
(रविवार विशेष)

‘राजकारणी!जगण्यातील समृद्ध अडगळ!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १४ फेब्रुवारी: सध्या महाराष्ट्रात पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरण बरेच गाजत आहे.या घटनेत थेट शिवसेनेचे आमदार व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव भारतीय जनता पक्ष्ाच्या आमदार चित्रा वाघ यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे.नुकतेच सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर रेणू वर्मा या तरुणीने बलात्कार व फसवणूकीच्या आरोपाची शाई वाळत नाहीत तर आघाडी सरकारच्या दुस-या मंत्र्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येमुळे संशयाची सुई वळली.मुंढे यांच्यावरील आरोपामुळे तर त्यांनी किरण शर्मा या महिलेसोबत दुसरा विवाह केल्या असल्याची स्पष्ट कबूली देत त्यांच्यापासून त्यांना दोन अपत्येही असल्याची पुष्टि करीत किरण यांच्या दोन्ही मुलांना पिता म्हणून मी माझे नाव दिले असल्याचे ‘उपकारसदृष्य’ भाष्य ही केले.याउपर ही आपल्याच दुस-या पत्नीच्या लहान बहीणीवर तरीही त्यांचा डोळा गेलाच…!आता राठोड यांच्या कर्मकांडात तर पूजा चव्हाण या अवघ्या २२ वर्षाच्या तरुणीचा बळी गेल्यामुळे सुप्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे म्हणतात ‘हिंदू!जगण्यातली समृद्ध अडगळ’तसेच ‘काही राजकारणी!जगण्यातली समृद्ध अडगळ! असेच आता म्हण्याची वेळ आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आमदार व मंत्री असणारे अमरसिंह त्रिपाठी यांचे देखील प्रेमसंबंध(प्रेमाला अनैतिक अशी उपमा देणे योग्य वाटत नाही)एका कवियित्रीसोबत होते मात्र हे सबंध त्यांच्या राजकीय जिवनाच्या वाटेत अडथळा ठरत असल्याची जाणीव होतात त्या गर्भवती कवियित्रीला जग सोडावे लागले….तिचा खून झाला!आता त्रिपाठी हे कारागृहात पश्चाताप दग्ध असावेत..कदाचित!
हे लोण पुराेगामी आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या महाराष्ट्रासारख्या राज्यात कधी व कसे पसरले याबाबत आश्चर्य व्यक्त न होता या अपराध्यांनाही शिक्ष्ा मिळणार का?याकडे आता राज्याच्या सुजाण जनतेचे लक्ष् लागले आहे तसेच बाहूबळीच्या जोरावर स्त्रीच्या अब्रूचे हे गुन्हेगार निर्दोष सुटतात,हे आता जनतेला बघायचे आहे.
मूळात राजकारण असो की चित्रपटसृष्टि,सार्वजनिक जीवन जगणा-या व्यक्तिंकडे चारित्र्याची साधनसूचिता असावी ही किमान अपेक्ष्ा भाबड्या जनतेची असते.याशिवाय नेते मंडळी म्हटले की ते जनसेवक असतात,आपल्या सेवेसाठी त्यांनी निवडणूक लढली,खस्ता खालले,ते चारित्र्यवान,अभ्रष्ट इ. असावेत अथवा असतात असाही भाबड्या मतदारांचा समज असतो.मात्र मंत्री,नैतिकता आणि स्त्रीचा मृत्यू यांचा गूढ सबंध हा जगात, भारतात किवा महाराष्ट्रात आताच्या काळातला नाही तर याला फार प्राचीन इतिहास असल्याच्या अनक घटना इतिहासात दडडल्या आहेत.
स्त्री ही फक्त २०२१ मध्येच नागवली,रडवली,दुखवली किंवा संपवली गेली नाही तर लेखिका मुक्ता बर्वे यांनी त्यांच्या ‘नग्नसत्य-बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध’या पुस्तकात चीन देशाची राजधानी नानकिंगमध्ये झालेल्या जपानी सैनिकांकरवी झालेल्या बलात्कारांच्या आणि हत्यांच्या अंर्तवेधापासून तर भारतात विविध राजकीय पक्ष्ातील राजकारणी यांनी केलेल्या बलात्कार व हत्याकांडांचे धक्कादायक मर्म उलगडले आहे.
