
इंडियन मायनॉरिटी फाउंडेशनचा उपक्रम
आई एम एस चे समन्वयक सतनाम सिंग संधू व संस्थापक हिमानी सूद प्रमुख पाहुणे
नागपूर,१३ फेब्रुवरी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “सद्भावना एक भारत,श्रेष्ठ भारत” यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन येत्या १५ फेब्रुवारी रोजी इंडियन मायनॉरिटी फाउंडेशन (आई एम एफ) दिल्ली तसेच हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ताजबाग येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ताज बाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले, की सर्वप्रथम हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्ला अलैह यांच्या मजारवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते चादर चढवली जाईल तसेच संपूर्ण देशात शांती आणि बंधुभाव नांदावी,यासाठी प्रार्थना केली जाईल. यानंतर ताजबाग येथे साकारलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन रुग्णालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची तसेच येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली जाईल,असे अशी माहिती प्यारे खान यांनी दिली.आई एम एस चे समन्वयक व राज्यसभेचे खासदारसतनाम सिंग संधू व संस्थापक हिमानी सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
हे रुग्णालय गरीब, गरजू यांच्यासाठी निर्माण झाले असून सुरुवातीला १७ खाटांचे हे रुग्णालय उद्घाटित केले जाईल. मात्र लवकरच १०० खाटांचे व यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न असलेले ४०० खाटांचे हे रुग्णालय साकारले जाईल, असा विश्वास तेरे खान यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की “सद्भावना एक भारत, श्रेष्ठ भारत” या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश अल्पसंख्यांक समुदाय यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ हा अल्पसंख्यांक समुदायाला सुद्धा मिळत आहे मग, त्यांची उज्वला गॅस योजना असो पंतप्रधान आवास योजना असो,अमृत योजना असो,स्टार्टअप असो किंवा मुद्रा योजना असो, या सर्व योजनांचा लाभ भारतातील कोणताही नागरिक हा कोणत्याही धर्म,जाती, पंथ, भाषा, प्रांत अशा भेदभावाशिवाय घेत आहे त्यामुळेच अल्पसंख्यांक समुदायाच्या मनात केंद्र सरकार हे, संपूर्ण जबाबदारीने आणि मजबुतीने त्यांच्यासोबत विकासाच्या बाबतीत उभी आहे, ही भावना निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
प्यारे खान म्हणाले की, जेव्हापासून पंतप्रधान मोदी यांनी देशाची सत्ता सांभाळली तेव्हापासून मोदी सरकारने “अंतिम छोर कनेक्टिव्हिटी”हा उपक्रम निश्चित केला.
याचा उद्देश्य देशातील सर्वात गरीब आणि वंचित समाजाला आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्या हा आहे.हजरत बाबा ताजुद्दीन रुग्णालयाचे उद्घाटन त्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे कारण, या रुग्णालयात नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गरीब, गरजू रुग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा या नि:शुल्क मिळणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स लोकांची चमू रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणार असून या ठिकाणी रुग्णांना निवासाची उपचारा दरम्यान मोफत सहायता मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या रुग्णालयात कार्डिओलॉजी,ऑर्थोपेडिक, रेडिओलॉजी , ऑकोलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गायनॅकॉलॉजी, युरोलॉजी पीडीयाट्रिक्स, डर्मेलटोलॉजी, इ एन टी,पॅथॉलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी,डेंटिस्ट्री, फिजिओथेरपी इत्यादी या सर्व चिकित्सेसोबत मनो चिकित्सा यावर देखील मोफत उपचार केले जातील. लहान शस्त्रक्रिया यादेखील मोफत होतील. नागपूर शहराचे प्रसिद्ध डॉक्टर हे आठवड्यातून दोन दिवस या रुग्णालयात आपल्या सेवा प्रदान करतील याशिवाय, गरिबांसाठी “आयुष्यमान डायलिसिस केंद्र” याचे देखील उद्घाटन होणार असून, या केंद्रामध्ये गरीब, गरजू रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.
प्यारे खान म्हणाले, की या उपक्रमासाठी ट्रस्टचे इतर सदस्य यांनी भरपूर परिश्रम घेतले आहे. त्यांच्या परिश्रमातून, संकल्पनेतून आणि धाडसातून आता हे रुग्णालय मूर्त रूपात आले आहे. हे रुग्णालय फक्त अल्पसंख्यांकांसाठी असणार का? असा प्रश्न केला असता, ताजबाग मध्ये सर्व धर्मीय रुग्ण सेवा केली जाणार असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले ताजबाग मधून भाईचाऱ्याचा संदेश हा प्रसूत होत असतो अशी पुस्ती त्यांनी जोडली.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की देशाचा विकास होईल तर मुस्लिमांचा देखील विकास सोबतच होणार आहे. आम्ही राजकीय नेते नाही, ट्रस्टशी संबंधित प्रश्नांनाच फक्त उत्तरे देऊ शकतो. मी भाजपचा कार्यकर्ता किंवा नेता नाही त्यामुळे इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून अपेक्षित ठेवता कामा नये.मला भाजपची विचारधारा पटते, मोदी यांच्या विकासाची दिशा आवडते त्यामुळे मी त्यांचे समर्थन करतो .
ताजबागच्या विकासाबाबत बोलताना प्यारे खान म्हणाले, की लवकरच फेस २ चे काम सुरू होणार आहे यासाठी २२४ कोटी रुपये मिळणार असून १,००० गाड्यांची पार्किंग होऊ शकेल अशा रीतीने बांधकाम केले जाईल याशिवाय शॉपिंग कॉम्प्लेक्स शाळा, महाविद्यालय एवढेच नव्हे तर पुढील टप्पा आम्ही विद्यापीठाच्या स्तरासाठी देखील प्रयत्नरत राहू तसेच येणाऱ्या भाविकांसाठी सराय म्हणजेच भक्त निवासांची देखील व्यवस्था ताजबाग मध्ये राहील.
२ जून रोजी आम्ही जेव्हा ट्रस्टचा अधिभार स्वीकारला त्यावेळी ट्रस्टवर साडेसोळा कोटींचे कर्ज होते आज कोट्यावधी रुपये ट्रस्टचा डिपॉझिट आहे. पाच ते सात हजार गरजूंच्या जेवनावळी दररोज ताजबाग मध्ये होतात. आम्ही या ठिकाणच्या, या पवित्र स्थळीच्या ठिकाणी रुजलेल्या अवैध धंद्यांचा कारभार मोडून काढला. एकेका गुंड प्रवृत्तीच्या माणसाकडे दहा दहा, बारा बारा दुकाने आणि घरे होती जी त्यांनी भाड्याने दिली होती. कोणत्याही गरीब माणसाकडे एकच घर असू शकतं.ताजबागची ८४ एकर जमीन ही फक्त भाविकांच्या सोयी सुविधांसाठी उपयोगी राहणार याची दक्षता आणि प्रयत्न आम्ही सर्व ट्रस्टी मिळून करीत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
