

जन्मताच मातृत्व हरपलेले बाळ मात्र सुखरूप
नरखेड ग्रामीण रुग्णालयातील घटना
कुटुंबियांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
नरखेड,१९ ऑगस्ट २०२२: बाळाला जन्म देताच मातृत्व सुखापासून बाळाला वंचित होण्याची दुर्दैवी घटना दि.१९ ऑगस्ट रोजी नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली.बाळाला जन्म दिल्यानंतर अति रक्तस्त्रावामुळे जन्मदात्रीचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली. जन्म दिलेले बाळ सुखरूप असून मात्र डॉक्टर्सच्या चूकीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतक शालिनीच्या कुटूंबियांनी केला .
नरखेड येथील रहिवाशी शालिनी सुरज ढोके वय ३३ या रात्री २ वाजता प्रसूती वेदना सूरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झाल्या होत्या. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड यांच्या देखरेखीखाली रात्री १.४५ वाजता डिलिव्हरी नॉर्मल झाली. त्यांनी सुदृढ बाळाला जन्म दिला.
परंतु प्रसूती नंतर रक्त प्रवाह थांबत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी त्यावर उपचार सूरू केले परंतु डॉक्टरांना प्रसूती करण्याचा याआधी कुठलाही अनुभव नसून त्यांच्या हातून ही पहिलीच डिलिव्हरी होती.प्रसूती वेळी नाळ व्यवस्थीत न काढता, ओढताड करण्यात आली त्यामुळे वेदना सुरू झाल्या व रक्त प्रवाह थांबत नसल्याने शालिनी यांची प्रकृती खालावत गेल्याने तेथील डॉक्टरांनी तीला योग्य वैद्यकीय उपचाराकरिता नागपूरला रेफर केले. मात्र शालिनी यांची प्रकृती खालवतच गेल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला काटोल येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरानी मात्र तिला मृत घोषित केले.
यानंतर शालिनी यांचा मृतदेह काटोल येथून नरखेड ग्रामीण रुग्णालयात शवविछेदना करीता पाठविण्यात आला.शवविछेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.मृतक महिलेचे पती सुरज दिलीप ढोके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून डॉक्टरांवर कार्यवाईची मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

दरम्यान, नागपूर येथून घटनेच्या चौकशीकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मडावी व डॉ. संजय उजैनकर यांनी गेले असता आपल्या अहवालात, ३० ते ३३ वयाच्या महिलांची प्रसूती ही हायरिस्क वर्गवारीत मोडल्या जात असल्याचे सांगून त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे प्रसूती दरम्यानचा कालावधी हा ‘सुवर्णकाल’ असतो मात्र त्यात धोकाही जास्तच असतो. परंतु येथील डॉक्टर, नर्स यांनी केलेली प्रसूती व त्या अनुशंगाने तयार केलेला रुग्णा बाबतचा रेकॉर्ड योग्य असून प्रसुतीची क्रिया योग्य तऱ्हेने पार पडल्याचे दिसून येते असे स्पष्ट केले आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञाची मागणी :
येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे गरोदर मातांची परवड होते. परिणामी माता मृत्यू सारख्या दूर्देवी घटना घटताना दिसतात.जवळपास सुसज्य सरकारी दवाखाना नसल्यामुळे गरोदर मातांना कठीण काळात कठीण समस्येला तोंड द्यावे लागते म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ ह्या रुग्णालयात असावा अशी मागणी जोर धरत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