र्नानकिंग गॅमसाकर’ म्हणून इतिहसात याची नोंद आहे.गर्भवती व विवाहित स्त्रियांच्या योनित बलात्कारानंतर जापानी सैनिकांनी लोखंडी कांबी,बंदूक किवा बाटल्या खूपसून त्यांना मारुन टाकण्यात आलं…..!जॉन मॅगीच्या अमेरिकन मिशनरीजने या घटनेची काढलेली छायाचित्रे ही इतकी भयावह आहे की….स्त्री म्हणून या पृथ्वीतळावर जन्म घेण्याची कल्पना ही अनेक शतकांपर्यंत केली जाऊ शकत नाही.
दुस-या महायुद्धापूर्वी १९३९ मध्ये वेरमॅट फोर्ससनी ‘ज्यू’ मूली आणि स्त्रियांवर पोलंडमध्ये बलात्कार केले.सोव्हिएत यूनियनमध्ये सुमारे १ लाख स्त्रियांवर बलात्कार झाले.फ्रेंच सैन्याने मांचे कॅसिनोच्या युद्धानंतर इटलीमध्ये बलात्कार व महिलांच्या हत्याकांडाचा सडा शिंपडला.बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य युद्धात पाकिस्तानच्या सैनिकांनी बांग्ला मुलींवर केलेल्या बलात्कारामुळे २५ हजार मुली या गरोदार राहील्या होत्या.शेख मुजीब यांनी अश्या स्त्रियांना स्वातंत्र्य लढाच्या नायिका घोषित केल्या.
आपले पुरुषत्व बलात्काराच्या स्वरुपात प्रदर्शित करता येते आणि त्यामुळे स्त्रियांच्या मनात भिती उत्पन्न होते हा पुरुषाला लागलेला शोध, अग्नि आणि अश्मयुगातील पाहील्या ओबडधोबड दगडी हत्याराच्या शोधा इतकाच महत्वाचा ठरत नाही का!असा लेखिकेला प्रश्न पडतो.
युद्धखोरी, दहशतवाद,पुरुषसत्ताकता,बाजारपेठेची हूकूमशाही,चंगळवाद,मूलतत्ववाद आणि….राजकारण यात भरडली गेली ती केवळ एक स्त्री!पोलीस ठाण्यातही बलात्कार होतो,मग ती कुठे सुरक्ष्ति आहे?
सिलीकॉन व्हेली म्हणून प्रसिद्ध असणा-या बंगळूरुमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वासनेला बळी पडलेली व बलात्कारानंतर क्रूरतेने हत्या करण्यात आलेली प्रतिभा मूर्ती हिच्यासाठी १३ डिसेंबर २००५ ची ती तारीख नक्कीच अशुभ होती,कॅब ड्रायव्हर शिवकूमारला अटक व आजन्म कारावास झाला असला तरी प्रतिभाची प्रतिभाच जगातून कायमची नष्ट करण्यात आली,का?३ नोव्हेंबर २००७ सोली विप्रो कंपनीत काम करणारी ज्योती कुमारी ही देखील कॅब चालकाच्या वासनेला अशीच बळी पडली व कायमची संपली!पुणे-मुंबई हायवेवर झालेली ही घटना तेव्हा ही सबंध महाराष्ट्र हादरवून गेली होती.कंपनीने हात झटकले,कॅब गाड्या या कंत्राटी होत्या असे सांगून….!
७ ऑक्टोबर २००९ साली सॉफ्टवेअर अभियंता असलेली पुण्यातील नयना ही देखील पुणे शहरापासून जवळच असणा-या जेरवाडी गावाजवळ निर्जन ठिकाणी मृत पावल्या गेली.मुरमोड दगडांच्या चरित, ओढणीने गळा आवळून बलात्कारानंतर तिचा खून करण्यात आला.चेहरा ओळखू येऊ नये म्हणून तिचा चेहर दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला.अभियंता असणा-या नयनाच्या शिक्ष्ति नव-याला अभिजित पुजारी याला न्यायासाठी ूयाच पुरागोमी महाराष्ट्रात फार मोठी लढाई लढावी लागली.
