फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम२६९ पतंगबाजांवर पोलिसांची कारवाई:नायलॉन मांजाने उडवित होते पतंग

२६९ पतंगबाजांवर पोलिसांची कारवाई:नायलॉन मांजाने उडवित होते पतंग

Advertisements

नागपूर,ता. १५ जानेवारी: महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने तसेच नागपूर पोलिसांनी संयुक्त उपक्रमात गुरुवारी शहरातील २६९ पतंगबाजांवर कारवाई केली.२५० पतंगबाज हे बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पतंग उडविताना आढळले,तर शहर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत १९ पतंगबाजांना अटक करण्यात आली.

नायलॉन मांजामुळे २३ वर्षीय प्रणय ठाकरे हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी याचा गळा कापून रस्त्यावरच हकनाक बळी गेला.या घटनेपासून सावध होत उपद्रव शोध पथक तसेच नागपूर पोलिसांनी मकर संक्रातीच्या दिवशी संयुक्तपणे कारवाई करीत नायलॉन माजांने पतंग उडविणा-यांवर कारवाई केली.

उपद्रव शोध पथकाचे वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात शहरात केलेल्या कारवाईत ४ हजार ४८ प्लास्टिक पतंग आणि १०७ नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या.शहरातील ४२४ विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात सकाळी ८ वा.पासूनच उपद्रव शोध पथकाने फिरणे सुरु केले.यात धरमपेठ व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक पतंगबाज व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.या दोन झोनमध्ये नायलॉन मांजाने पतंग उडवणा-या ७० जणांवर कारवाई करण्यात आली.
त्यापाठोपाठ हनुमाननगर,नेहरुनगर,लकडगंज या तीन झोनमध्ये ३० जणांवर तर गांधीबाग झोनमध्ये २५,लक्ष्मीनगर आणि आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी २० पतंगबाजांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय धंतोली झोनमध्ये १० आणि सतरंजीपुरा झोनमध्ये १५ पतंगबाज नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळले.
शहर पोलिसांनी धंतोलीत २,अंबाझरीत २,गणेशपेठत २,गिट्टीखदान येथे ४,नंदनवन येथे ३,कपिलनगर येथे १,राणाप्रतापनगर येथे २,कळमना येथे २ तर तहसीलमध्ये १ अश्‍या १९ पतंगबाजावर कारवाई केल्याची माहिती आहे.

१४ जानेवारी मकर संक्रातीच्या दिवशी पोलिसांनी ५५ हजार दंड वसूल केला तर ४०४५ प्लास्टिकच्या पंतग जप्त केल्या.१०७ नायलॉन चक्री जप्त करुन ४२४ दूकानांची पोलिसांनी झडती घेतली.एकूण ५५ पतंगबाजांवर कारवाई करण्यात आली.
थोडक्यात १२ जानेवारी रोजी तरुण अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रणय प्रकाश ठाकरे याचा नायलॉन मांजामुळे गेलेल्या बळीतून देखील नागपूरकर पतंगबाजांनी कोणताही बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होते.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील आज २०१५ पासून राज्यात बंदी असणा-या नायलॉन मांजाविषयी स्वत:हून जनहित याचिका दाखल करुन पयार्वरण मंत्रालयाच्या सचिवाना नोटीस जारी केली आहे.

३ मांजाविक्रेत्यांना अटक-
नायलॉन मांजामुळे प्रणय ठाकरे याचा बळी घेतल्यानंतर पोलिस अधिक सर्तक झाले असून गुरुवारी पोलिसांनी संपूर्ण शहरात मांजा विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीत राबवली.या संदर्भात पोलिसांनी १९ गुन्हे दाखल केले.दरम्यान पोलिसांनी यवतमाळ येथील मांजा विक्रेत्यासह तिघांना अटक केली. दिनेश किशारे ढेरे)वय ३२,रा.श्री कॉलनी,राजापेठ)यवतमाळ मधील मारवाडी चौकातील बंटी जनरल काईटचा संचालक बंटी नंदकिशाेर सिसोदिया(वय ४०,रा.मारवाडी चौक) व मोहननगर मधील नंदकिशोर विठ्ठलराव राजबोईनवार(वय ४९)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्ष् क युवराज हांडे,उपनिरीक्ष् क कैलास कुथे व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना गाडगेनगर भागात दिनेश हा मोपेडवर मांजा व पतंग घेऊन जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले व मांजा जप्त केला. त्याने हा मांजा बंटीकडून खरेदी केल्याची माहिती दिली.हे कळताच गुन्हेशाखा पोलिसांनी यवतमाळ येथून बंटीला देखील अटक केली.याप्रकारे सदर पोलिसांनी मोहननगरमधील नंदकिशोर यांच्या घरी छापा टाकून पतंग व नायलॉन मांजाचा साठा जप्त केला.

