

ॲड.सतीश उके यांची पत्र परिषदेत मागणी
नागपूर,ता. १ मार्च: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री व मुख्यमंत्री पदी होते. तत्पूर्वी ते विरोधी पक्ष् नेते असताना १२ जून २०१४ साली त्यांच्याच मतदारसंघात एका तरुणीचा मृतदेह सापडला.ती उत्तर भारतीय तरुणी मुंबईवरुन सी-ग्रेडच्या चित्रपटासाठी अभिनेत्री होण्यासाठी बोलावण्यात आली होती.मात्र एक वर्षाचा काळखंड लोटला तरी फडणवीस यांच्या अतिशय जवळचे सहकारी धरमदास रमाणी तसेच मुन्ना यादव यांनी चित्रपट निर्माण केला नाही,त्या मुलीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती यानंतर लगेच विधान सभेच्या निवडणूका येऊन ठेपल्या,या सर्व पार्श्वभूमीवर बदनामीच्या भितीने फडणवीस व त्यांच्या सहका-यांनी तब्बल एक वर्ष त्या तरुणीचे लैंगिक शोषण करुन तिची हत्या केली व मृतदेह सोनेगाव नागपूरच्या हद्दीतील निर्मनुष्य क्षेत्रातील महानगरपालिकेच्या नाल्यात पोत्यात भरुन फेकून देण्यात आला.या घटनेविषयी २०१४ मध्ये माध्यमांनीही आवाज उठवला होता,आता जे फडणवीस वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याविषयी ‘आम्ही दवाब निर्माण केल्यामुळे राजीनामा घेतला’ असल्याचे डिमडिम मिरवित आहेत ते स्वत: त्या अज्ञात तरुणीच्या हत्येविषयी स्थानिक पोलीसांच्या सहाय्याने ही घटनाच दाबून बसले,ते नैतिकतेच्या कारणावरुन राजीनामा देतील का?फडणवीस यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री पदी असताना शासकीय यंत्रणा व पोलीस विभागाला हाताशी धरुन जी घटना दाबली,त्या घटनेची जवाबदारी स्वीकारुन फडणवीस यांनी तात्काळ .राजीनामा द्यावा अशी मागणी ॲड.सतीश उके यांनी आज सोमवार दि.१ मार्च २०२१ रोजी पत्रकार भवन येथे आयोजित पत्र परिषदेत केली.
याप्रसंगी मंचावर माजी पोलीस उपअधिक्ष् क विनोद पटोले व सामाजिक कार्यकर्ता अनिल धोटे उपस्थित होते.याप्रसंगी ॲड.उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करीत,मी हे प्रकरण माध्यमांध्ये उचल्यामुळे फडणवीस यांनी स्वत:च्या सहीनिशी माझी चौकशी करावी,माझ्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली.यात त्यांनी,मी त्या अज्ञात तरुणीला धमकी देऊन फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धमकावत असल्याचा माझ्यावर आरोप ठेवला मात्र आर.आर.पाटील यांनी ते प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे तर जिल्हाधिकारी यांनी ते तहसीलदाराकडे पाठवले असल्याचे ते म्हणाले.
मी कधीही त्या तरुणीला भेटलो नाही,बोललो नाही मी फक्त त्या तरुणीला दूरुन बघितले होते,ती अतिशय देखणी आणि सुंदर होती,मूळात मला आज देखील तिचे नाव माहिती नाही,फडणवीस यांनी आबा पाटील यांच्याकडे [जावक क्र. ४२६ / वि.स.स. / १३ दि. ०४.०६.२०१३] सतीश उके ( त्यांचा विरोधी ) त्या मुलीस पोलिसात ३७६ ची तक्रार करण्यास धाक दडप करतो आहे अशी तक्रार केली तेव्हा ती तरुणी जिवंत होती,फडणवीस यांनी त्या तरुणीलाच आबा पाटील यांच्यासमाेर का उभी नाही केली?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एकदा ही पोलिसांनी माझी चौकशी का नाही केली?
ती तरुणी मुंबईवरुन आली होती.फडणवीस हे ज्या गुन्हेगार टोळीचे म्होरके आहेत त्या टोळीतील धरमदास रमाणी हे सी-ग्रेड सिनेमे बनवत होते,यासोबतच रमाणी व मुन्ना यादव यांचा नागपूरातील जमीनी लाटण्याचा,बळकावण्याचा देखील ‘उद्योग’ असून नागपूरात अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल असल्याचे ते म्हणाले. ती तरुणी बेपत्ता झाली तेव्हा नागपूर पोलीसांनी हा गुन्हा उघड होऊ नये म्हणून फक्त नागपूरमधील ‘बेपत्ता’लोकांची यादी तपासली मात्र मुंबई पोलिसांशी संपर्क साधला नाही!रमाणी यांचा फेसबूक प्रोफाईल बघितल्यास त्यांनी किती तरुणींना नागपूरात अभिनेत्री होण्यासाठी आणले,हे शोधण्याचे काम पोलीसांचे असून त्या तरुणीचे नाव मला माहिती नसल्याचा खुलासा त्यांनी केला.त्या तरुणीचे नाव समोर आल्यास तिच्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण?
