

राज्य मानवी हक्क आयोगाचे शिक्कामोतर्ब
नागपूर,ता. ८ मार्च: बहूचर्चित ॲड.अंकिता शहा मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीसांना दोषी धरले असून आता या प्रकरणावर येत्या १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होऊन दोषींना दंड हाेण्याची शक्यता आहे.
ॲड.अंकिता शहा यांनी या घटनेची आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. संपूर्ण पुराव्यांच्या तपासणीनंतर आयोगाने या प्रकरणात सहाही आरोपी पोलीसांचे बयाण नोंदवले आहे. या घटनेत लकडगंज पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरीष्ठ पोलिस निरीक्ष् क नरेंद्र हिवरे,सहायक पोलिस निरीक्ष् क भावेश कावरे,दोन महिला पोलिस कॉन्सटेबल व इतर दोन जणांवर ॲड.अंकिता यांनी पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप केला होता.
या मारहाणीचा व्हिडीयो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला होता.गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ॲड.अंकिता शहा या लकडगंज पोलिस ठाण्यात पतीसह त्यांच्याच इमारतीतील वकील असणारे करण सत्यदेव यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या होत्या.ऐन उन्हाळ्याचे दिवस असताना व नागपूरात कडक लॉक डाऊन सुरु असताना अंकिता या दररोज भटक्या श्वानांसाठी अन्न व पाणी इमारतीसमोर ठेवायच्या.
मात्र इमारतीसमोर श्वानांसाठी अन्न ठेवायचे नाही व कोणतेही श्वान दिसताच त्यांना दगडांनी मारावे असे आदेश इमारतीच्या चौकीदाराला करण यांनी दिले होते.घटनेच्या दिवशी इमारतीसमोर एक गरोदर श्वान उभी असताना चौकीदार तिला दगडाने मारु लागल्याने शहा यांनी त्याला असे करण्यापासून अडवले.यावर करण यांनी शहा यांच्याशी भांडणे उकरले.त्या ठिकाणी लॉक डाऊनमुळे बंदोबस्तासाठी उभे असणा-या पोलिसांकडे शहा यांनी तक्रार केली मात्र शहा यांना त्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.
ॲड.अंकिता शहा यांनी त्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी लकडगंज पोलिस ठाणे गाठले मात्र या ठिकाणी शहा यांच्याशीच ठाण्यातील पोलिसांनी अरेरावी केली.शहा यांनी त्यांच्याकडील पशुप्रेमी संघटनेचे ओळखपत्र देखील दाखवले.
मात्र पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट त्यांनी शहा यांच्याशीच अरेरावी केली व पोलीसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न केला. शहा यांनी या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडीयो चित्रण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हिवरे यांच्या आदेशावरुन महिला कॉन्सटेबल्सनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यांचा मोबाईल हिसकण्यात आला एवढंच नव्हे तर त्यांच्या पतीला देखील ते पोलीस ठाण्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना एखाद्या सराईत गुन्हेगारामागे धावतात तसे त्यांच्या मागे धावून चार पोलीसांनी या सामान्य नागरिकाच्या मुसक्या आवळून फरफटत ठाण्याच्या आत आणले व त्यांना देखील दमदाटी केली.
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमरेमध्ये कैद झाली.हे सीसीटीव्ही फूटेज मिळवण्यासाठी देखील शहा यांना चांगलाच संघर्ष करावा लागला.त्यांनी माहितीच्या अधिकारात सह पाेलिस आयुक्त यांच्याकडे अर्ज केला मात्र तो अमान्य करण्यात आला.या विरोधात त्यांनी पुन्हा पोलिस उपायुक्त यांच्याकडे अर्ज केला.त्यांनी शहा यांना सीसीटीव्ही फूटेज देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.मात्र यातही पोलिसांनी एक ‘गोम’ठेऊन अगदी समारेच्या कॅम-यामधील फूटेज न देता बाजूच्या कॅम-यांमधून टिपलेले काही फूटेज त्यांना दिले.
यानंतर एका उच्चविद्याभूषित महिला वकीलासोबत ‘सज्जनांचे रक्ष ण व दूर्जनांचे निर्दालन’करण्याचे ब्रिद वाक्य मिरविणा-या काही पोलिसांनी पराकोटीचा दूर्रव्यवहार केला. हा व्हिडीयो व्हायरल होताच वकीली व राजकीय क्ष्ेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले.जिल्हा बार असोसिएशन व हायकाेर्ट बार असोसिएशन यांनी एका महिला वकीलाविरुद्ध झालेली मारहाण याचा तीव्र निषेध केला तसेच शहा यांच्या या आत्मसन्मानाच्या लढाईत संपूर्ण पाठींबा दशर्वला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत तत्कालीन पोलिस आयुक्तांना ज्ञापन देण्यात आले.
केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनी देखील या घटनेची दखल घेतली तर तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोषींवर कारवाई करण्यासाठी पत्र लिहले.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तीन वेळा शहा यांनी दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा केला मात्र कार्यवाही सुरु आहे,असे फक्त कोरे आश्वासन त्यांना गृहमंत्र्यांकडून मिळाले.
मात्र आता राज्य मानवाधिकार आयोगाने शहा यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सांगून या घटनेत पोलिस दोषी असल्याचे नमूद केले आहे.शहा यांच्यासोबतच पोलिस विभागाकडून आयोगासमोर सादर केलेल्या अहवालात देखील अशी मारहाण झाली असल्याचे कबूल करीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची दखल घेत दोषी पोलिस अधिका-यांना यासाठी ५०० रु.व एक हजार रुपये दंड ठोठावला असल्याचे सांगितले.
आयोगाने दोषी पोलिसांवर ३२३ कलम म्हणजे मारहाणीचा गुन्हा सिद्ध होत असल्याचे मान्य केले.मात्र घटनेच्या वेळी पतीला झालेली मारहाण,मोबाईल हिसकावून फोडून टाकणे,पतीला वेगळ्या खोलीत बसवून खोटा गुन्हा दाखल करु,असे धमकावणे असे इतरही कलम लावण्यासाठी शहा आयोगाला विनंती करणार आहे.कलम १६६ म्हणजे पदाचा दुरुपयोग हे देखील कलम लावण्यात यावे असा अर्ज करणार असल्याचे खास ‘सत्ताधीश’कडे त्यांनी सांगितले.
येत्या १६ एप्रिल रोजी आयोगासमोर अंतिम सुनावणी असून दोषींना कठोर शिक्ष्ा न झाल्यास व मला न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे द्वार ठोठावणार व तेथे न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहा यांच्या वतीने सुप्रसिद्ध वकील रिजवान सिद्धीकी हे आयोगापुढे बाजू मांडत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
