

डॉ.सुबोध गुप्ताविरुद्ध इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर,ता.११ डिसेंबर २०२३: शहरातील सुप्रसिद्ध अरिहंत मल्टी स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये कार्यरत ७० वर्षीय डॉक्टर सुबोध गुप्ता(एम.डी) यांच्या विरोधात त्याच रुग्णालयात सिनिअर बिजनेस एक्झीक्यूटीव पदावर कार्यरत असणा-या २३ वर्षीय तरुणीने इमामवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवली असून डॉ.सुबोध गुप्ता यांच्या विरोधात भादवी च्या कलम ५०५/२३ तसेच कलम ३५४/(अ)(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणी गेल्या ७ महिन्यांपासून बैद्यनाथ चौकातील वि.आर.मॉल पुढे स्थित अरिहंत मल्टी स्पेशिलिटी रुग्णालयात कार्यरत आहे.जी.एच.रायसोनी कॉलेजमधून एम.बी.ए ची पदवीप्राप्त ही तरुणी या रुग्णालयात सिनिअर बिजनेस एक्झीक्यूटीव पदावर कार्यरत आहे.डॉ.सुबोध गुप्ता हे या रुग्णालयातील डायरेक्टर बॉडीमध्ये सदस्य असल्यामुळे पिडीत तरुणी त्यांना ओळखत होती.
या रुग्णालयासाठी बिजनेस आणण्याची जवाबदारी पिडीत तरुणीकडे होती.यासाठी विविध कंपन्यांमध्ये या रुग्णालयाविषयीची माहिती तरुणी देत असे व कंपनीचे अनुबंध रुग्णालयासोबत करुन देत असे.यामुळे विविध कंपनीतील कर्मचारी वर्ग या रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येत असे.याशिवाय कम्युनिटी कॅम्प,गार्डन कॅम्प अश्या विविध उपक्रमातून देखील पिडीत तरुणी या रुग्णालयाच्या व्यवसायिक वाढीसाठी प्रयत्नरत असायची.गेल्याच महिन्यात या तरुणीने जे.एस.डब्ल्यू या स्टील कंपनीचा करार अरिहंत हॉस्पीटलसोबत करुन दिला होता तसेच त्या कंपनीच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी सध्या अरिहंतमध्ये सुरु आहे.
नोव्हेंबर महिन्यात ११ तारखेला या तरुणीचा बर्डी येथे अपघात झाल्याने तिच्या पायाला मार बसला.यामुळे ११ नोव्हेंबरपासून तर ३१ नोव्हेंबरपर्यंत पिडीत तरुणी ही सुटीवर होती.१ डिसेंबर पासून पिडीत तरुणीने पुन्हा हॉस्पीटल जॉईन केले.मात्र,पायाचे दुखणे पूर्णपणे बरे न झाल्यामुळे ती फिल्डवर न जाता फक्त कार्यालयीन काम करीत होती.
७ डिसेंबर रोजी पिडीत तरुणी आपले कार्यालयीन काम करीत असताना दुपारी १ वाजून ५० मिनिटांवर डॉ.सुबोध गुप्ता यांनी पिडीतेच्या मोबाईलवर कॉल केला व त्यांच्या केबिनमध्ये येण्यास सांगितले मात्र कामात असल्याने तरुणी त्यांच्या कक्षात जाण्यास विसरली.डॉ.सुबोध गुप्ता हे वडीलांच्या वयाचे असल्याने व गुरुवारी त्यांनी कक्षात बोलावले असताना पार विसरुन गेल्याने, आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास तरुणीला ती बाब आठवली व ती डॉ.गुप्ता यांच्या पहील्या माळ्यावरील कक्षात गेली.
पिडीतेने डॉ.गुप्ता यांना गुरुवारी ती कक्षात न येऊ शकल्याचे कारण सांगितले,यावर त्यांनी पायावरील जखमेविषयी विचारणा केली.यानंतर डॉ.गुप्ता यांना कोणाचा तरी फोन आला ज्याच्याशी ते पाच मिनिटे बोलत राहीले.यानंतर त्यांनी मला,तू व्यवस्थित चालत नसून मी तपासून तुला सांगतो तुझ्यात काय समस्या आहे,असे सांगून त्यांनी कक्षातील रुग्णाच्या बेडवर तरुणीला झोपवले व पडदे बंद केले.
यानंतर उभ्या उभ्याच डॉ.गुप्ता यांनी दोन्ही हातांनी तरुणीच्या कमरेखाली नितंबाला धरले व तिच्या टॉपच्या आतमध्ये हात घालून तिच्या स्तनांना जोरात दाबले!डॉ.सुबोध गुप्ता यांच्या या कृत्यामुळे तरुणी घाबरली व तिने डॉ.गुप्ताचा हात जोरात झटकला,यावर इंग्रजीत ‘इट्स ओके,चलता है’असे सांगत पुन्हा डॉ.गुप्ताने पुन्हा तीच घृणास्पद कृती तरुणीसोबत केली.यानंतर भिंतीला पकडून ते पुशअप करु लागले व,तू पूर्णपणे बरी होऊन जा त्यानंतर मी तुला सांगेन कसे तू चालू शकशील,असे म्हणाले.