दि. १२ जून २०१४ रोजी दुपारी ३.०० वा. नंतर कृष्णा अपार्टमेंट , पंचतारा सोसायटी , वैशाली नगर रोड, नागपूर येथील अपार्टमेंटच्या आतील असलेल्या महानगर पालिकेच्या गटारात, पोत्यात काहीतरी बांधलेले तुंबलेल्या पाण्यात तरंगताना तेथील नागरिकांना दिसले. हे पाहून जमलेल्या लोकांनी त्या पोत्यास गटारीबाहेर काढून एका चादरीवर ठेवले आणि त्यातील कमरेखाली मळकट रंगाचा जीन्स असणारी मानवी शरीर सदृश्य मृतदेह आणि मानवी हाडे दिसली. हे प्रकरण गंभीर वाटत असल्याने तेथील नागरीकांनी पोलिसांना कळविले .
पाऊन तासानंतर पोलीसांची चमू त्यात पोलीस स्टेशन सोनेगाव नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश शहा व एक महिला पीएसआय आणि इतर अधिकारी यांनी त्या ठिकाणाची पाहणी करून, सदर ठिकाणी कोणी व्यक्ती ‘बेपत्ता’ आहे का किंवा कोणाला काही संशय आहे काय? अशी विचारणा केली आणि सांगितले कि पोलीस स्टेशनला सुद्धा कोणतीही बेपत्ता वैगरेची तक्रार नाही. त्यानंतर हा मृतदेह मानवी नसून प्राण्याचा आहे असे जाहीर करून पोलीसांनी कसलीही कागदोपत्री कारवाई किंवा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर तसेच स्टेशन डायरीवर कसलीही नोंद केली नाही आणि तो मृतदेह पोलीसांनी मेडीकलमध्ये शवविच्छेदनसाठी न नेता गुपचूप नष्ट केला .
या मुलीची हत्या झाली होती मात्र फडणवीस व त्यांच्या साथिदारांच्या दवाबात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी हा मृतदेह विना पंचनामा किवा स्टेशन डायरीत नोंद न करता गुप्तपणे विनाकारवाईचा नष्ट केला,असा दावा उके यांनी केला! याबाबत आठ-दहा दिवसांनंतर एक मानवी मृतदेह,सांगाडा सापडल्याची बातमी अनेक माध्यमांनी व वर्तमानपत्रांनी प्रकाशित केली.उके यांनीच ही माहिती माध्यमांना दिली असे त्यांचे म्हणने आहे. यामुळे जास्त दबाव वाढता, त्यातील पोलिसांनी मुलीची बाब खोटी ठरवावी म्हणून १८ दिवसां नंतर ‘दुसरा’ मृतदेह तो ही एका ‘पुरुषाचा’ घटनास्थळाच्या दूर, अन्य ठिकाणी अनुप्रिया अपार्टमेंट समोरील सर्विस रोडच्या बाजूला, मौसम काँलोनी , मनीषनगर, पोलीस स्टेशन सोनेगाव, नागपूर येथून (तो पहिला मृतदेह येथे पुरला होता असे खोटे दाखवून ) दि. १ जुलै २०१४ व २ जुलै २०१४ च्या मध्यरात्री १२ ते १.०० वा.च्या कृत्रिम उजेडात मळकट रंगाची जीन्स पँट , लाल रंगाची अंडवेअर , एक लाल रंगाचा रुमालासारखा कपडा जप्त केल्याचे दाखविले.
हे हेतुपुरस्सर रात्रीच्या अंधारात केल्याचे दाखविले जेणेकरून वरील प्रकार लपविण्यात यावा . हा सांगाडा जेव्हा बाहेर काढला गेला तेव्हा या नवीन पोलीस अधिकारी यांना तो सांगाडा मानव जातीचा आहे हे समजून आले व असे त्यांनी रेकॉर्डवर नमूद ही केले, विशेष म्हणजे पोलीसांना शरीररचना विभागाचा सल्ला याबाबत घ्यावासा वाटला नाही,तेच शरीररचनाशास्त्राचे ‘तज्ज्ञ’झालेत!
