फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमॲड.अंकिता शहा यांना अद्याप ही न्याय नाहीच!

ॲड.अंकिता शहा यांना अद्याप ही न्याय नाहीच!

Advertisements


गृहमंत्र्यांच्या फोनचाही उपयोग नाही:स्टेशन डायरीतही लिहली खोटी माहिती!

ड्यूटीवर नसणारी महिला कॉन्सटेबल घटनेच्यावेळी पोलीस ठाण्यात हजर!

कारवाई केल्याची कागदपत्रे पीडीतेस देण्यास टाळाटाळ!

नागपूर,ता. १९ ऑक्टोबर: ॲड.अंकिता शहा यांच्यासोबत लकडगंज पोलीस ठाण्यात करण्यात आलेली अमानवीय मारहाण यामुळे पुराेगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या पोलीसांची प्रतिमा ही पराकोटीची मलिन झाली असून राज्य मानवाधिकार अायोगाने देखील या घटनेची दखल घेतली व येत्या २७ ऑक्टोबर २०२० दूपारी ११ वा. पोलीस आयुक्तांना स्वत: हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका उच्चविद्याभूषित,निर्दोष वकील महिलेला लकडगंज पोलीस ठाण्यात झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडीयो बघताच पोलीस आयुक्तांना फोनवरुन दोषींवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते,मात्र गृहमंत्र्यांना देखील कारवाई करीत असल्याचे फक्त ‘आश्‍वासनच’मिळाले,अद्याप दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली?याची माहिती देताना ॲड.अंकिता शहा यांनी माध्यमांकडे मार्मिक शब्द नमूद केले २०८ दिवस या अन्याय व अत्याचाराला उलटून गेलेत,मला व माझ्या पतीला अद्याप न्याय मिळाला नाही,‘न्यायाला उशिर म्हणजे न्यायाला नकार….!’

ॲड.अंकीता शहा यांनी वारंवार जवाबदार पोलीस अधिकारी भावेश कावरे यांना कारवाईबाबत विचारणा केली असता ’अद्याप दोषींवर कोणती कारवाई करावी,याचा विचार झाला नाही!’असे उत्तर मिळाले.तुम्ही का इतक्या मागे लागल्या आहात?असा प्रश्‍न शहा यांनाच विचारला गेला!शहा यांनी उत्तर दिले ’मला अजून न्याय नाही मिळाला आहे,त्यामुळे मला तुम्ही काय कारवाई केली याची प्रत द्यावी’मात्र ॲड.शहा यांना अद्याप कोणत्याही कारवाईची प्रत देण्यात आली नाही.

ॲड.शहा यांनी व्हिीडीयोचे फूटेज मागितले असता फक्त मागच्या कॅम-यातील फूटेज देण्यात आले,समोरुन दारापासूनच त्यांना जी मारहाण करण्यात आली ते फूटेज मिळालेच नाही,डिलिट झाले असल्याचे सांगण्यात आले.२६ तारखेलाच लकडगंज पोलीस ठाण्याला सर्व फूटेज .फ्रीझ करुन ठेवण्याचे आदेश मिळाले होते. याशिवाय माहितीच्या अधिकारात देखील अद्याप कोणतीच माहिती ॲड.शहा यांना देण्यात आली नसल्याचे शहा यांनी सांगितले.

पोलीस उप निरीक्ष् क यांना राजकीय वरदहस्तच! शहा यांचा आरोप

माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी स्वत: पोलीस आयुक्तांना फोन करुन उचित कारवाई करण्याची सूचना केली ,राज्याचे गृहमंत्री,शहरातील आमदार विकास ठाकरे,जिल्हा बार असोसिएशनने केलेले सहकार्य,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठींबा,मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगले,मुंबई तसेच गोवा बार कॉऊंसिलचे मिळालेले सहकार्य,रिझवान सिद्दीकी, प्राणिमित्र स्वप्नील बोधणे तसेच संपूर्ण प्रसार व प्रचार माध्यमांनी केलेल्या न्यायाच्या लढाईतील सहकार्यानंतर देखील पोलीस उप निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने त्यांना नक्कीच राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याची शंका ॲड.शहा यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.राजकीय पाठींबा नसता तर दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर कधीचीच कारवाई झाली असती,असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गुन्हेगारी संदर्भात पोलीस उप निरीक्ष् क नरेंद्र हिवरे यांनचा नुकताच मोठा सत्कार करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना गृहमंत्री यांच्याच हस्ते मिळाला मात्र दूसरीकडे फक्त माझे पती तक्रार देण्यासाठी बरमुडा घालूनच पोलीस ठाण्यात माझ्यासोबत आल्याने त्यांना  कावरे  यांनी ’बगिच्यात फिरायला आला का?’म्हणून अवार्च्य शिवीगाळ केली,चल निकल यहा से,असे म्हणून हाकलून लावले, ते गेटच्या बाहरे जाऊन उभे राहीले असता तेथून त्यांना चार-पाच पोलीसांकरवी ढकलत आतमध्ये आणले.

या सर्व प्रकाराची रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये करीत असताना माझा मोबाईल हिसकावून घेण्यात आला, मारहाण करीत आतमध्ये आणण्यात आले.आम्ही चोर,दरोडखोर होतो का?ही न्यायाची लढाई मी शेवटपर्यंत लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

स्टेशन डायरित चुकीची माहिती-
अंकीता शहा यांचे पतीने नीलेश शहा यांनी मास्क नव्हता घातला असे नमूद करण्यात आले मात्र संपूर्ण व्हिडीयो फूटेजमध्ये नीलेश शहा हे मास्क घालूनच असल्याचे स्पष्ट झाले. २५ मार्च रोजीच्या या संपूर्ण घटनाक्रमाचे फूटेज ॲड.अंकिता शहा यांनी माध्यमांना प्रसारीत केले.त्या संपूर्ण व्हिडयोमध्ये नीलेश शहा हे मास्क घालूनच तक्रार नोंदवायला आले,हे स्पष्ट दिसत आहे.परीणामी पोलीसांच्या स्टेशन डायरीत खोटी नोंद करण्यात आल्याची व मास्क न घातल्याने वाद झाल्याची नोंद ही खोटी ठरली.

पोलीस कॉन्सटेबलने ड्यूटीवर नसताना केली मारहाण!
ॲड.अंकिता शहा यांना मारहाणा करणा-यांमध्ये माधुरी खोब्रागडे यांचा देखील समावेश असून त्या दिवशी त्यांची लकडगंज ठाण्यात ड्यूटीच नव्हती,असा खुलासा ॲड. अंकिता शहा यांनी माध्यमांकडे केला.त्या दिवशीच्या हजेरी पुस्तिकेत माधुरी खोब्रागडे यांचे नावच नसल्याचा दावा शहा यांनी केला तसेच २५ मार्च २०२० चा लकडगंज ठाण्याचा ड्यूटी चार्टही माध्यमांना प्रसारित केला.

ॲड.अंकिता शहा यांनी  डीसीपी  यांना माझ्या पतीला ’बेटा आप बरमुडा पहन के क्यो आये’अश्‍या शब्दात टोकले असते तर वाद झाला नसता असे सांगितले असता कावरे यांनी ‘बेटा बोलणे से कोई सुनता है क्या?’असा उलट प्रश्‍न केला.निदान सुशिक्ष्ति माणसे व सराईत गुन्हेगार यांच्यात तरी भेद खाकी वर्दी नेसलेल्या पोलीसांनी करावा,अशी अाशा शहा यांनी व्यक्त केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या