राजधानी मुंबईत मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनारी २१ एप्रिल २००५ रोजी शिपाई सुनील मोरेनी ४० मिनिटात तीन वेळा त्या तरुणीवर बळजबरी केली,हा काळाकूट्ट इतिहास देखील पुरोगामी राज्याचा नागरिक विसरला नव्हता तोच अवघ्या सहा महिन्यात १७ ऑक्टोबर २००५ रोजी हेडकॉन्सटेबल चंद्रकांत पवार याने १५ वर्षाच्या मूलीवर बलात्कार केल्याची शर्मनाक घटना राज्यात घडली.न्यायमूर्ती के.सी.चंदीवाल यांनी त्याला १५ वर्षांची शिक्ष्ा सुनावली.
विदर्भाच्या इतिहासात डोकवायचे झाल्यास २६ मार्च १९७२ रोजी चंद्रपूर पोलीस ठाण्यात मथूरा नावाच्या आदिवासी मुलीवर झालेला बलात्कार बराच गाजला.हेड कॉन्सटेबल तुकाराम आणि कॉन्सटेबल गणपत यांना १६ वर्षाच्या मथूरावर बलात्कार केल्या प्रकरणी शिक्ष्ा ठोठावण्यात आली.
या ही पुढचे क्रोर्य सांगायचे झाल्यास ५० वर्षीय एनकाऊंटर स्पेशालिस्ट अरुण बोरुडे यांनी मुंबईत अंधेरीतील एमरॉन कोर्ट नावाच्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये फक्त अापल्या अय्याशीसाठी बळजबरीने एका १५ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले होते. नंतर तिचा मृतदेहच जवळच्या रेल्वेरुळावर आढळला….!
सर्वच पक्ष्ात बलात्कारी….!
बलात्कार व हत्याकांडात कुण्या एखाद्याच राजकीय पक्ष्ाची मक्तेदारी नसून ’हमाम मे सब नंगे’या उक्तीप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष्ात ‘बाहूबळाची ही विकृत कीड ’ लागली असल्याचं दिसून पडतं.इतकंच की ज्याचं भांडं फूटतो तो दोषी..ज्याचं लपून राहतं तो सन्याशी!
बिहार मधील रुपक पारक या शिक्ष्किेने भारतीय जनता पक्ष्ाचे आमदार राजकिशाेर केसरीचा त्याच्याच बंगल्यात जनता दरबारदरम्यान चाकूने भोसकून मुडदा पाडला….!न्यायव्यवसथेवरुन तिचा विश्वास उडाला होता…!
दलित की बेटी मायावती ही उत्तर प्रदेशात सत्तेवर असताना तिच्या पक्ष्ाच्या ७ आमदारांच्या विरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल झाले…!मायावतीचाच आमदार अमरमणि त्रिपाठी याच्यावर त्याच्या गर्भवती प्रेयसी मधुमिता शुक्ला हिच्या हत्येचा आरोप सिद्ध झाला होता!
२००७ मध्ये उत्तरप्रदेशचे अन्न व वितरण मंत्री आनंद सेन यादव यांनी एका २४ वर्षीय कॉलेजमधील दलित विद्यार्थिंना पळवून नेले असल्याचा अारोप बराच गाजला..!
२००८ मध्ये समाजवादी पक्ष्ाचे आमदार गुडू पंडित याने शाळेतल्या शिक्ष्किेचे अपहरण केले!
बहूजन पक्ष्ाचे आमदार हाजी अली याने नेपाळी मुलींचे अपहरण केले!
बांदाचा आमदार पुरुषोत्तम नरेश द्विवेदी याने एका दलित मुलीवर बलात्कार केला नंतर चोरीच्या अारोपात तिला गाेवले!
