह ठाकूर, पोलीस हवालदार आवेश खान,गोविंदा बारापात्रे,नापोशि गौतम रामटेके, अश्‍विनी चौधरी(सायबर) अमित गिरडकर,सुरेश वरुडकर,वैभव यादव यांनी पार पाडली.

कसा केला आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट‘उपयोग-
परीक्षा देताना उमेदवार हा स्मार्ट ईयर फोन कानामध्ये लावायचा व मोबाईल फोन टी.शर्टच्या आतमध्ये ‘स्पाय ‘कॅमरा सुरु करुन ठेवायचे. हा मोबाईल फोन परीक्षा केंद्रा बाहेर किवा इतर ठिकाणी असलेल्या दुस-या अारोपीकडे असलेल्या टॅबवर जोडला जायचा.परीक्षा केंद्रामध्ये बसलेला आरोपी हा त्याच्याजवळील मोबाईल फोन मधील स्पाय कॅम-यासमोर परीक्षेचा पेपर पकडायचा,तो पेपर टॅबमध्ये दिसायचा किवा त्याद्वारे जोडलेल्या ई-मेलवर आरोपींना प्राप्त व्हायचा.त्या प्रश्‍न पत्रिकेचे उत्तर टॅबवर बसलेला आरोपी हा परीक्षा केंद्रावर बसलेल्या आरोपीला सांगायचा. ते उत्तर स्मार्ट ईयर फोनच्या मदतीने ऐकून परीक्षा देणारा आरोपी उत्तर लिहत होता.
आरोपी प्रतापसिंग दुल्हट याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे एक सॅससंग कंपनीचा मोबाईल ज्यामध्ये स्पाय कॅमरा ॲप इंस्टॉल आहे,एक आयबॉल कपंनीचा टॅबलेट,एक स्मार्ट इयर फोन जो कानामध्ये आत जातो मात्र बाहेरुन दिसत नाही,असे अत्याधूनिक इलेक्ट्रीक्स डीव्हायसेस आढळून आले.त्याचप्रमाणे शर्टच्या आतमध्ये घालण्यात येणारे हाफ बाह्याचे कलर टी-शर्ट ज्याचे समोरील बाजूस लहान छिद्र करुन छिद्राच्या मागे मोबाईल हॅन्डसेट बसविण्या करीत खिसा शिवण्यात आला होता,तो टी.शर्ट देखील जप्त करण्यात आला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या