२२ जखमींवर उपचार-
मकर संक्रातीच्या पर्वावर काल शहरात विविध ठिकाणी नायलॉन मांजामुळे ३२ पेक्ष्ा आधिक नागरिक जखमी झालेत.मेयोमध्ये ७ तर मेडिकलमध्ये १५ जखमींवर उपचार करण्यात आले.अन्य जखमींनी खासगी रुग्णालयात उपचार केले.याची संख्या माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी सुध्दा नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग विरोधात उपद्रव पथकाची धडक कारवाई: दहाही झोनमधून ८ हजारांचा दंड, २२२ पतंग जप्त

नॉयलॉन मांजावर आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होत असल्याने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाने ठिकठिकाणी धाडी टाकल्या. नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह नॉयलॉन मांजाने आणि प्लास्टिक पतंग उडविणाऱ्या व्यक्तींवरही मोठी कारवाई शुक्रवारी (ता. १५) सुध्दा करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यात २०१ दुकानांची उपद्रव शोध पथकाने तपासणी केली. यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि प्लास्टिक पतंग विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या १०९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत सुमारे २२२ पतंग व २ चक्री जप्त करण्यात आल्या.

सर्वाधिक कारवाई हनुमान नगर झोनमध्ये-
नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये शुक्रवारी दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ४५ दुकाने हनुमान नगर झोनमध्ये तपासण्यात आली. पतंगबाजांवरील कारवाईमध्ये गांधीबाग झोन अव्वल असून सर्वाधिक १५ पतंगबाजांवर या झोनमध्ये कारवाई करण्यात आली.
उपद्रव शोध पथकाद्वारे नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंग विरोधातली ही कारवाई २७ डिसेंबर २०२० पासून सुरू आहे. पथकाने २७ डिसेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत केलेल्या कारवाईत दहाही झोन मधिल २१२९ दुकाने तपासण्यात अली. तसेच ८३९८ प्लॅस्टिक पतंग, २८७ चक्री जप्त करण्यात आल्या व सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

१२ जानेवारीचा दूर्देवी योगायोग-
नायलॉन मांजामुळे जाटतरोडी रसत्यावर इमामवाडा पोलिस ठाण्यासमोर प्रणय ठाकरे या तरुणाचा दूर्देवी मृत्यू झाला.यामुळे ज्ञानेश्‍वर नगर येथील ठाकरे कुटुंबावर दूखाचे आभाळ कोसळले.बरोबर ८ वर्षांपूवी १२ जानेवारी रोजीच प्रणय याची आईचे कर्करोगाने निधन झाले होते.हा दूर्देवी योगायोग ठाकरे कुटुंबातील सदस्यांना जबर मानसिक धक्का देऊन गेला.

अभियांत्रिकीचे शिक्ष् ण पूर्ण केलेल्या प्रणयने चांगल्या भविष्याची स्वप्ने रंगविली होती मात्र शहरातील पतंगबाजीच्या शौकीनांनी त्याचा हकनाक बळी घेतला.मंगळवारी प्रणय त्याच्या लहान बहीणीच्या श्रृतीच्या नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश लवकरात लवकर व्हावा,या उद्देशाने रहिवास प्रमाणपत्र घ्यायला गेला होता.त्याचे मामा तसेच काही नातेवाईकांनी त्याला ‘कशाल घाई करतोस?नंतर देता येईल प्रमाणपत्र’असे सांगून थांबविण्याचा प्रयत्न केला होता मात्रा नियतीच्या मनात काही वेगळेच दडले होते.

या धक्क्यातून अद्याप कोणीही सावरले नाही.प्रणयचे वडील प्रकाश हे इलेक्ट्रीशियन असून पत्नीच्या निधनानंतर त्यांनी फक्त मुलांसाठी स्वत:ला सावरले होते.मूलगा हाताशी आला आता सगळं काही सुरळीत होईल,अशी त्यांना आशा होती.मात्र काळाने झडप घातली आणि…तरुण मूलाला पतंगबाज शौकीनांमुळे गमावण्याची वेळ एका पित्यावर आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या