फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनायलॉन मांजाने तरुणाचा मृत्यू!

नायलॉन मांजाने तरुणाचा मृत्यू!

Advertisements

(छायाचित्र:गूगलवरुन साभार)

नागपूर,ता. १२ जानेवारी: मकर संक्रातीच्या पर्वावर शहरात या वर्षीदेखील पतंगबाजीला जोर चढला असून बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग तसेच नायलॉन मांजाविरोधात नागपूर महानगरपालिकेने कंबर कसून दररोज कारवाईचा बडगा उगारला असतानाही नागपूरातच नायलॉन मांजामुळे आज एका तरुणाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

प्रणय प्रकाश ठाकरे,वय वर्षे २१ हा त्याच्या वडीलांसोबत बहीणीच्या प्रवेशासाठी गेला होता.काम आटोपल्यानंतर प्रकाश ठाकरे यांनी प्रणयला ‘तू पुढे चल मी मागाहून येतो’असा निरोप देत घराकडे पाठवले,मात्र प्रकाश ठाकरे हे जाटतरोडी रोड येथून जात असताना त्यांना तिथे गर्दी दिसली मात्र ते तिथे न थांबता घरी गेले.घरी गेल्यानंतर प्रणय घरी अद्याप पोहोचलाच नसल्याचे कळले.काही वेळातच पोलिसांनी त्यांना काळजाचा थरकाप उडवणारी बातमी कळवली!

प्रणय याचा नायलॉन मांज्याने मृत्यू झाला असे पोलिसांनी कळवले.ते सुन्नच पडले.नायलॉन मांज्यावर विक्री आणि वापरावर शासनाने बंदी आणली आहे.घातक मांजा विकू नका,साठवू नका व वापरु ही नका,असे आवाहन करुन पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरात अनेक मांजा विक्रेत्यांवर कारवाई ही केली जात आहे मात्र पैश्‍यांसाठी दुस-यांच्या जीवावर उदार होऊन मांजा विक्रेते सर्रास लपूनछपून नायलॉन मांजा विकत असून पतंगबात ते वापरत ही आहेत.त्यांच्यामुळे मंगळवारी आज सायंकाळी ५.१५ ते ५.३० दरम्यान इमामवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत ही अतिशय दूखद घटना घडली व कोणताही दोष नसताना प्रणय प्रकाश ठाकरे या महाविद्यालयीन तरुणाचा नाहक बळी गेला.

अजनीतील ज्ञानेश्‍वर नगर येथे राहणारा प्रणय हा पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी होता.तो त्याचे वडील,बहीण श्रृती व मोठे वडील रमेश ठाकरे हे चौघे मंगळवारी तहसील कार्यालयात डोमिसाईल बनवण्यासाठी गेले होते. तेथून दाभाच्या एका नर्सिंग कॉलेजमध्ये ही गेले.तिथे श्रृतीच्या प्रवेशाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी ५ वा.च्या सुमारास प्रकाश ठाकरे यांनी प्रणय तसेच मोठे भाऊ रमेश यांना घराकडे जाण्यास सांगितले.

त्यानुसार रमेश ठाकरे त्यांच्या मोटरसायकलने तर प्रणय एक्टीवाने घराकडे निघाले.संविधान चौकातून रमेश ठाकरे हे रेल्वे स्थानकाकडे तर प्रणय अजनीतील ज्ञानेश्‍वर नगर घराकडे निघाला.सरदार पटेल चौकातून जाटतरोडी मार्गे तो घरी जात होता.पोलिस चौकी जवळच त्याला गळा कापला जात असल्याचे लक्ष्ात आले!

त्याने जीव वाचवण्यासाठी दोन्ही हातांनी मांजा पकडला.त्यात दूचाकी सूटून तो खाली पडला. गळा खोलवर कापला गेला व हात ही कापला गेला.मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रणय गंभीर अवस्थेत रस्त्यावरच आचके देऊ लागला.आजूबाजूच्यांनी धाव घेऊन प्रणयला पोलिसांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

माहिती कळताच ठाणेदार मुकुंद सोळंखे आपल्या सहका-यांसह मेडीकलला पोहोचले.मेडीकलमधील डॉक्‌टरांनी प्रणयला मृत घोषित केले.
प्रणयने घराकडे निघताना त्याचा मोबाईल बहीणीला दिला होता.त्यामुळे त्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करणे ही शक्य झाले नाही.दूचाकीच्या कागदपत्रावरुन पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला.यावेळी बहीण श्रृतीचा नर्सिंगमध्ये प्रवेश झाल्याच्या आनंदात त्याचे कुटुंबिय आनंदी होते.काही वेळा पूर्वीच ज्या ठिाकणी प्रकाश ठाकरे जिथे प्रणयचा घात झाला तेथून गर्दी टाळून घरी परतले होते. गर्दीतून त्यांनी कोण पडून आहे,हे जाणून घेण्यापूर्वी घर गाठले अन्…..!

नंतर पोलिसांनी त्यांना जी माहिती दिली ती त्यांचे काळीज चिरणारी ठरली.

प्रणयचे वडील प्रकाश ठाकरे हे इलेक्ट्रीशयन आहे.त्याच्या आईचे लहानपणीच निधन झाले.त्याला श्रृती नावाची लहान बहीण आहे. तर प्रकाश यांना रमेश पोलिस हवालदार,अनिल ठाकरे तसेच एक डॉक्टर असे तीन चूलत भाऊ आहेत.ते सर्व एकाच इमारतीत राहतात.प्रणयच्या अश्‍या अकाली मृत्यूने ठाकरे कुटुबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
मांजा विक्रेते अन पतंगबाजांविरुद्धही त्यांनी एकच आक्रोश केला आहे.अश्‍या प्रकारे निर्दोष नागरिकांचे बळी घेणारे मांजा विक्रेते तसेच पतंगबाजांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी अशी मागणी प्रणयचे मोठे वडील रमेश ठाकरे यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या