यानंतर दि. २ जुलै २०१४ रोजी १९.१० वा. ‘मर्ग खबर क्र. ३४/२०१४’ पोलीस स्टेशन सोनेगाव येथे दाखल करण्यात आली. शरीररचना विभाग , शासकीय वैधकीय महाविद्यालय नागपूर यांच्याकडे ही दूस-या पुरुषाची ठेवण्यात आलेली हाडे व कवटी परीक्षण करण्यासाठी दि. ३ जुलै २०१४ रोजी पाठविण्यात आली व यातील कपड्यावरील , मातीतील , मासांवरील रक्त ‘मानवाचे ’ असल्याचे सहा. संचालक प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा धंतोली यांनी कळविले, हे मी न्यायालयात सादर केलेल्या प्रकरणात, तपास अधिकारी यांनी न्यायालयासमोर दि. ९ ऑक्टोअर २०१४ रोजी लेखी सांगितले असल्याचे उके यांनी सांगितले.
फडणवीस यांच्यासोबत वैर का निर्माण झाले?
दि. १४ नोव्हेंबर २०१४ रोजी मी मुंबई उच्च न्यायालय नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध ‘निवडणूक’ याचिका घातली, याची बातमी सर्व प्रसार माध्यमांनी चालविली यामुळे वरील मृतदेहाबाबत सुद्धा याचिका दाखल होवू शकते या दबावाने पोलीस स्टेशन सोनेगाव येथे FIR No. २३९/१४ कलम ३०२, २०१ भा. द. वी. दाखल करण्यात आला .
याप्रमाणे १२ जून २०१४ ते १४ नोव्हेंबर २०१४ पर्यंत गुन्हा दाखल होण्यास जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस व टोळीला वाचविण्याकरीता वेळ लावला गेला,असा आरोप उके यांनी पत्र परिषदेत केला. सर्वात महत्वाचे म्हणजे ’मर्ग खबरी’ गुन्हा हा ’अकस्मात’ मृत्यूबाबत दाखल होतो या प्रकरणात तर तरुणीचा मृतदेह हा पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला मग हा अकस्मात मृत्यू पोलीसांच्या लेखी कसा होऊ शकतो?असा प्रश्न ॲड.सतीश उके यांनी उपस्थित केला.
अकस्मात मृत्यू हा कोणी मानव स्वतःहून स्वतःस पोत्यात घालून पोते बाहेरून बांधून गटारात जावून मरेल असे होत नाही, तर दि. १२ जून २०१४ रोजीच गुन्हा दाखल होणे कायदेशीरपणे आवश्यक होते पण ते देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या दबावात गुन्हा दाखल झाला नाही आणि पुरावे अपराधिक षड्यंत्र रचून मिटविण्यात आले , यात आरोपींना वाचविण्याकरीता खोटे कागदपत्रे तयार करण्यात आली असल्याचा आरोप ॲड.उके यांनी या प्रसंगी केला.
गुन्ह्यातून वाचवणा-याकडेच पुन्हा तपास!
वरील गुन्ह्याच्या प्रकरणात २-३ साक्षदार, A.D. याचे फिर्यादी /पंच / घटनास्थळ पंच , या त्याच त्या व्यक्ती वारंवार आहेत , जास्त लोकांचा सहभाग पोलिसांनी केला नाही कारण बाहेरील लोकांना सत्य परिस्थिती माहिती होऊ नये. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात एवढ्या वर्षात एकदा ही नागपूर पोलिसांनी सतीश उके यांनी पूर्वीच तक्रार केल्यावरही माझी चौकशी केली नाही, तत्कालीन मुख्यमंत्री (गृहमंत्री) देवेंद्र फडणवीस व त्यांचे टोळीतील सदस्यांचा तपास केला नाही. त्या मुलीचा मृतदेह नष्ट करण्यात मुन्ना यादव , धरमदास रामाणी यांचा सहभाग होता का? याचाही तपास केला नाही ,असे ॲड.उके हे म्हणाले.
वरील संपूर्ण प्रकार दाबण्याकरीता सोनेगाव पोलिसांनी, यात ज्या पोलीस अधिकारी यांनी खरे आरोपी यांना वाचविण्याचे कृत्य केले या पोलीस अधिकारी यांच्या विरुद्धही कारवाई न करता त्रुटीपूर्ण व खोटा अहवाल लिहून दि. १० मार्च २०१६ रोजी “A” समरी रिपोर्ट तयार करून दि. ११ एप्रिल २०१६ रोजी “गुन्हा खरा परंतु शोध न लागल्याने कायम तपासावर ठेवण्याचा A समरी रिपोर्ट” न्यायालयात सादर केला.
