फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगडकरी यांच्या हस्ते मनपातर्फे कोव्हिड-१९ काळात सहकार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार 

गडकरी यांच्या हस्ते मनपातर्फे कोव्हिड-१९ काळात सहकार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार 

Advertisements

भट सभागृहात उद्या सत्कार सोहळा

नागपूर, ता. २९ : नागपूर शहरात कोव्हिड–१९ पाय पसरत असताना नागपूर महानगरपालिकेने शहरात कोव्हिड–१९ चे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवून युध्दस्तरावर प्रयत्न केले. सोबतच कोव्हिड–१९ च्या काळात शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येउन मनपाला सहकार्य केले. त्यामुळे अशा सर्व संस्थांच्या मान्यवरांचा सत्कार समारंभ नागपूर महानगरपालिकेच्यावतीने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे शनिवारी ३० जानेवरी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मान्यवरांचा सत्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक, महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, विशेष अतिथी विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहणार आहेत.

तसेच खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, मनपा सत्तापक्ष नेता संदीप जाधव, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, विभागीय अयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेता दुनेश्वर पेठे, माजी महापौर संदिप जोशी आणि नंदा जिचकार, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका उषा पॅलेट, शितल कामडे, डॉ रवींद्र भोयर, नगरसेवक सतिश होले, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि संजय निपाणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहान मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त सुषमा मांडगे आणि मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी केले आहे.

निमंत्रण पत्रिकेत डॉ.रवींद्र भोयर झाले नगरसेविका!

महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत नजरचूकीने प्रभाग क्र.३१(ड)चे नगरसेवक डॉ.रवींद्र भाेयर यांच्या नावाखाली चक्क ‘नगरसेविका’असे छापण्यात आले आहे!मनपाच्या विविध उपक्रमांची,कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका छापण्यात अनेकांचे ‘आर्थिक हितसंबध’गुंतले असल्याची माहिती सर्वांनाच आहे मात्र तरीही एखाद्या पुरुष नगरसेवकांचे जेंडर बदलून चक्क त्यांना स्त्रीलिंगी करण्याचा घाईला काय म्हणावे?जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार करुणे,ती छापून आणने यात तर होतच आहे मात्र लाखो रुपये पगार घेणा-या मनपाच्या जनसंपर्क विभागातील कर्मचारी यांनाही निमंत्रण पत्रिकेतील एवढी मोठी चूक लक्ष्ात येऊ नये,याबाबत आश्‍चर्य व्यक्त केल जात आहे.विशेष म्हणजे याच जनसंपर्क विभागाला मदत करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून मनपात रुजू झालेली आय.टी.क्राफ्ट ही एजंसी दर महा पाच लाखांच्या जवळपास मनपाकडून रक्कम वसूल करीत आहे.दोन दोन विभाग असताना निमंत्रण पत्रिकेत लिंगच बदलणा-या या निमंत्रण पत्रिकेची चर्चा आज चांगलीच रगंली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या