लंडन : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे 14 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याला लंडन येथून आज (बुधवार) अटक करण्यात आली. नीरव मोदीला लंडन मधील एका बँक क्लर्कने ओळखले व पोलिसांना सूचना दिली. न्यायालयाने नीरव मोदी ची रवानगी लंडनच्या कारागृहात केली.तत्पूर्वी नीरव मोदी यांच्या वकिलाने मोदीच्या भारताला प्रत्यारोपणला पुन्हा विरोध केला. भारतात कारागृहांची स्तिथी अत्यंत दयनीय असल्याचे कारण पुन्हा एकदा न्यायालयाला सांगितले मात्र त्यांची अपील लंडनच्या न्यायालयाने खारीज केले व नीरव मोदीची रवानगी कोठडीत केली. पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होईल. पहिल्यांदा नीरव मोदी हा संपूर्ण रात्र हा कारागृहाच्या कोठडीत घालवणार आहे. गेल्यावर्षी जानेवारी २०१८ ला नीरव मोदी विदेशात पळाला होता.आगस्ट २०१८ मध्ये भारत सरकारने त्याच्या प्रत्यारोपणची मागणी ब्रिटनला केली होती.
भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अटकेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने मोदीविरोधात अटक वॉरंट काढले आहे. मोदीने भारतात पंजाब नॅशनल बँकेचे एकूण 13,700 कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. कारवाईच्या भीतीने मोदीने लंडनला पळ काढला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सातत्याने ब्रिटनशी संपर्क साधला आहे.
लंडनमध्ये आरामात वावरत असलेल्या मोदीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न ब्रिटनमधील एका दैनिकाने केला. यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताच्या विनंतीची दखल घेतली. सक्तवसुली संचनालय (ईडी) आणि सीबीआयचे एक पथक लवकरच लंडनमध्ये दाखल होणार आहे. हे पथक न्यायालयासमोर मोदीविरोधातील पुरावे सादर करेल. गेल्या वर्षी मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सीविरोधात ‘ईडी’ने कारवाई सुरू केली होती. त्यानंतर दोघांनीही भारतातून पळ काढला.