

(संग्रहीत छायाचित्र)
सी.पी. अँड बेरार ई.एस. कॉलेजचा २७ जुलै रोजी वेबिनार
नागपूर,२४ जुलै: सी.पी. अँड बेरार ई.एस. कॉलेज, नागपूर आणि सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अॅण्ड लर्निंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महामारीच्या परिस्थितीत नोकरीच्या संधी’ या विषयावर २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व स्तरातील लोकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा काळ विशेषत: नोकरी शोधणा -यांसाठी तर अधिकच आव्हानात्मक बनला आहे. अशा स्थितीत नोकरी मिळविण्यासाठी कोणती कौशल्ये विकसीत करावी लागतील, यावर सेंटर फॉर इनव्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग, मुंबईचे लीड ट्रेनर सिद्धांत अग्रवाल मार्गदर्शन करतील.
नोकरी करणारे देशाच्या आर्थिक विकासास हातभार लावत असल्यामुळे ते देशाची मालमत्ता असतात. या वेबिनारमध्ये रोजगार मिळविणे आणि नोकरी करण्यासारखी आवश्यक कौशल्ये कशी विकसीत करावी, यावर भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.पी. आणि बेरार ई.एस. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते राहणार आहेत. युवक, विद्यार्थी, इच्छुकांना करियरच्या संधीबाबत जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन सचिव सी.पी. आणि बेरार कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या डॉ. डॉ. मेधा कानेटकर यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