या संपूर्ण प्रकरणात कलम ३०२ , २०१ च्या गुन्हेगारी कृत्याचाच भाग नाही तर हा प्रकार दाबण्याकरीता सोनेगाव पोलिसांनी , तत्कालीन पोलीस अधिकारी ज्यांनी खरे आरोपी यांना वाचविण्याचे कृत्य केले त्यांच्या विरुद्ध कलम २०१, २१७, २१८, १२०-ब, ३४ भा.द.वी. ची कारवाई न करता “A समरी रिपोर्ट” न्यायालयात सादर केला, हि गंभीर घटना देवेंद्र फडणवीस (LL.B.) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद असतांना करवून घेण्यात आली असा आरोप ॲड.उके यांनी याप्रसंगी केला.
या प्रकरणातील तत्कालीन पोलीस अधिकारी ज्यांनी खरे आरोपी यांना वाचविण्यासाठी कायद्याविरुद्ध कृत्य केले त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे, त्यांना अटक करून तपास करणे, त्यांनी कोणाच्या दडपणाखाली हे अपराधिक कृत्य केले , त्यात तेव्हा सत्तेतील कोण-कोण सहभागी होतं? कोणी, कधी त्या तरुणीचा मृतदेह कसा नष्ट केला हे समजण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील तक्रारीची प्रत पाठवली असल्याचे उके यांनी सांगितले.
याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , सतेज पाटील, गृहराज्यमंत्री , महाराष्ट्र राज्य, मंत्रालय , मुंबई अति. मुख्य सचिव , गृह विभाग , म. रा., मंत्रालय , मुंबई पोलीस आयुक्त , नागपूर व पोलीस उपायुक्त, परी. क्र. १ नागपूर यांना देखील कलम ८० सी.पी.सी. व सि आर. पी. सी. कलम १५६(३) प्रोविजो क्लाँज प्रमाणे निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या निवेदन किंबहूना नोटीसची तातडीने दखल घेतली नाही तर न्यायालयात दाद मागण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही असेही कळविले असल्याचे त्यांनी सांगितले .
१९९१ ते २००१ देशात तेलगी बनावट स्टॅम्प पेपरचा घोटाळा बराच गाजला.त्याच धर्तीवर नागपूरात अनेकांनी मिळून ४,५०० कोटींचा स्टॅम्प घोटाळा केला.त्यातील एका प्रकरणात बनावट स्टॅम्प पेपरविरुद्ध मी गुन्हा दाखल केल्याने फडणवीस यांच्या टोळीत व माझ्यात शत्रुत्व निर्माण झाले हे शत्रुत्व १९९२ पासून ते आजतागायत असल्याचे उके यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना माजी पोलीस उप अधीक्ष् क विनोद पटोले यांनी पोलिसांची तपासाची कायदेशीर कारवाई कशी असते?यावर सविस्तर प्रकाश टाकला.जेव्हा एखाद्या घटनेला साक्ष्ी दार उपलब्ध नसतो तेव्हा घटनास्थळ आणि परिस्थिती हीच साक्ष्ीदार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र या प्रकरणात तरुणीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला,त्या परिसरातील फक्त ६ साक्ष्ीदारांचे बयाण नोंदविण्यात आलेत,एवढ्या वर्षात एक ही नवा पुरावा पोलीसांना शोधता आला नाही.
मृतदेह सापडताच पोलिसांनी हत्येचा म्हणजे ३०२ चा गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र पोलीसांनी असे काहीच केले नाही,उलट पोलिसांनी या मृतदेहाला ‘अकस्मात मृत्यू’ठरवून न्यायालयात ए समरी सादर केली.याचा अर्थ हे प्रकरण कायमचे बंद करावे!‘कूछ तो राज था जिसकी पर्दादारी की गई’असा सरळ सरळ आरोप लावित जो पोलीस अधिकारी तेथील स्थानिकांना विचारतो,येथे कोणी मिसिंग आहे का?कशासाठी विचारतो?कारण त्यांनीच माध्यमांना या ठिकाणी कोण्या तरुणीचे नाही तर कुत्र्याच्या हाडांचा सांगाडा मिळाला असल्याचे ठासून सांगितले हाेते,याकडे पटोले यांनी लक्ष् वेधले.
या गुन्ह्यात माहिती देणाराच साक्ष्ी दार आहे,तपासकर्ता आहे,जब्तीदार आहे,माध्यमांनी दबाव आणल्यानंतर १ व २ जुलै २०१४ च्या मध्यरात्री पुरलेला मृतदेह खणल्या जातो?त्या ठिकाणी पुरुषाचा मृतदेह आणून टाकल्या जातो?याप्रसंगी गुन्ह्यांचा तपास चार प्रकारे कसा केला जातो,या प्रकरणात काय-काय झोल ठेवण्यात आला,याचे सविस्तर वर्णन त्यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