बहूजन समाजवादी पक्ष्ाच्याच एका आमदारावर व काॅलेजच्या प्राचार्यावर गुन्हा सिद्ध होऊन इटावा कोर्टाने शिक्ष्ा सुनावली,त्या प्राचार्याने त्या आमदारासाठी शाळेतल्या एका शिक्ष्किेवर दडपण आणले होते,यामुळे शिक्ष्किेच्या नव-याने आत्महत्या देखील केली…!
आंध्रप्रदेशचा आमदार रेड्डी याचे विधान गाजले ‘आमच्याकडे बलात्काराची राजरोसपणे मुभाच आहे,जोगिणी,देवदासीची प्रथा… ही मुभा देते!’
केरळच्या सेक्सवर्कर नलिनी जमिला हिने आपल्या आत्मचरित्रात अनेक पांढरपेश्यांचे मुखवटे टराटरा फाडले आहेत…..!ते नक्कीच वाचण्यासारखे आहे.
आता महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांवर बलात्कार,पोलीसी दडपण…तथाकथित आत्महत्या..हत्येचा संशय आरोपांमुळे या सर्व घटनांची जणू उजळणी झाली..!
मानवी समाज विशेषत: स्त्री-पुरुष संबंधाचा पर्व या भू-तळावर अतिशय लज्जास्पद स्थितीत पोहोचल्याची या घटना साक्ष् देतात.हजारो वर्षे पुरुषांनी स्त्रियांवर लैंगिक नियंत्रणासाठी सत्ता गाजवली…आज ही गाजवत आहेत.आजच्या आधुनिक काळात या विकृत मनोवृत्तीत यत् किंचितही बदल झाला नाही असेच म्हणावे लागेल.
पुरुषी वर्चस्ववाद,लष्करी दमन यंत्रणा,राजकीय सत्ता,अर्निबंध हितसंबधांची यंत्रणा एकमेकांना पूरकरित्या गळ्यात गळे घालून चालत असल्याचे हे द्योतक आहे.स्त्री ही फक्त वारस निर्माण करणारी आपली मालकीची,हक्काची ‘संपत्ती‘ आहे एवढेच सामर्थ्यशील पुरुषाची अक्कल हूशारी अश्या घटनांना जन्म देते म्हणून सुप्रसिद्ध कवि नामदेव ढसाळ यांनी अतिशय समर्पक कविता
खोलवर आठवून जाते-
‘
तुझी निसर्गदत्त निर्भरता,काम करण्याचा शोष, निर्णय घेण्याची ऐपत,उत्पादनाचे नवे तंत्र शिकण्याची जिज्ञासा,व्यक्ती विकासातलं,समाज विकासातलं तुझं अग्रगण्य स्थान,स्वातंत्र्याची निष्ठा,राष्ट्रीय संरक्ष्णातलं भाग घेणं आणि सर्वां मधलं कर्तृत्व माणसाला….जमिनीचा उपयोग कळाला तेव्हापासूनच नष्ट झालं…पुरुषप्रधान संस्कृतीत तुला…चूल आणि मूल या गोष्टीतच सडत ठेवलं.तूला दुय्यम दर्जा दिला,किड्यांच जननयंत्र म्हणून तुझ्याकडे पाहीलं गेलं…तुझं…नैसर्गिक असणं..पुरुषत्वाला रंग चढवणं…गुलामीत पडलं…!
थोडक्यात २२ वर्षीय वंजारी समाजाची पूजा चव्हाण ही अकाली मृत्यू पावलेली महाराष्ट्रातली पहीली स्त्री बळी नाही…नेमाडे ‘हिंदू’कादंबरीत म्हणतात तसे…राजकारणातले हे काही पांढरपेशी धेंड खरंच….राजकारणातली समृद्ध अडगळच आहे…त्यांना जनतेनीच आता सत्तेवरुन खाली खेचले पाहीजे…! तेव्हाच त्या राजकीय स्त्री बळींना न्याय मिळेल….!




आमचे चॅनल subscribe करा