तरुणी भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्या केबिनमधून बाहेर पडली त्याचवेळी तरुणीला हाडांचे डॉक्टर उज्वल वानखेडे दिसले.तरुणीने त्यांना पायावरील जखम दाखवली व यानंतर वॉशरुममध्ये जाऊन तरुणी ढसाढसा रडली.तिच्यासोबत घडलेल्या एका वरिष्ठ व वयोवृद्ध डॉक्टरकडून या अतिशय घृणास्पद कृत्याबाबत पिडीतेने रुग्णालयातील क्वालिटी मॅनेजर मानसी वैरागडे,नर्सिंग हेड नैना सुखदेवे,मार्केटिंगचे रजत जैन यांना सांगितले.त्यांनी पिडीतेला एका केबिनमध्ये बसवले व सेंटर हेड डॉ.विकास चौधरी यांना बाेलावून आणले.ही संपूर्ण घटना त्यांना सांगताना तरुणीला रडू कोसळले.यावर त्यांनी नैना सुखदेवे यांच्या करवी पिडीतेला घरी सोडून देण्यास सांगितले.
घरी आल्यावर पिडीतेने तिच्यासोबत गुदरलेली घटना आपल्या आई-वडीलांना व दोन जवळच्या मैत्रीणींना सांगितली.या सर्वांसोबत पुन्हा रुग्णालयाचे संचालक निखिल कुसुमगर यांच्या कक्षात जाऊन घडलेली घटना विशद केली असता त्यांनी डॉ.सुबोध गुप्ता यांना कक्षात बोलावले असता, तब्बल एका तासांनी डॉ.गुप्ता हे संचालकांच्या कक्षात आले व मी फक्त तरुणीचे चेकअप केले,असे धाद्यांत खोटे सांगितले,अशी तक्रार पिडीतेने आपल्या एफआयआरमध्ये केली आहे.
मी डॉ.गुप्ता यांना चेकअप करण्यास सांगितले नाही,याशिवाय माझ्या पायाला मार लागला असताना डॉ.गुप्ता यांनी तिच्या नितांत खासगी अवयवांना अतिशय अश्लीलरित्या स्पर्श केला,कोणत्याही महिलेची तपासणी करीत असताना महिला परिचारिका ही उपस्थित राहत असते मात्र डॉ.गुप्ता यांनी असे केले नसल्याची तक्रार तरुणीने नमूद केली.डॉ.गुप्ता यांनी पिडीतेच्या स्तनांना,नितबांना तसेच पोटावर अश्लीलरित्या स्पर्श करुन तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न केल्याने, पिडीतेच्या तक्रारीवर इमामवाडा पोलिस ठाण्यात डॉ.सुबोध गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमामवाड्याच्या पोलिस निरीक्षक गेडाम यांनी आरोपीवर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन पिडीतेच्या कुटूंबियांना दिले आहे.
सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण सरकारच शहरात आली आहे.त्यात नागपूर शहर हे स्वत: गृहखाते ज्यांच्या हातात आहे अश्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शहर असताना ऐन अधिवेशनाच्या काळात एका वयोवृद्ध व प्रतिष्ठित डॉक्टराचे हे असे
अश्लील व तितकेच मनोविकृत कृत्य उजेडात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
नोकरीच्या ठिकाणी तरुणींसोबत घडणा-या विविध घटना या अद्यापही स्त्री म्हणून त्यांच्या सन्मान व स्वीकार न करता, अजूनही त्या कोणत्याही वयाच्या पुरुषांसाठी फक्त ‘भोग्या’ असल्याचीच मनोविकृती कायम असल्याचे द्योतक आहे.मोठमोठी प्रतिष्ठित रुग्णालये व त्या अजस्त्र भिंतींच्या आड लपून असलेली मनोविकृती ,उजेडात आणने त्यासाठीच गरजेचे ठरते,अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर उमटली आहे.

कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वसीम खान व सचिव अक्षय डोर्लिकर यांनी पिडीतेच्या एफआयआर नोंदविण्यामध्ये मोलाची मदत केली.
……………………………………….




आमचे चॅनल subscribe करा
